बेळगावप्रश्नी नितीन गडकरींशी चर्चा - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 21, 2011 AT 12:57 PM (IST)
नागपूर - बेळगाव सीमाप्रश्नी भारतीय जनता
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी प्रवासादरम्यान विमानात
चर्चा केली असल्याचे, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी हि माहिती दिली. कर्नाटकातील मराठी भाषिकांना कानडी आली पाहिजे, असे वक्तव्य करून चर्चेत आलेले राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
राज ठाकरे म्हणाले, ''नितीन गडकरी यांच्याशी मी चर्चा केली असून, ते या विषयावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्याशी चर्चा करणार आहेत. बेळगावप्रश्नी मी काय बोलतोय आणि सांगतोय हे न ऐकता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांकडून त्याचा विपर्यास केला जात आहे. नात्यांच्या चष्म्यातून राजकारणाकडे बघणे सोडून दिले पाहिजे. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष वेगवेगळे असून, यामध्ये दरवेळी भाऊबंदकी आणणे चुकीचे आहे. उद्धवबरोबर माझा वाद नसून, दोघांचे विचार वेगळे आहेत.'
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें