मुंबई
- बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल मी नितीश कुमार व
लालूप्रसाद यादव यांचे अभिनंदन करतो. आता त्यांनी महाराष्ट्रात येणारे
बिहारी नागरिकांचे लोंढे थांबवावेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज
ठाकरे म्हणाले, की प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सामाजिक न्याय या
त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा हा विजय आहे. आता त्यांनी बिहारचा विकास
इतक्या गतीने करावा, की महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवावेत. तसेच
विकासाची दिशा अशी असावी की बिहारमधून बाहेर गेलेले बिहारीही परत बिहारकडे
यावेत. विजयाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.
Slow Android Phone? Click Here
Slow Android Phone? Click Here
बिहार
विधानसभा निवडणूकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी 150
पेक्षा अधिक धावांवर आघाडीवर आहे. तर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) 80
जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर बिहारमधील
जनतेने पुन्हा विश्वास ठेवला आहे आणि पुढील मुख्यमंत्री नितीश कुमारच
असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
No Need to worry about Clearing Browser History
No Need to worry about Clearing Browser History