मंगलवार, 24 जुलाई 2012

आजपासून टोल भरू नका -राज ठाकरे

आजपासून टोल भरू नका -राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, July 24, 2012 AT 11:52 AM (IST)

मुंबई- राज्यातील पथकर नाक्‍यांवर (टोल नाके) मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहे. टोल वसुलीत कुठलीही पारदर्शकता नसून जनतेला केवळ ओरबडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेने आजपासून टोल भरू नये, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) केले.

पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले,""राज्यातील टोल नाक्‍यांची मनसेच्या कार्यकर्त्यांची काही दिवस पाहणी केली. तेथे दररोज येणारी वाहने आणि त्यांच्याकडून वसूल केला जाणारा टोल, याची नोंदणी केली. यावरून असे आढळून आले, की राज्यातील टोल नाक्‍यांवर सुरू असलेल्या टोल वसुलीत प्रचंड गैरव्यवहार सुरू आहे. टोल वसुलीत कुठलीही पारदर्शकता नाही. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना धाब्यावर बसवून टोल वसुली करीत जनतेची लूट करण्यात येत आहे. दोन टोल नाक्‍यांमध्ये 35 किलोमीटर अंतर असणे कायद्याने बंधनकारक असतानाही हा नियम पाळला जात नाही. टोल वसुलीतून जमा होणारा पैसा कुठे आणि कसा खर्च केला जातो, याची माहिती सरकारने आम्हाला दिलेली नाही. त्यामुळे जनतेने आजपासून टोल देणे बंद करावे. जनतेकडून जबरदस्तीने टोल वसूल करण्याचा प्रयत्न झाल्यास आमचे कार्यकर्ते टोल नाक्‍यांवर उभे राहतील. आम्हाला सरकारसोबत कुठलाही संघर्ष नको. परंतु, सरकारने बळजबरी केली तर तीव्र आंदोलन उभे करण्याची आमची तयारी आहे.''

राज पुढे म्हणाले,""मुंबई-पुणे मार्गांवर वसूल केला जाणारा टोल राज्यातील शिक्षकांच्या पगारांपेक्षा जास्त आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी जेवढा पैसा खर्च करण्यात आला त्यापैकी जास्त टोल वसूल केला गेला आहे. ही केवळ जनतेचे लूट आहे.''

पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली भेट आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील संघर्षावर बोलण्याचे टाळले



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें