सोलापूर :
मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवरुन मनसे आणि
काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादात आता एमआयएमने उडी घेतली आहे. मनसे
अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा असल्याची टीका एमआयएमचे आमदार वारिस
पठाण यांनी केली आहे.
हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो, असं आव्हान एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.
मनसेने जर भायखळ्यात तोडफोड केली तर आम्ही त्याला जशाच तसे उत्तर देऊ. जशाच तसे उत्तर देण्याची आमची तयारी असल्याने ते आमच्या भागात येत नाहीत, असं वारिस पठाण म्हणाले. मनसेची तोडफोड म्हणजे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सुरु असलेली धडपड आहे, असं टीकास्त्रही वारिस पठाण यांनी सोडलं.
राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया, अशी टीकाही पठाण यांनी केली आहे. ईद-ए-मिलाद निमित्त सोलापुरात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पठाण मनसेवर बरसले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें