राज ठाकरे यांना हवीय 'झेड' दर्जाची सुरक्षा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 26th, 2009 AT 10:09 PM
राज ठाकरे
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना यापूर्वी जीवे मारण्याच्या धमकीविषयीची माहिती पोलिसांना देऊनही त्यांना सरकारने 'झेड' दर्जाची सुरक्षा पुरवलेली नाहीच; उलटपक्षी त्यांची पूर्वीची सुरक्षाही काढून घेतलेली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात या निवडणूक कालावधीत राज्यभरातील प्रचारदौरे व सभांसाठी त्यांची सुरक्षा पूर्ववत "झेड' दर्जाची करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी राज्यपालांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. सद्यस्थितीत त्यांच्यासोबत दौऱ्याच्या वेळी कुठल्याही प्रकारचे सशस्त्र पोलिस सुरक्षा रक्षक नसल्याचेही, या पत्रात नमूद केले आहे.
राज ठाकरे यांची सुरक्षा पूर्वसूचना न देताच काढून घेणे, वारंवार मागणी करूनही त्यांना ती परत बहाल न करणे, मुंबईतील जातीय-धार्मिक दंगली, बॉम्बस्फोट अशा घटनांच्या वेळी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याची सुरक्षा व्यवस्था कमी न करता राज ठाकरे यांचीच सुरक्षा काढून घेणे यात त्यांचे खच्चीकरण करणे किंवा राजकीय पक्षाची खेळी तर नाही ना, अशी शंकाही मनसेने या पत्रातून व्यक्त केली आहे.
शनिवार, 26 सितंबर 2009
बुधवार, 16 सितंबर 2009
मराठी उमेदवाराचा आग्रह धरा - राज ठाकरे
मराठी उमेदवाराचा आग्रह धरा - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, September 16th, 2009 AT 1:09 AM
..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
मुंबई - मुंबई, ठाण्यात उत्तर भारतीयांना उमेदवारी द्या, अशी मागणी संजय निरुपम यांच्यासारखे नेते करीत आहेत; पण त्यांच्यासारखी भाषा कोणत्याही पक्षातील राजकारण्यांनी केली, तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा सणसणीत इशारा देतानाच कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सर्व पक्षांनी महाराष्ट्रातील मतदारसंघांत मराठी उमेदवारांचा आग्रह धरावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले.
मनसेच्या शिवडी-भायखळा विभागातर्फे राजनिष्ठ प्रतिनिधींची घोषणा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा परळ येथील दामोदर हॉलमध्ये आयोजित केला होता. या वेळी महागायिका वैशाली माडे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.
या वेळी राज ठाकरे यांनी निरुपम यांच्यावर टीकेची झोड उठविली. विधानसभा निवडणूक जवळ येताच त्यांना आता कंठ फुटू लागले आहेत. उत्तर प्रदेश, बिहारींची संख्या महाराष्ट्रात वाढली असल्यामुळे 40 उत्तर भारतीयांना उमेदवारी द्या, अशी मागणी ते करीत आहेत. निरुपम यांच्यासारख्यांना कोणी वाढविलं, असा अप्रत्यक्ष सवाल त्यांनी शिवसेनेचे नाव घेता केला. अशा प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अस्मितेचे पाणी दाखवा आणि त्यांचे अस्तित्व नष्ट करा, असेही राज म्हणाले.
शिवसेनेवर टीका
आमचा हा; तर तुमचा हा... तुमचा तो; तर आमचा हा... अशी स्पर्धा राजकीय पक्षांत सुरू आहे, अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेनेवर करताना राज म्हणाले, की आम्ही कोणावरही जाळे टाकलेले नाही, तर वैशाली माडे मनापासून मनसेमध्ये आली आहे. काही राजकीय पक्षांत कोणी सुनेला; तर कोणी मुलाला तिकीट देण्याचे उद्योग सुरू आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षात राहून काम केले, त्यांना संधी कधी मिळणार? माझा मुलगा समोर बसला आहे. मी त्याला व्यासपीठावर बोलावले असते. त्याच्या हस्ते बुके देऊन यांचा सत्कारही केला असता, असा टोला त्यांनी शिवसेनेला मारला. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांना व्यासपीठावर बसवून, त्यांच्या हस्ते आदेश बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला होता याकडे राज यांचा रोख होता.
'क्लास'ची चर्चा कशाला...
कोणी कुठे बसून प्रवास करतो याची चर्चा कशाला करता, तुम्ही इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करा, नाही तर बैलगाडीतून प्रवास करा. लोकांना त्याचे काहीही देणे-घेणे नाही, हा काही जणांचा लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रकार आहे, अशी टीका करतानाच तत्कालीन अर्थमंत्री मधू दंडवते यांच्या स्वावलंबनाची खिल्लीही त्यांनी उडविली

मंगलवार, 4 अगस्त 2009
शनिवार, 25 जुलाई 2009
गुरुवार, 9 जुलाई 2009
५० नको, तर १०० टक्के आरक्षण हवे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
मुंबई - रेल्वे भरतीमध्ये भूमिपुत्रांना १०० टक्के आरक्षण असले पाहिजे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली; तर रेल्वेच्या नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के वाटा मिळाला पाहिजे, अशी आपली मागणी कायम असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
रेल्वे भरतीमध्ये भूमिपुत्रांना ५० टक्के प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज लोकसभेत मांडली. रेल्वेमंत्र्यांच्या भूमिकेवर "सकाळ'शी बोलताना राज ठाकरे म्हणाले, की ५० टक्क्यांचा काय संबंध? ५० टक्के नाही; तर १०० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत. ५० टक्के भूमिपुत्रांना रेल्वे भरतीत सामावून घेतल्यास उर्वरित ५० टक्के उत्तर भारत, बिहारमधून महाराष्ट्रात येतील, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच ज्या राज्यात रेल्वे भरतीच्या परीक्षा झाल्या आहेत, त्या परीक्षांचे पेपर त्याच राज्यात तपासले गेले पाहिजेत, असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.
शिवसेना म्हणते ८० टक्के -
रेल्वे भरतीत भूमिपुत्रांना ८० टक्के वाटा मिळाला पाहिजे ही शिवसेनेची मागणी कायम आहे. राज्य सरकारचा तसा कायदा आहे. केंद्र सरकारनेही तसा कायदा करावा आणि प्रत्येक राज्यातील भूमिपुत्रांना रेल्वेत ८० टक्के आरक्षण द्यावे, असेही खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी या आज रेल्वेमंत्री झाल्या असल्या तरीही त्यांनीही पश्चिम बंगालमध्ये भूमिपुत्रांसाठी लढा दिला आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचा लढा काय असतो, हे त्यांना चांगले माहीत आहे, असा टोलाही खासदार राऊत यांनी मारला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आदी प्रत्येक राज्यात भूमिपुत्रांच्या आरक्षणाचा कायदा करावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ वृत्तसेवा
Friday, July 10th, 2009 AT 10:07 AM

रविवार, 5 जुलाई 2009
सदस्यता लें
संदेश (Atom)