मुंबई
: 'जगायचं कसं हा प्रश्न लोकांसमोर पडला आहे आणि तुम्ही त्यांना योगा
करायला सांगताय.. स्वच्छता करायला सांगताय.. कॉंग्रेस गेले आणि भाजप आले..
देशात फरक काय पडला? गेल्या साडेतीन वर्षांत फक्त नोटांचा रंग बदलला.
असलेल्या गोष्टी सुधारण्याऐवजी आम्ही काहीतरी नवीन गोष्टी आणतोय.
मेट्रोमुळे मुंबईची आणखी वाट लागली आहे. आता मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट
रचली जाणार नाही. बुलेट ट्रेन हवीच असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
गुजरातमध्येच ती फिरवावी.. यासंदर्भात जबदरस्ती करण्याचा प्रयत्न झाला, तर
आम्हीही प्रत्युत्तर देऊ' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सरकारला इशारा दिला.
मुंबईत एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि प्रशासनाची ढिलाई याविरोधात येत्या 5 ऑक्टोबर रोजी मनसे चर्चगेटला मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व राज ठाकरे करणार आहेत. 'या मोर्चात सर्व मुंबईकर आणि ठाणेकरांनी सहभागी व्हावे. या मोर्चांचे परिणाम होत असतात. हा गर्दीचा विषय नाही; राग व्यक्त करण्याचा आहे', असे आवाहन राज यांनी केले.
राज ठाकरे म्हणाले..

- काल घटनास्थळी मुद्दाम गेलो नाही. कारण तिथे जाऊन आपल्या यंत्रणेवर ताण देण्याची इच्छा नव्हती. पोलिस, फायरब्रिगेड, डॉक्टर त्यांची जबाबदारी पार पाडत असतात. पण तिथे मीडिया असते म्हणून सगळे पुढारी, मंत्री घटनास्थळी जातात. मदतकार्य सुरू असताना चिंतेचा आव आणून तिथे जाण्यात उपयोग नसतो.
- गेली दहा-पंधरा वर्षे याच एका एल्फिन्स्टन पुलाबद्दल भांडत आहेत; पण काहीही झालं नाही.
- आपल्या शहरांमध्ये इतक्या सरकारी संस्था काम करतात आणि सगळ्या संस्था आपापली जबाबदारी झटकत आहेत. कुणीही उत्तर द्यायला तयार नाही.
- कसलं 'मुंबई स्पिरीट'? रोज सकाळी उठून ऑफिसला जावंच लागतं.. त्याला पर्याय नाही.
- शहरांवर बाहेरचे लोंढे येऊन आदळणे थांबत नाहीत, तोपर्यंत अशा घटनांवर उपाय नाहीत. मुंबई, ठाणे, पुणे ही शहरे आचके देत आहेत. इथे पायाभूत सुविधाच नाहीत.
- रेल्वे स्थानकांची परिस्थिती सुधारण्यासाठी यंत्रणा नाही आणि आपण बुलेट ट्रेन आणायला चाललो आहोत.
- आपल्या देशात बाहेरचे दहशतवादी हवेच कशाला? आपणच आपली इतकी माणसे मारत असतो..
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें