नाशिक
: महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेराच्या क गटातील पोटनिवडणुकीत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैशाली मनोज भोसले यांचा विजय झाला. त्यांनी
शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांचा २३३३ मतांनी पराभव केला. विशेष
म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेे मनसेला पाठिंबा दिला.
भाजपच्या विजया लोणारी यांना तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. वैशाली भोसले यांना ७४५३, शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांना ५२३१, तर भाजपच्या विजया लोणारी यांना ४८१० एवढी मते मिळाली. निवडणुकीत उभ्या असलेल्या उर्वरीत सहा जणांचे अनामत रक्कम जप्त झाली.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी येथे मनसेची जागा असली तरी बहुतांश भाग भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी व्यापला असल्याकारणाने येथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होण्याची अपेक्षा होती. परंतु मतदारांनी पुन्हा भोसले कुटुंबीयांवर विश्वास ठेवत भाजपला नाकारले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें