मुंबई - राज्याच्या सर्वांगीण विकासाचे चित्र असा प्रचार केला जात असलेली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची "ब्ल्यू प्रिंट‘ येत्या 25 तारखेला जाहीर
होणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना
स्पष्ट केले.
राज्याच्या विकासाचा अंतर्भाव असलेली ब्ल्यू प्रिंट जाहीर होणार म्हणून अनेक तारखा आणि मुहूर्त सांगितले जात होते. वारंवार या तारखा आणि मुहूर्त पुढे गेले आहेत. त्यामुळे मनसेची ब्ल्यू प्रिंट नेमकी केव्हा जाहीर होणार याबद्दल चर्चा केली जात होती. खुद्द राज ठाकरे यांनीच या चर्चेला विराम दिला असून, 25 सप्टेंबरला मनसेची ब्ल्यू प्रिंट जाहीर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला मोठे उद्योगपती येणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. ही प्रिंट वेबसाइट तयार करून त्यावर टाकली जाणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें