सर्वप्रथम आम्ही आमचे जीवश्चकंठश्च मित्र आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा निदिध्यास घेतलेले "मनसे'प्रमुख जे की कुंवर चुलतराज यांचे शतशः आभार मानून पुढे जाऊ. मराठी माणसाच्या हितासाठी पलिते नि भालेबर्च्या घेऊन जुझात पाऊल टाकणारे पाईक इतिहासाला ज्ञात आहेत, पण तळहाती पत्थर घेऊनिया रणात उतरणारे कुंवर चुलतराज हे अर्वाचीन इतिहासातील येकमेव उदाहरण. युद्धाचे भय घालोन तहात जिंकणारे मराठा गडीदेखील तेच होत. त्यांच्या प्रशस्तीनिमित्त "चुलतराज न होत, तो पंचाइत होत सबकी' असे सुप्रसिद्ध कवन आम्ही लवकरच लिहावयास घेणार आहो. (चमचेगिरी बास झाली, असे कोण म्हणाले ते? खामोश!!) पण ते येक असो.
दुसरे असे, की मराठी चित्रपटांचे आम्ही प्रचंड म्हणजे प्रचंड असे चाहते आहोत. आश्चर्याची बाब म्हणजे, मराठी असूनही आम्ही मराठी चित्रपट आवर्जून पाहतो! "दुनियादारी' आम्ही चौवेळा पाहियला असून, त्यापूर्वी त्यातील "टिकटिक वाजते डोक्याऽऽत' ही गीतपंक्ती हज्जारो वेळा टेलिव्हिजनवर ऐकिली आहे. इतक्यांदा येकच ओळ ऐकून आमच्या कानी विविध प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले असून, नजरेत विशेष चमक आली. अखेरीस आम्हास येकदा तो चित्रपट बुचभर दाखवून आणल्याखेरीज हे प्रकरण बरे होण्यातले नाही, असे निदान ठाण्याच्या येका विख्यात डॉक्टरांनी केले. त्यांनी येकच डोस ठरवून दिला होता, आम्ही तीन बुचे ज्यास्त घेतली! आणि बरे होण्याच्या मार्गावर आहो!!
अशा या "दुनियादारी'चे खेळ उतरवून तेथे "चेन्नई एक्स्प्रेस' नावाचा निव्वळ गल्लाभरू चित्रपट (तोही परप्रांतीयांच्या भाषेत!) लावण्याचा मोगली कट चुलतराजांच्या मावळ्यांनी सफई उधळून लावला, आणि इतिहासात पहिल्यांदा मराठे तहात जिंकले! "कृष्ण कुंज' या ऐतिहासिक ठिकाणी झालेल्या या तहनाम्याचे वेळी आम्ही, तसेच "दुनियादारी'चे दिग्दर्शक संजय जाधव, स्वप्नील जोशी आदी फिर्यादी मंडळी दरबारात उपस्थित होती. सामनेवाल्या पार्टीत "चेन्नई एक्स्प्रेस'चे दिग्दर्शक रोहित शेट्टी, निर्मात्यांचे प्रतिनिधी हेही होते. राजांनी दोन्ही पार्ट्यांचे ऐकून घेतले.
चुलतराज ः हं... तुमचा मारधाडपट आहे की विनोदी?
शेट्टी ः ऍक्चुअली साहेब, माझ्या पिक्चरमध्ये मारधाडीतून विनोद होतो आणि विनोद झाला की लगेच मारामारीही होते. चार मिनिटांत सत्तर गाड्या तोडल्या मी शूटिंगमध्ये, साहेब. तोच फॉर्म्युला आहे, माझा!
चुलतराज ः (संशयाने) मराठी आहे की काय?
शेट्टी ः नाही "चेन्नई एक्स्प्रेस' नाव आहे...
चुलतराज ः मग चेन्नईत दाखवा, इथं कशाला? बरं "दुनियादारी'वाली पार्टी कोण आहे? हं, तुमचा चित्रपट कशावर आहे?
स्वप्नील ः एकदम भारी आहे, साहेब ! ए-वन पिक्चर आहे. पब्लिकला पागल केलंय. (इथं आम्ही चपापलो!) "टिकटिक वाजते डोक्याऽऽऽत' ऐकलं का? बेस्ट आहे!
चुलतराज ः मराठी आहे ना, मग बास झालं! असं करा, यांनी (शेट्टींकडे बोट दाखवून) बराच खर्च केलेला दिसतोय. चार खेळांपैकी दोनदोन वाटून घ्या. दोन असतील, तिथं एकेक, कळलं? निघा आता....
जिथं एकच खेळ आहे, तिथं अर्धा-अर्धा दाखवावा, अशी सूचना यायच्या आत सगळे धडपडत उठले. (धड चहासुद्धा पिता आला नाही! असो.) तथापि चुलतराजांनी रोहित शेट्टींना थांबायला सांगितलं. आम्हीही रेंगाळलो.
चुलतराज ः शेट्टी, आमच्या मेळाव्यात भाषण द्यायला या!... ही आमची पोरं जेमतेम एक गाडी भंगारातून आणून तोडतात आणि चॅनेलवाले सत्तर वेळा दाखवतात! चार मिनिटांत सत्तर गाड्या तोडण्याचं तुमचं टेकनिक काय आहे?
- आमच्या डोक्यातली "टकटक' बंद झाली असून, "ठणठण' चालू झाली आहे. आणखी दोन बुचं "दुनियादारी'ची मारणं आलं! असो.
शनिवार, 3 अगस्त 2013
गुरुवार, 1 अगस्त 2013
दुनियादारी- चेन्नई एक्सप्रेसमधील वाद मिटला
मुंबई- एक पडदा (सिंगल स्क्रीन) चित्रपटगृहांमध्ये संजय जाधव दिग्दर्शित
'दुनियादारी' आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'चेन्नई एक्सप्रेस' या दोन्ही
चित्रपटांचे खेळ विभागून दाखविण्याचा तोडगा काढण्यात आला आहे.
दोन्ही चित्रपटांच्या कलाकारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर या मुद्द्यावर सामोपचाराने मार्ग काढला. यावेळी 'चेन्नई एक्सप्रेस'चा दिग्दर्शक रोहित शेट्टी, 'दुनियादारी'चा नायक स्वप्नील जोशी व इतर सहकारी उपस्थित होते.
सुहार शिरवाळकर यांच्या कादंबरीवर बेतलेला 'दुनियादारी' हा मराठी चित्रपट सर्वत्र बॉक्स ऑफिसवर चांगला चालला असतानाच 9 ऑगस्ट रोजी (शुक्रवार) रोहित शेट्टीचा 'चेन्नई एक्सप्रेस' प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मुंबईतील 19 एक पडदा चित्रपटगृहांमध्ये 'दुनियादारी'चे खेळ बंद करून 'चेन्नई एक्सप्रेस' दाखविण्यात येणार होते. 'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये शाहरुख खान व दीपिका पदुकोन यांची प्रमुख भूमिका आहे.
दरम्यान 'दुनियादारी'चे खेळ बंद करण्यात येऊ नयेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आज यावर तोडगा काढण्यात आला.

बुधवार, 31 जुलाई 2013
म्हणे मुंबई वेगळी करा !
मुंबई - तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या घोषणा झाल्यावर प्रख्यात लेखिका शोभा डे यांनी "मग मुंबई का वेगळी नको?' अशी प्रतिक्रिया वादग्रस्त ट्विटरद्वारे व्यक्त करताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, असे वादग्रस्त ट्विट शोभा डे यांनी केले. शोभा डे यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्राच्या सर्वत्र सर्व भागांतून जोरदार टीका सुरू झाली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी तब्बल 105 हुतात्मे झाले. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रातील लोकांना करावी लागली. हा इतिहास बाजूला सारून शोभा डे यांनी हुतात्म्यांचा अपमान केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.
शोभा डे यांनी, "महाराष्ट्र ऍण्ड मुंबई??? व्हाय नॉट? मुंबई हॅज ऑल्वेज फॅन्सिड इटसेल्फ ऍज ऍन इंडिपेंडंट एन्टिटी. एनी वे, धिस गेम हॅज काऊंटलेस पॉसिबलिटिज' (महाराष्ट्र आणि मुंबई? मुंबईने नेहमीच आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. अर्थात, हा मोजता न येणाऱ्या शक्यतांचा खेळ आहे.) असे ट्विट केले होते. त्यावर राज ठाकरे यांनी मुंबई वेगळी करणे हे "घटस्फोट" घेण्याइतके सोपे नाही, अशी टीका केली, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शोभा डे यांच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा खटला भरणे आवश्यक असल्याची आक्रमक प्रतिक्रिया दिली. ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, अशा लोकांकडूनच अशी प्रतिक्रिया येऊ शकते, असे ते म्हणाले. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीमागे मोठा इतिहास आहे. त्यासाठी 105 हुतात्मे झाले. अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी शोभा डे यांनी हा इतिहास वाचायला हवा होता, असे नवाब मलिक म्हणाले.
'निवडणुका जवळ आल्या की असे (तेलंगणची स्थापना) सवंग लोकप्रियतेचे निर्णय आणि घोषणा होतात. त्याची खिल्ली उडविण्यासाठी आपण ही प्रतिक्रिया दिली आहे. मला महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी नको आहे. '' - शोभा डे, लेखिका

... तर 'चेन्नई एक्स्प्रेस'ला मनसे स्टाईलने विरोध!
'चेन्नई एक्स्प्रेस'साठी मुंबईतील एक पडदा
चित्रपटगृहातून 'दुनियादारी' हा मराठी चित्रपट काढायला लावला, तर राज्यात
चेन्नई एक्स्प्रेस प्रदर्शित होऊ देणार नाही. मनसे स्टाईलनी राज्यात या
चित्रपटाला विरोध केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट
कर्मचारी सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी बुधवारी दिला. अभिनेता
शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला चेन्नई एक्स्प्रेस हा चित्रपट येत्या
आठ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. मात्र, एक पडदा चित्रपटगृहचालकांना हा
चित्रपट हवा असेल, तर त्यांनी त्याचे प्रतिदिन चार शो दाखविले पाहिजेत,
अन्यथा हा सिनेमा त्यांना देणार नाही, अशी भूमिका या चित्रपटाच्या
वितरकांनी घेतलीये. हा चित्रपट घ्यायचा असेल, तर एक पडदा
चित्रपटगृहचालकांना दुनियादारीचे शो थांबवावे लागतील. चेन्नई
एक्स्प्रेसच्या वितरकांच्या मनमानीपणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र
नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आंदोलन करेल, असे खोपकर यांनी स्पष्ट
केले.
सदस्यता लें
संदेश (Atom)