मुंबई
- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून अद्याप बाहेर पडलेच नाहीत. मला
वाटलेले देशाचा विचार होईल, पण तसे होत नाही. भाजप सरकार फक्त दिखावूपणा
करण्यात हुशार आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे)
अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे म्हणाले -
- चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्यानंतर आता तो बदलण्यात आला. अशी बोटचेपी भूमिका त्यांनी अनेकवेळा घेतली आहे.
- शिवसेनेची भूमिकाच आतापर्यंत कळली नाही
- सरकारमध्ये राहून फायदे घ्यायचे नंतर सरकारविरोधी धोरणांबद्ददल बोलायचे आणि नंतर लोकांना दायवायचे की आम्ही सरकारमध्ये आहेत आणि विरोधी पक्षातही आहोत
- मेक इन इंडियाचा अर्थच मला आतापर्यंत लागला नाही
- गुजरातमध्ये सिंह प्रसिद्ध असल्यानेच मेक इन इंडियाचा लोगोमध्ये सिंह आहे.
- निव्वळ एमओयूवर सह्या होणे म्हणजे उद्योग येणे असे नाही
- मेक इन इंडियाच्या कार्यक्रमावर अमाप खर्च करण्यात आला
- मोदींना दर दोन महिन्यांनी असा एखादा कार्यक्रम घ्यावा लागतोच
- या कार्यक्रमात नशीब फक्त आगच लागली. स्फोट नाही झाला.
- उच्च न्यायालयाने सांगूनही यांनी काही ऐकले नाही. भाजप सरकार दिखावूपणा करण्यात व्यस्त आहे
- देशातील उद्योगपतींना प्रोत्साहन दिले पाहिजे, परदेशातील उद्योगपतींना आमंत्रण देऊन काय उपयोग?
- गुजरात आणि मुंबई यातून ते बाहेरच पडत नाही. मेक इन इंडिया मुंबईतच का घेतले, दुसऱ्या शहरांमध्ये असा कार्यक्रम का घेतला नाही?
- मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेनच का करण्यात आली?
भाजपविरोधात बोलले की देशद्रोही
देशविरोधी
कारवाई करत असतील त्यांना अटक करा. भाजपविरोधात बोलले की देशद्रोही
ठरविण्यात येते. तर, त्यांच्या बाजूने बोलले की देशप्रेमी ठरविण्यात येते.
काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करताना भाजपला लाज वाटली नाही का. त्यांनी
भारताविरोधात आंदोलने केली होती, पाकिस्तानचे झेंडे फडकाविले होते, यामध्ये
फक्त राजकारण करण्यात येत आहे. देशभक्तीचे प्रमाणपत्र भाजपने देण्याची गरज
नाही.
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें