महापालिका निवडणुकांत तिकिटांसाठी मनसे तीन परीक्षा घेणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 19, 2010 AT 12:15 AM (IST)
ठाणे - 2011 मध्ये होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसेचे तिकीट मिळविण्यासाठी उमेदवारांना तीन परीक्षा द्याव्या लागतील. या परीक्षेत पास झाल्याशिवाय तिकीट मिळणार नाही, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
"नवनिर्माण करिअर ऍण्ड रिसर्च अकॅडमी'तर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कवी अशोक नायगावकर, पत्रकार राजू परुळेकर व पत्रकार संदीप आचार्य यांनी ही मुलाखत घेतली.
ठाकरे म्हणाले, ""महापालिकेतील अनेक नगरसेवकांना पालिकेतील कामकाज कळत नाही. प्रत्येक पालिकेत दोन-पाच मोजके लोक बोलतात; बाकीचे थंड बसतात. त्यांना काहीच समजत नाही. अशा व्यक्तींवर आपण शहराची व्यवस्था सोपवितो. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी पालिका निवडणुकांचा सिलॅबस तयार केला आहे. मनसेच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळविण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल; मात्र पास झाल्यानंतरही मी निवडेन तोच उमेदवार असेल.
मुलांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ""आत्महत्येशिवाय इलाज वाटत नाही, असे वाटत असेल, तर शिक्षणमंत्र्यांच्या मुस्कटात मारावी. राज्याला शैक्षणिक धोरण नाही. सर्वाधिक शिक्षणसंस्था महाराष्ट्रात असून, आत्महत्याही महाराष्ट्रात होत आहेत. "शिक्षणाच्या आयचा घो' या चित्रपटावरून गदारोळ होत असताना चित्रपटात काय म्हटले आहे, तेही पाहायला हवे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें