दारुगोळ्याची जमवाजमव की आणखी काही ?
गुढी पाडव्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलण्यासाठी राज ठाकरेंकडे पुरेसा दारुगोळा असणारच. त्यात प्रामुख्यानं फेरीवाल्यांचा मुद्दा असणारच आहे. पण त्यात फारसं नाविन्य नाही, याची जाणीव स्वतः राज ठाकरेंनाही असणार. त्यामुळंच त्यांनी विविध समाजघटकांच्या गाठीभेटी घेण्याची मोहीम उघडलीय. यात त्यांनी ज्या छगन भुजबळांवर वैयक्तिक पातळीवर टीकेची झोड उठवली होती, त्यांच्या सुटकेसाठी धडपडणा-या भुजबळ समर्थकांचीही भेट घेतली. याशिवाय शेतक-यांचे प्रश्नही जाणून घेण्याचा प्रयत्नही राज ठाकरेंनी केल्याचं दिसतं. हा सारा प्रकार पाहता राज ठाकरे आता चहूबाजूंनी सक्रिय होत असल्याचं दिसतंय. पण शरद पवारांबरोबरची भेट मात्र या सगळ्यांच्या पलिकडच्या चर्चेला सुरुवात करुन देणारी ठरु पाहतेय.
मनसे
अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत आतात. पण पुण्यातल्या शरद पवारांच्या
प्रकट मुलाखतीनंतर पुन्हा एकदा नियमित चर्चेत येऊ लागले. कधी शेतकरी
नेत्यांच्या भेटी घेऊन, तर कधी थेट शेतकरी मोर्चात सहभागी होऊन चर्चा करु
लागलेत. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीही भेट घेतली आणि
पुन्हा नवनव्या चर्चा आणि समीकरणांना उधाण आलं. मूळात राज ठाकरेंनी
काहीही केलं तरी चर्चा सुरुच होते, हे नाकारताच येणार नाही.
राज ठाकरे पुन्हा नियमित चर्चेत!
व्हीओ- राज ठाकरे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा गर्जणार आहेत. पण हे गरजणं नेमकं कशाकशावर असेल, यावर आतापासूनच आडाखे बांधले जात आहेत. पण हे आडाखे बांधण्याची काही गरज दिसत नाही. याचं कारण म्हणजे राज आणि त्यांची मनसे अलिकडच्या काळात ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना पाहायला मिळणं..... फेरीवाल्यांचा प्रश्न असो, की शेतक-यांचा मोर्चा असो, सगळीकडं मनसेचं अस्तित्व ठळकपणे पाहायला मिळू लागलंय. त्यामुळं शिवतीर्थवरही हेच मुद्दे प्रामुख्यानं येतील आणि त्यासाठीचा दारुगोळा जमवण्याची मोहीम त्यांनी उघडली असावी, असंच शरद पवारांबरोबरच्या भेटीवरुन वाटायला लागलंय. तोंडी लावायला केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरीही राज ठाकरेंच्या रडारवर असेलच.
दारुगोळ्याची जमवाजमव की आणखी काही ?
गुढी पाडव्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलण्यासाठी राज ठाकरेंकडे पुरेसा दारुगोळा असणारच. त्यात प्रामुख्यानं फेरीवाल्यांचा मुद्दा असणारच आहे. पण त्यात फारसं नाविन्य नाही, याची जाणीव स्वतः राज ठाकरेंनाही असणार. त्यामुळंच त्यांनी विविध समाजघटकांच्या गाठीभेटी घेण्याची मोहीम उघडलीय. यात त्यांनी ज्या छगन भुजबळांवर वैयक्तिक पातळीवर टीकेची झोड उठवली होती, त्यांच्या सुटकेसाठी धडपडणा-या भुजबळ समर्थकांचीही भेट घेतली. याशिवाय शेतक-यांचे प्रश्नही जाणून घेण्याचा प्रयत्नही राज ठाकरेंनी केल्याचं दिसतं. हा सारा प्रकार पाहता राज ठाकरे आता चहूबाजूंनी सक्रिय होत असल्याचं दिसतंय. पण शरद पवारांबरोबरची भेट मात्र या सगळ्यांच्या पलिकडच्या चर्चेला सुरुवात करुन देणारी ठरु पाहतेय.
भेट झाली, पण राजकीय नाही !
राज ठाकरे शरद पवार भेट झालीच नसल्याचं सुरवातीला सांगितलं जात होतं. पण नंतर ती झाल्याचं मान्य करण्यात आलं. मात्र हे मान्य करतानाच ही भेट झाली. ती पूर्वनियोजित होती, पुण्यातल्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमावेळीच ती ठरली होती, त्यावेळी फारसं बोलणं झालं नव्हतं, त्यामुळं ही भेट झाली, त्यात कसल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे एकापाठोपाठ एक खुलासे राज ठाकरेंकडून करण्यात आले. असा खुलासा केला गेला असला, तरी 40 मिनिटाच्या बैठकीत फक्त हवापाण्याच्याच गप्पा झाल्या असतील, असं मानायचं काही कारण नाही. त्यात कुठं ना कुठं नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्याप्रमाणं राज ठाकरेंनीही पवारांकडून कानमंत्र घेतला असणार, असंच राजकीय निरीक्षकांचं म्हणणंय. राज ठाकरेंच्या रडारवर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, फेरीवाले यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे आणि शिवसेनाही असणार आहे. अलिकडच्या काळात आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून याची झलक दाखवून दिलीच आहे.
....तोवर चर्चा रंगतच राहणार !
राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर लगेच उलटसुलट चर्चाही सुरु झालीय. अशाच चर्चा शरद पवार- नरेंद्र मोदी, शरद पवार-राहुल गांधी यांच्यातल्या भेटीनंतरही रंगल्या होत्या. नरेंद्र मोदींनी तर शरद पवारांना आपले गुरुच असल्याचं जाहीर केलं होतं. याही आधी शरद पवारांनी राज ठाकरेंना सकाळी लवकर उठण्याचा सल्ला जाहीरपणे दिला होता. त्यावर तो मान्य करत आपण आता सकाळी लवकर उठत असतो, हवं तर दररोज सकाळची सेल्फी पाठवत राहीन, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. आता आजच्या भेटीत पवारांनी राज ठाकरेंना नेमका कोणता कानमंत्र दिला, हे जोवर स्वतः राज सांगणार नाहीत, तोवर या भेटीबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरुच राहणार, हे नक्की

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें