'चेन्नई एक्स्प्रेस'साठी मुंबईतील एक पडदा
चित्रपटगृहातून 'दुनियादारी' हा मराठी चित्रपट काढायला लावला, तर राज्यात
चेन्नई एक्स्प्रेस प्रदर्शित होऊ देणार नाही. मनसे स्टाईलनी राज्यात या
चित्रपटाला विरोध केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट
कर्मचारी सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी बुधवारी दिला. अभिनेता
शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला चेन्नई एक्स्प्रेस हा चित्रपट येत्या
आठ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. मात्र, एक पडदा चित्रपटगृहचालकांना हा
चित्रपट हवा असेल, तर त्यांनी त्याचे प्रतिदिन चार शो दाखविले पाहिजेत,
अन्यथा हा सिनेमा त्यांना देणार नाही, अशी भूमिका या चित्रपटाच्या
वितरकांनी घेतलीये. हा चित्रपट घ्यायचा असेल, तर एक पडदा
चित्रपटगृहचालकांना दुनियादारीचे शो थांबवावे लागतील. चेन्नई
एक्स्प्रेसच्या वितरकांच्या मनमानीपणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र
नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आंदोलन करेल, असे खोपकर यांनी स्पष्ट
केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें