नवी दिल्ली : "मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हू, की..''
भारताचे पंधरावे पंतप्रधान म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी
यांनी आज (सोमवार) शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणामध्ये सुरू
असलेल्या या सोहळ्यासाठी जवळपास चार हजार पाहुणे उपस्थित आहेत. यामध्ये
'सार्क'मधील आठ राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान
नवाझ शरीफ हेदेखील सोहळ्यामध्ये उपस्थित असून प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये
त्यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या शेजारचे स्थान देण्यात आले.
डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या बाजूस अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई
आहेत.
मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्यासह राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांनीही शपथ घेतली. तब्येत ठीक नसल्याने मोदी यांच्या मातोश्री हिराबा दिल्लीमधील सोहळ्यासाठी येऊ शकल्या नाहीत; मात्र, गांधीनगर येथील घरातून दूरचित्रवाहिनीवर त्यांनी हा सोहळा आवर्जून पाहिला. महाराष्ट्रातील खासदारांपैकी गोपीनाथ मुंडे आणि अनंत गीते यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें