'मनसे'चे उर्दू प्रेम!
सकाळ वृत्तसेवा
Friday, August 20, 2010 AT 12:30 AM (IST)
मुंबई - मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमझान महिन्यात राजकीय पक्षांचे नेते या समाजाला दरवर्षी "मुबारक' संदेश देतात. इफ्तार पार्टी, होर्डिंग्जच्या माध्यमातून या शुभेच्छा असतात. पण यंदाच्या रमझान महिन्यात मोहम्मदअली रोड येथे "मनसे' ने उर्दू भाषेतून शुभेच्छा संदेशांचे फलक लावल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जुन्या उमरखाडी तालुक्यासह नवीन मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ तयार झाला. या तालुक्यातला बहुतांश मतदार मुस्लिम आहे. या विभागात कोकणी मुसलमानही मोठ्या प्रमाणावर राहतात, तरीदेखील मराठीतून एकही होर्डिंग्ज न लावता सर्व फलक उर्दू भाषेतून लावल्यामुळे तो एक चर्चेचा विषय झाला आहे. पूर्वी मनसेने दक्षिण मुंबई विभाग अध्यक्ष आणि त्यातील सहा तालुक्यांना उपविभाग अध्यक्ष अशा नेमणुका केल्या होत्या. पण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या उपविभाग अध्यक्षांना "बढती' देऊन विभाग अध्यक्ष केले. त्यामध्ये मुंबादेवी तालुक्यात शरीफ देशमुख या कार्यकर्त्याला विभाग अध्यक्षपदाची "सुभेदारी' देऊन मुस्लिमबहुल विभागाला मुस्लिम पदाधिकारी या अन्य पक्षांच्या फॉर्म्युलाचे अनुकरणच केले गेले.
एकूण 15 ते 20 छोट्या-मोठ्या होर्डिंग्जवर राज ठाकरे चक्क "सूट-टाय' या "साहेबी' पोशाखात दिसत आहेत. सोबत विधानसभेचे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनाही कॉर्पोरेट लुक देण्यात आला आहे. नेहमीच झब्बा पायजमा या पारंपरिक किंवा शर्ट-पॅन्ट या नॉर्मल कपड्यांत दिसणारा आपला नेता सुटामध्ये पाहून कार्यकर्तेही भुवया उंचावताना दिसत आहेत. मनसेचे मुंबादेवी तालुका अध्यक्ष म्हणतात, स्थानिक नागरिकांना मराठी भाषा कळत नसल्याने त्यांच्याच आग्रहाखातर हे फलक उर्दूतून आहेत. रहिवासी म्हणतात आम्हाला मनसेचे धोरण आवडते. राज ठाकरेंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पण आम्हाला तुमच्या पार्टीच्या स्थानिक उपक्रमांबद्दल काही कळत नाही.' या भागात बहुतांश कोकणी मुसलमान आहेत की ज्यांना मराठी उत्तम येते आणि अशी इंग्रजी माध्यमातून शिकलेली युवा पिढी आहे की ज्यांना उर्दू येतच नाही. मागील वर्षी भाजपच्या तत्कालीन आमदाराने कुलाबा तालुक्यात मोडणाऱ्या कॉफर्ड मार्केट भागात रमझान मुबारकचे फलक लावले होते, पण निवडणूक हरल्यानंतर या वर्षी त्यांचे फलक काही दिसत नाहीत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें