Raj Thakre Video
मुंबई - निलंबित आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांचे काका भाई ठाकूर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी नुकत्याच सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
भाईचे बंधू हितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. गेल्या विधानसभेची निवडणूक स्वतः न लढविता त्यांनी पुत्र क्षितिज ठाकूर यांना निवडून आणले होते. क्षितिज यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला. क्षितिज ठाकूर व सचिन सूर्यवंशी यांच्यातील वादविवाद विधिमंडळापर्यंत पोचला आणि सूर्यवंशी यांना विधान भवनातच आमदारांनी मारहाण केली. मात्र, या प्रकरणात पाच आमदारांचे निलंबन आणि अटक केवळ दोनच आमदारांना का, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता. निलंबन केवळ विरोधक आमदारांचेच का केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे न्यायालयीन कोठडीतून जामीन मिळाल्यानंतर क्षितिज यांनी राज यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.
- सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, March 29, 2013 AT 03:45 AM (IST)

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें