नवी दिल्ली - संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रथमच प्रवेश करत असलेले भावी पंतप्रधान संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन सभागृहात आले.
लोकसभा
निवडणुकीत बडोदा आणि वाराणसीमधून निवडून आल्यानंतर मोदी प्रथमच संसदेत
पोचले आहेत. तसेच त्यांची भाजपकडून भावी पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात
आल्याने ते संसदेत पहिल्यांदाच थेट पंतप्रधान म्हणून प्रवेश करत आहेत.
यापूर्वी त्यांनी गुजरात विधानसभेत थेट मुख्यमंत्री म्हणूनच प्रवेश केला
होता.
आज सकाळी गुजरात भवनामधून संसदेत पोहचलेले
मोदी गाडीतून उतरताच पहिल्यांदा सभागृहाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले.
त्यानंतर त्यांनी नमस्कार करून संसदेत प्रवेश केला. संसदेत त्यांचे सर्व
निवडून आलेल्या खासदारांनी स्वागत केले व संसदीय नेतेपदी त्यांची निवड
करण्यात आली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें