राज ठाकरेंना घरचा आहेर -
मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 12:30 AM IST
मुंबई - महाराष्ट्रात दुष्काळ आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने रद्द करा, अशी जाहीर भूमिका घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना घरचाच आहेर मिळाला आहे. त्यांची मुलगी उर्वशीने मुंबई इंडियन्सला पाठिंबा देत एका सामन्याला हजेरी लावली होती. हीच पोस्ट सध्या फेसबुकवर लोकप्रिय झाली असून, तो युजर्ससाठी चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या आठवड्यातील शनिवारच्या या पोस्टला फेसबुकरांनी चांगली पसंती दाखवत 233 वेळा शेअर केली आहे. त्यावर कमेंट्सही आल्या आहेत. जीन्स आणि टी शर्ट हीच का ती मराठी संस्कृती, असा सवालही फेसबुक पोस्टमधून केला आहे. मुंबई इंडियन्सचा टी शर्ट घातलेल्या उर्वशीसोबत आणखी काही जण फेसबुक पोस्टमध्ये आहेत. या पोस्टवरून मराठा आरक्षण विरोधापासून ते घरातील संस्कृतीपर्यंत राज ठाकरेंना सुनावले आहे. "आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट' अशा कमेंट्सपासून ते आधी घर सुधारा मग महाराष्ट्र, अशाही कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सनी या पोस्टवर राजकारण सुरू झाल्याने ते थांबविण्याचे आवाहन केले आहे
Please Subscribe my Youtube Channel Here
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें