मराठीतून शपथ घ्या-राज ठाकरेंचे आमदारांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 09, 2009 AT 12:44 AM (IST)
मुंबई - मराठी संस्कृतीचा आदर राखण्यासाठी राज्यातील आमदारांनी मराठीतूनच शपथ घ्यावी, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व २८८ आमदारांना पाठविले आहे. राज्यातील नवनिर्वाचित आमदार सोमवारी आणि मंगळवारी विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार आहेत. त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
मनसेचा गटनेता निवड करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे सर्व आमदार मराठीतच शपथ घेतील, असे सांगितले होते. त्याचवेळी जो आमदार मराठीतून शपथ घेणार नाही, त्याला आमचे आमदार योग्य उत्तर देतील, असेही त्यांनी बजावले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें