बुधवार, 19 अक्तूबर 2011
'राज्यातील पालिकांमध्ये मनसे सत्तेवर येणार '
'राज्यातील पालिकांमध्ये मनसे सत्तेवर येणार '
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 20, 2011 AT 01:15 AM (IST)
मुंबई - येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाकडे पक्षप्रमुख आणि पदाधिकारी महापालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच पाहत आहेत. मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी पदवीधर मतदारसंघाची नोंदणी मोठ्या संख्येने करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवीत मुंबईसह इतर महापालिका या वेळी जिंकणारच, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मंगळवारी (ता.18) दुपारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मनसेचे मुंबईतील विभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाखाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त संख्येने मतदार नोंदणी करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी या वेळी केले. कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेत सत्ता येता येता राहिली आहे; पण मुंबई, ठाण्यासह इतरत्र होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसे विजयी होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज यांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी चढाओढ लागणार आहे. कारण याच नोंदणीच्या बळावर महापालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारीची मागणी करणे या पदाधिकाऱ्यांना सुलभ होणार आहे. खडकवासल्याच्या निवडणुकीत मनसेचा उमेदवार नसल्याने निसटता का होईना; पण भाजप- शिवसेना- रिपब्लिकन महायुतीला विजय मिळाला आहे. या उलट मुंबई आणि ठाण्यात मजबूत प्रभुत्व असलेल्या मनसेच्या शिलेदारांबरोबर महायुतीच्या प्रत्येक शिपायाला लढावे लागणार आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसकडून आपला गड कायम राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा वातावरणात आतापासूनच मनसेच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश राज यांनी दिल्याने महापालिकेच्या "कॉंटे की टक्कर'चा कोणाला फायदा होणार, याबद्दल सध्या केवळ अंदाज बांधले जात आहेत.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें