राज ठाकरेंसह वृत्तवाहिनीविरुद्ध गुन्हा दाखल
- वृत्तसंस्था
Wednesday, February 15, 2012 AT 01:54 PM (IST)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राज ठाकरे आणि मराठी वृत्तवाहिनीविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन
केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर राज ठाकरे आणि एका वृत्तवाहिनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री या वाहिनीवर राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. कलम १८८ अंतर्गत आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आचारसंहितेनुसार निवडणुकीच्या ४८ तासांपूर्वी प्रचार संपविणे आवश्यक आहे. मात्र, राज ठाकरे एक वृत्तवाहिनीवर प्रचार करताना दिसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें