मुंबई : "नाना, तू मराठी कलावंत आहेस. तू मला आवडतो. तू महाराष्ट्रावर
बोल. तो xxx निरूपम तुझे अभिनंदन करतो. यायचे नसेल आमच्याबरोबर येऊ नको.
मात्र मध्ये चोंबडेपणा कशासाठी करता. काय वस्तुस्थिती आहे हे कळत नाही.
फेरीवाल्याच्या मुद्दयावर सरकारशी बोललो आहे, हे माहिती न घेता अभिनेता
नाना पाटेकर आमच्यावर टीका करतो आहे. त्याने हे उद्योग प्रथम बंद करावेत,
असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिला.
मुंबईत आज सकाळी व्हीजेटीआय संस्थेत बोलताना नाना पाटेकर यांनी मनसेच्या फेरीवाल्यांसंदर्भातील भूमिकेवर टीका करताना फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का आणता, असा सवाल केला होता. नाना यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्यावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी त्यांचे अभिनंदनही केले होते.
नाशिक येथे जाहीरसभेत बोलताना राज यांनी फेरीवाल्यांच्या मुद्यावर नाना पाटेकर, काँग्रेसचे नेते संजय निरूपम आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. नाना पाटेकरांचा आपल्या ठाकरी भाषेत समाचार घेताना ते म्हणाले, की आज एकट्या मुंबईत दररोज साठ-सत्तर हजार लोक प्रवास करतात. त्यांची काळजी नानाला नाही. त्यांच्या गरीबीवर तो बोलत नाही. फेरीवाला दररोज शंभर रूपये हप्ता भरतो. गरीब कोण श्रीमंत कोण अशा व्याख्या जुळवायच्या कशा? आजपर्यंत सर्वांशी अनेकदा बोललो आहे. त्यानंतरही प्रशासन ढीम्म असेल तर आमचा हात उठणारच. जे अयोग्य आहेत त्याबद्दल बोलायचं नाही का? तो निरूपम नानाचे अभिनंदन करतो हेच मुळी चीड आणणारे आहे.
नाना पाटेकरांवर राज यांनी एकेरी भाषेत जोरदार हल्ला चढविला.
आज सगळीकडे झोपडपट्टीवाले दिसून येतात. ते ही बाहेरून येणार. परप्रांतियांच्या झोपडीला एक कोटी मिळणार, मात्र मराठी माणसासाठी काही नाही. प्रत्येक राज्य आपल्या माणसासाठी काम करतं. मी महाराष्ट्रासाठी काम करतो तेंव्हा तुम्ही आम्हाला शिव्या घालता. काय या शहरांची अवस्था आहे? फेरीवाल्यांसंदर्भातील निर्णयाबद्दल न्यायालयाचे अभिनंदन करतो. आमचा मामला सळेसोठ असतो. चुकीचे असेल तेंव्हा हाणणारच, असा इशारा राज ठाकरे पुन्हा एकदा परप्रांतियांना दिला.
राज म्हणाले, पुढच्या चार दिवसात मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी बोलविणार आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला, प्रत्येक वॉर्ड आफिसर, रेल्वे स्टेशन मास्तरच्या हातात न्यायालयाच्या आदेशाची प्रत द्यायची आहे. आता हे तर कायदेशीर आहे. पाटेकर मंडळी जर ऐकत असेल तर ते ऐकावे. फेरीवाल्यांना बेकायदा विक्री करता येणार नाही. फेरीवाले जर परत बसले तर अधिकाऱ्यांवर कंटेम्ट ऑफ कोर्ट टाकणार. फेरीवाल्यांना हटविण्याचे काम तुमचे किंवा माझे नाही. मात्र महाराष्ट्रासाठी जागता पाहरा आम्ही ठेवणार आहोत. अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडावी अन्यथा मला हाथ सोडायला लावू नये. गरीब बिचार फेरीवाला असले टूणटूणे बंद करा. फेरीवाल्या भाजीपाल्यांकडून भाजी घेण्याचे बंद करा. नागारीकांनी फेरीवाल्यांएेवजी दुकानात जावे.
जगाच्या पाठीवर असे काही घडत नाही. येथे मात्र सगळे घडते कसे. मी महाराष्ट्राला बोंबलून सांगतो आहे. परप्रांतियांमुळे शहरे विस्कळीत झाली आहे. रोज किती माणसं शहरांनी अंगावर घ्यायची असा संतप्त सवालही त्यांनी शेवटी केला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें