राज ठाकरेंनी केली जाधवांची विचारपूस
सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 09, 2011 AT 11:45 AM (IST)
औरंगाबाद - पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जंभीर जखमी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांची विचारपूस करण्यासाठी "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे आज शहरात दाखल झाले. घाटी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जाधव यांची विचारपूस करण्यासाठी ते रूग्णालयात पोहोचले. तेथे ते सुमारे १५ मिनिटे होते. या वेळी रूग्णालयाबाहेर "मनसे'च्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
जाधव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलणार असून ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या पहिल्याच बैठकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आमदारांनी हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करणारे निवेदन दिले असून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.