राज ठाकरे साहित्य संमेलनाला येणार
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 20, 2010 AT 12:15 AM (IST)
ठाणे - ठाण्यात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण आयोजकांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कृष्ण कुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिले. या वेळी संमेलनाचे प्रमुख सल्लागार मा. य. गोखले, प्रमुख कार्यवाह विद्याधर ठाणेकर आदी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी आपण संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांना सांगितले. राज ठाकरे यांनी संमेलनाच्या तयारीबाबत आयोजकांशी चर्चा केल्याचे विद्याधर ठाणेकर यांनी सांगितले.
तर, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही संमेलनाला येणार असल्याचे निमंत्रण देण्यास गेलेल्या आयोजकांना सांगितले आहे. याशिवाय इतर राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही आयोजकांनी निमंत्रण दिले असून, संमेलनात साहित्यिकांबरोबर राजकीय नेत्यांची उपस्थितीही दिसणार आहे.
ग्रंथदिंडीचे उद्घाटनसंमेलनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथदिंडीचे उद्घाटन (ता. 24) खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. ही ग्रंथदिंडी जनकवी पी. सावळाराम यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें