बुधवार, 26 दिसंबर 2012

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला राज ठाकरे, आठवले

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला राज ठाकरे, आठवले

- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, December 27, 2012 AT 03:45 AM (IST)


मुंबई - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांना व्यासपीठावर बसण्याचा मान देण्यात आला होता. तसेच राज यांच्या शेजारी रामदास आठवले बसले होते.

उद्धव ठाकरे यांच्यासह रश्‍मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, लोकसभा नेते अनंत गिते, विधिमंडळ गटनेते सुभाष देसाई, स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यावेळी उपस्थित होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित आदी उपस्थित होते. मनसेच्या वतीने मंगळवारीच राज ठाकरे गुजरातला रवाना होणार असल्याचे कळविण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याबद्दल चर्चा सुरू होती. मात्र आज सकाळी सोहळ्याला उद्धव रवाना झाल्याने या चर्चेला विराम मिळाल्याचे मानले जात आहे.

व्यासपीठावर राज ठाकरे यांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशेजारी आसन देण्यात आले. महाराष्ट्रात महायुतीमध्ये मनसेचा समावेश झाल्यास बाहेर पडण्याचा इशारा आठवले यांनी यापूर्वीच दिला आहे. अशा वेळी दिल्लीच्या दिशेने घोडदौडीच्या तयारीत असलेल्या नरेंद्र मोदी यांनी राज आणि रामदास आठवले यांची आसनव्यवस्था जाणूनबुजून तर शेजारी केली नाही ना, अशी चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे राज यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर रामदास आठवले यांनी त्यांचे हस्तांदोलन करून स्वागत केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें