पुणे : लोकसभा, विधानसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या
महापालिका निवडणुकीत मनसेनं पराभवाची धूळ चाखल्यानंतर आता राज ठाकरे पुन्हा
एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज पुण्यातील नदीपात्राच्या विकासाचा
आराखडा सादर केला.
म्हात्रे पूल ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत मुठा नदीचं पात्र नाशिकच्या गोदापार्कच्या धर्तीवर विकसित करता येईल आणि त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआरमधून निधी उभा करता येईल, असा विश्वास यावेळी राज ठाकरेंनी व्यक्त केला.
राज ठाकरेंच्या संकल्पनेनुसार सध्याच्या बालगंधर्व रंगमंदिराची व्याप्ती वाढवून तीन वेगवेगळी थिएटर्स तयार करता येतील. मुख्य थिएटर हे खुल्या पद्धतीचे, एम्फी थिएटरच्या धर्तीवर तयार करता येईल, अशी संकल्पना राज ठाकरेंनी मांडली.
राज ठाकरेंनी मुठा नदीपात्र विकसित करण्याची संकल्पना मांडली असली, तरी पुण्यातील मेट्रोचा प्रस्तावित मार्ग हा याच नदीपात्रातून जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या संकल्पनेतील नदीपात्र प्रत्यक्षात कसं येणा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नदीपात्रालगतच्या विकासाचा आराखडा मुख्यमंत्र्यांना देखील दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
दरम्यान, महापौर मुक्ता टिळक यांनी या आराखड्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.