मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या
पत्नी शर्मिला ठाकरे यांना घरातील पाळीव कुत्रा चेहऱ्याला चावल्याची घटना
घडली आहे. चेहऱ्यावर 65 टाके घालण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी आज
(बुधवार) दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिला ठाकरे यांना घरातील पाळीव कुत्र्याने चावा घेतला आहे. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चेहऱ्यावर तब्बल 65 टाके घालण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज‘ या निवासस्थानी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेच्या काही वेळ आधी ही घटना घडली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरे यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती.
दरम्यान, राज ठाकरे यांचे घरातील पाळीव कुत्र्यांवर प्रेम आहे. त्यांच्या घरामध्ये अनेक पाळीव कुत्रे आहेत. यामध्ये ‘पग‘, ‘जर्मन शेफर्ड‘ जातीचे कुत्रे आहेत. ‘बॉण्ड‘ नावाच्या कुत्र्याने शर्मिला ठाकरे यांना चावा घेतल्याचे समजते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें