मनसेतर्फे आजपासून 9 रु. दराने कांदाविक्री
सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 09, 2011 AT 12:00 AM (IST)
मुंबई - कांदाभाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात आलेले पाणी पुसण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने कंबरी कसली आहे. गेल्या काही दिवसांत साठ ते सत्तर रुपये किलो भावाने विकला जाणारा कांदा उद्या (ता.9) पासून मुंबई व ठाण्यात फक्त 9 ते 13 रुपये किलोने मनसे उपलब्ध करून देणार आहे.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी सांगितले, की राज्यातील शेतकरी नऊ रुपये किलोने कांदा विकत असताना सर्वसामान्य जनतेला मात्र हा कांदा तब्बल 60 ते 70 रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. कांद्यांच्या दरातील ही वाढ दलाल व विक्रेत्यांचा नफा लक्षात घेतला असता अक्षरशः विकृत वाटते. विक्रेत्यांच्या या बेसुमार नफेखोरीला आळा घालण्यासाठी मनसे थेट शेतकऱ्यांकडून कांदा विकत घेऊन सर्वसामान्य जनतेला 9 ते 13 रुपये किलोने विकणार आहे.
शिवडी-भायखळा परिसरात आमदार बाळा नांदगावकर व मनसेच्या उपाध्यक्षा आशा मामेदी, गोरगाव परिसरात शालिनी ठाकरे, बोरिवलीमध्ये आमदार प्रवीण दरेकर, तर दादरमध्ये आमदार नितीन सरदेसाई व मनमसेच्या उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांच्या पुढाकाराने सवलतीच्या दराने कांद्याची विक्री करण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें