गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही हे सरकारचे अपयश
कोपर्डी (जि. नगर) - गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेलीच नाही. हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. महिलांची छेडछाड आणि बलात्कारासारखे गुन्हे थांबविण्यासाठी आता ‘शरियत‘सारखा एखादा कायदा देशातही आणावा लागेल, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली.

ठाकरे यांनी आज सकाळी येथे येऊन
पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर ते गावकऱ्यांशी बोलत
होते. असे गुन्हे का होतात, हे तपासले पाहिजे, असे सांगून ठाकरे म्हणाले,
‘पीडित कुटुंबाची शस्त्र परवान्याची मागणी आहे. त्यांना तो मिळेलही; पण
तेवढ्यावर भागणार नाही. केवळ शस्त्रे हा यावर उपाय नाही. गुन्हेगारांवर
कायद्याचा धाक पाहिजे. कायदा राबविणाऱ्या सरकारची भीती असली पाहिजे. ती
गुन्हेगारांना नाही, हे सरकारचे अपयश आहे. सरकार बदलले; पण ते दिसत नाही.
कायद्याची भीती नसेल तर असे राज्य व देश चालणार नाही.‘‘
अशा
गुन्हेगारांना कायदा समजत नसेल, तर "शरियत‘सारखा एखादा कायदा भारतात येणे
आवश्यक आहे. त्यात असे कृत्य करणाऱ्यांचे हात-पाय तिथल्या तिथे छाटले
जातात. पुन्हा असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. अशा नराधमांना
हीच शिक्षा योग्य आहे, अशी आक्रमक भूमिका ठाकरे यांनी या वेळी मांडली. या
पीडित कुटुंबाला मदत मिळत असली तरी त्यांचे दुःख मोठे आहे. त्यांच्या
घरातील एखाद्याला तरी सरकारी नोकरी मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याची
ग्वाहीही त्यांनी दिली.
"ऍट्रॉसिटी‘चा धाक व
त्यामुळे इतर समाजांवर दहशत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले, त्यावर
ठाकरे म्हणाले, ‘या कायद्याचा कुणी गैरफायदा घेत असेल, तर त्यावर पर्याय
आणला पाहिजे. सरकारने त्याबाबत गांभीर्याने पावले टाकली पाहिजेत. सध्या
अधिवेशन सुरू आहे. त्यात काय होते ते पाहू.‘‘
माजी
आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, मनसे महिला आघाडीच्या
प्रदेशाध्यक्ष रिटा गुप्ता, प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, सोलापूरचे
जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रे, नगरचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे आदी उपस्थित
होते.
‘मुख्यमंत्री वेळ मारून नेतात‘
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच येथे येऊन गेले; पण ते कायमच वेळ मारून नेतात, असा आरोप करून राज ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री जे सांगतात, त्याची अंमलबजावणी आणि घोषणांची पूर्तता करीत नाहीत; पण या प्रकरणात त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करून घेण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.‘

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें