राज ठाकरेंची आज षण्मुखानंदमध्ये राजकीय आतषबाजी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 19, 2011 AT 01:00 AM (IST)
मनसे आमदार नितीन सरदेसाई यांनी माहीम कॉजवे येथे आयोजित केलेल्या कोळी महोत्सवाचे आज राज ठाकरे यांनी उद्घाटन केले. यावेळी जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी या अभिनेत्यांसह आमदार बाळा नांदगावकर, शिक्षक सेनेचे संजय चित्रे आदी उपस्थित होते. या भूमिपुत्रांच्या महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत, असे राज यांनी सांगितले. या खाद्यमहोत्सवात राज यांच्यासह त्यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशीही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें