मुंबई
- दहिहंडीबद्दल सध्या जे सुरू आहे. हे अंत्यत चुकीचे आहे. हे तर सण बंद
करण्यचे षडयंत्र आसल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार
परिषदेत केली.
दहिहंडी
या सणावरून सध्या सरकार, न्यायालय आणि राजकीय पक्ष यांच्यात जोरदार
खडाजंगी सुरू आहे. राज ठाकरे यंनी ही यात उडी घेतली आहे. आजच्या पत्रकार
परिषदेत त्यांनी न्यायालयाच्या हेतूबद्दल शंका निर्माण केली. ते
म्हणाले की, न्यायालयाच्या हेतू बद्दलच शंका उपस्थित होते. न्यायालयाने
मंडळांची बाजू ऐकून घेतली नाही. ती घ्यायला हवी होती. हा विषय न्यायालयात
जातोच कसा असा सवाल करताना सरकार नियमावली जाहिर करू शकले असते, असेही ते
म्हणाले.
सरकार
जितके लक्ष दहीहंडीवर देत आहे. तितके लक्ष इसिसवर द्यावे, असा सल्लाही राज
यांनी सरकारला दिला. न्यायलय या विषयावर लगेच निर्णय देते आणि आम्ही
केलेल्या टोल विरोधातील याचिकेवर निर्णय लागत नाही. अजून तारीखही मिळत नाही
आणि याचा मात्र निर्णय लगेच लागतो, असेही राज म्हणाले. हे
सरकारचं पळकुटे धोरण आहे. त्यांना निर्णय घ्यायचे नाहीत म्हणून हे सुरु
आहे. याबाबत सरकारनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. या घडामोडीवरून असे वाटते
कि हे सण बंद करण्याचं षडयंत्र आहे का? असा सवाल राज यांनी केला. पूर्वीप्रमाणेच
जशी दही हंडी साजरी होत होती तशी यंदा ही होणार. खरे तर या विषयात
न्यायालयानेने यायला नको होते. काळजी घेतली पाहिजे. असे बोलून ते म्हणाले
की अपील मी केले आहे. पण माझ्यावर अवमान खटला दाखल करण्याआधी न्यायालयाने
दूसरी बाजू ऐकली होती का आणि तरीही माझ्यावर अवमान खटला दाखल करायचा असेल
तर करा. मंडळांवर कारवाई सुरु केली, तर हे प्रकरण भडकेल. अपघात होऊ नये असं
मला पण वाटते. हा माझ्या पक्षाचा विषय नाही. सणांचा विषय आहे. कायदा आणि
सुव्यवस्था सरकारने बघावी. सुरक्षेची काळजी घेऊन थर लावावेत असे मी
मंडळांना सांगितले आहे. सराव असेल तितकेच थर लावा हे ही मी सांगितले. आता
सरकारनीही जास्त ताणु नये असेही ते म्हणाले.