नाशिक- मुबलक असले की त्याची किंमत कमी होते. महाराष्ट्रातल्या सरकारलाही
माणसांची किमत वाटत नाही. त्यामुळेच सावित्री नदीवरील महाडचा पूल कोसळला.
त्यावर सरकारची प्रतिक्रीया देखील अशीच संवेदनहीन आहे. यावर ठोस काही तरी
झाले पाहिजे. घटना घडीली नेते, लोकप्रतिनिधी बोलतात व दोन चार दिवसाने
विसरतात हे किती दिवस चालणार? असा उद्वीग्न प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण
सेना प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय.
नाशिकला आलेल्या महापूरानंतर त्यांनी बुधवारी पुरग्रस्तांची भेट घेतली. नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. विविध नागीरकांचीीह विचारपूस करुन महापालिका पदाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. महाड येथील पूलाच्या दुर्घटनेबाबत त्यांनी सरकारी अनास्था विद्वीग्न करते असे सांगितले. "ज्यांनी पूल बांधले ते त्यांच्या देशात निघून गेलेत. पूलाचे आयुष्य संपल्याचे पत्र ते तेथून पाठवतात. अन् आपण त्याकडे अनास्थेने पाहतो. "लोकांच्या जीवाचे काही मोल आहे की नाही?. त्याचे मोल सरकारला वाटते की नाही?. लोकांनीही थोडे बदलावे. सत्तेत बसलेल्यांकडे, राजकारण्यांकडे उत्तर मागावे. प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करत रहावा.‘ असे त्यांनी सांगितले.
---------------------------------------------------------------------------
विधी मंडळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून झालेला गोंधळ हा सरकार व विरोधकांची मिलिजुली आहे. सरकारला नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांना उत्तरे द्यावी लागू नये म्हणून विदर्भाचा मुद्या भोवतीचं चर्चा फिरवून अधिवेशनाचे पाच-सहा दिवस घालविण्याची सरकारची चाल होती व त्याला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची सुध्दा साथ असल्याचा घणाघाती आरोप करीत राज ठाकरे यांनी विदर्भाच्या मुद्यावरून सुरु झालेल्या वादात उडी घेतली. अखंड महाराष्ट्र हिच मनसेची ठाम भुमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री विदर्भाचाच असल्याने त्यांना विकासाचा अनुशेष भरून काढण्याची संधी आहे. त्यांना थांबविले कोणी? असा सवाल त्यांनी केला.
गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून गोंधळ सुरु आहे. त्यावर मनसेच्या वतीने प्रथमचं ठाकरे यांनी भुमिका स्पष्ट केली. विदर्भ हा मुद्दाच नसल्याचे सांगताना, राज्यात शिक्षण, आरोग्य यासारखे अनेक प्रश्न आहेत. त्यापासून लक्ष हटविण्यासाठी हा वेळकाढूपणा सुरु आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें