रविवार, 3 जून 2018
शनिवार, 26 मई 2018
भाजपला दुटप्पीपणाचे परिणाम भोगावे लागतील - राज ठाकरे
चिपळूण
: कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला
नेऊन पुन्हा फडणवीस व मुनगंटीवार स्वंतत्र विदर्भाच्या घोषणा देत आहेत. या
दुटप्पीपणाचे परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागतील असा इशारा मनसे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
शनिवारी (ता.26) माधव सभागृहात मनसेच्या वतीने आयोजीत कार्यक्रमाच्या वेळी ते पत्रकाराशी बोलत होते. मत्स्यवसाय तंत्रज्ञान महाविद्यालय ही किनारपट्टीच्या विकासाची गरज आहे. स्थानिक गरजा ओळखून विकासाच्या संधी देण्याचे काम राज्याच्या नेतृत्वाचे आहे. पण मुख्यमंत्री हे महाविद्यालय नागपूरला पळवून नेत आहेत.
शासनाच्या सर्व योजना विदर्भात नेऊन पुन्हा फडवणवीस व मूनगुंटीवार स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत असल्याच्या क्लीपींग फीरत आहेत. या संकुचित विचाराने महाराष्ट्राचे काय भले होणार याचा विचार येत्या निवडणुकीत लोक नक्कीच करतील.पालघरमध्ये भैय्ये लोकांच्या मतासाठी भाजप नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मूख्यमंत्री आदीत्यनाथांना बोलावले. शेवटी मोदी हे एकच नाव वापरून व खोट बोलून किती दिवस चालणार. मोदी व शहा यांना निवडणुकीपूर्वी लोक ओळखत होते का हा प्रश्न आहे.
म्हणून आता पाहण्यामध्ये भाजपच्या जागा शंभरने कमी होणार हे स्पष्ट पणे मांडले जात आहे.जागा वाढवण्यासाठी भाजपावाले दंगली घडवून आणतील. पण गूजराथमध्ये पैसा व सत्ता असून काय झाले हे उदाहरण समोर आहेच.
पर्यायी नेतृव नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मनमोहनसींगापासून नरसींहाराव, देवगौडा पंतप्रधान होतील याचा अंदाज कूणालाच नव्हता.त्यामूळे पर्यायी नेतृत्व समोर येतच असते.
ईव्हीएम मशीनबद्दल पहिला आक्षेप आपण नोंदवला होता. शेवटी बटन दाबण्याची प्रक्रिया चुकू शकते. एका पक्षासमोरील बटन दाबल्यानंतर भाजपला मत नोंदवले जाते याचे क्लीपींग व्हायरल झाल्यावर आणखी काय पुरावे हवेत. काही वर्षापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ईव्हीएम मशीनबद्दल भरपुर टीका केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत भांडण गेले होते. आता तेच किरीट सोमय्या सत्ता आल्यापासून कुठे गायब आहेत असा टोला त्यांनी लगावला.या वेळी श्री.ठाकरे यांच्या समवेत पक्षाचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई व पदाधिकारी उपस्थित होते.
येत्या निवडणुकीत भाजपच्या शंभर जागा कमी होणार. गुजरातमध्ये सत्ता आणि पैसा असून काय झाले हे सर्वाना माहीत आहे. शेवटी मोदी या एकाच नावावर लोकांना किती दिवस फसवणार.या पूर्वी देशाच्या राजकारणात मोदी व शहा यांचे नाव तरी होते का हे लोकांना समजते. त्यामूळे हे लोक पर्यायी नेतृत्व दिल्या शिवाय राहणार नाहीत,असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.
ईव्हीएम मशीनच्या खोटेपणाबद्दल भाजपचे किरीट सोमय्या किती तरी वर्ष ओरडत होते. अगदी सर्वोच्च न्यायालयात भांडण पोहोचले होते.आता किरीट सोमय्या अचानक सत्ता आल्यापासून ईव्हीएम बद्दल गप्प का बसले आहेत असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

बुधवार, 23 मई 2018
गुरुवार, 17 मई 2018
मंगलवार, 8 मई 2018
"बुलेट ट्रेन'ला "मनसे'ची धडक
ठाणे
- केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
जाहीर विरोध दर्शवल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
त्यानुसार ठाण्यातील दिवा-शिळ भागात बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया
सुरू असतानाच सोमवारी सकाळी मोजक्या स्थानिकांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेने विरोध दर्शवत पोलिस बंदोबस्तात सुरू असलेला जमिनीच्या सर्वेक्षणाचा
डाव उधळून लावला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीनेही दिवा-म्हातार्डी गावात स्थानिक भूमिपुत्र आणि तहसीलदार, पोलिस, रेल्वे अधिकारी आदींची बैठक घेऊन जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत सर्व्हे करून देणार नसल्याची भूमिका घेतली होती.
दिवा-शिळ येथील शिळ, डवले, पडले, आगासन, बेतवडे, देसाई आणि म्हातार्डी या सात गावांतून बुलेट ट्रेन जात असून नियोजित स्थानक दिवा-म्हातार्डी परिसरात असल्याने भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचे पथक सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात दिवा-शिळ भागात आले होते. तेव्हा सरकारच्या या सर्वेक्षणाला मनसेने विरोध दर्शवत मोजणीसाठी आणलेले यंत्र उधळून लावत सर्वेक्षण बंद पाडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी सर्वेक्षणासाठी उपस्थित असलेले तहसीलदार अधिक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, गावकऱ्यांशी वेळोवेळी बैठका तसेच जिल्हास्तरावर चर्चा झाल्या आहेत. शिळ गावातील नागरिकांच्या मागण्या नाहीत. मात्र, म्हातार्डी येथील नागरिकांना जमिनीचे दर वाढवून देण्याची मागणी आहे. तरीही आंदोलन करणाऱ्या मनसेला प्रकल्पाची माहिती देऊन चर्चेतून मार्ग काढला जाईल.
दरम्यान, सकाळी बुलेट ट्रेनच्या सर्व्हेला विरोध दर्शविल्यानंतर सायंकाळी ठाणे तहसीलदार कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पुन्हा एकदा बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास विरोध दर्शवणाऱ्या घोषणा देत सर्वेक्षण होऊ देणार नसल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. मनसेच्या या आंदोलनाला मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनविसे अध्यक्ष संदीप पाचंगे, मनोहर चव्हाण, पुष्कर विचारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व बाधितांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून प्रशासनाने जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तरीही मनसेचा विरोध असेल तर त्यांना शासनाची भूमिका समजावून सांगितली जाईल.
- सुदाम परदेशी, प्रांताधिकारी, ठाणे.
पाठ फिरताच पुन्हा सर्वेक्षण
मनसेने बुलेट ट्रेनसाठी लागणाऱ्या भूमी सर्वेक्षणाला सोमवारी क्षणिक विरोध दर्शवल्यानंतरही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने मनसेची पाठ फिरताच पुन्हा पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे आता संघर्ष अटळ बनल्याची चिन्हे दिसत आहेत.

शुक्रवार, 4 मई 2018
भाजपमधील एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक ; राज यांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
उल्हासनगर : ''व्यक्ती बदलला की भूमिका बदलते. भाजपमध्ये एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्याकडून आज आणि भविष्यात धोके दिसत आहेत'', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. भाजपशी हातमिळवणी करणार का, या प्रश्नावर प्रथम भाजपला तर मोदीमुक्त होऊ द्या, असे राज ठाकरे म्हणाले.
उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये आज कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेत राज ठाकरे हे बोलत होते. ते म्हणाले, ''नरेंद्र मोदी यांची राजकीय भूमिका ही गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना नष्ट करण्याची आहे. विशेषतः शेतकऱ्यांबाबत बुलेट ट्रेनच्या नावावर बनावट सात बारा बनवून त्यांच्या जमिनी हडपल्या जात आहेत. नाणार प्रकल्प कोकणात येणार याबाबत स्थानिक अनभिज्ञ राहतात. पण परप्रांतीय व्यापाऱ्यांना अगोदरच कसे ठाऊक होते ? ते जमिनी विकत घेऊन मोकळे होतातच कसे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार आणि परप्रांतीय व्यापारी एकत्र आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
उल्हासनगर शहरात मनसेच्या नेत्यांनी एकही नगरसेवक नसताना विद्यमान शहर जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका तयार होत असल्याचे राज ठाकरे यांच्या निदर्शनास येताच त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय मनसे कामगार युनिटचे अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या युनिटचे काम, कब्रस्तानचा पाठपुरावा, एल बी टी गैरव्यवहार उघडकीस आणल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांची त्यांनी स्तुती केली. यापुढे सातत्याने सर्व शहरांना भेट देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिले.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, राजू पाटील, संदीप देशपांडे, सचिव सचिन मोरे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनी बंडू देशमुख, सचिन कदम, प्रदीप गोडसे, संजय घुगे, शैलेश पांडव, मनोज शेलार, शालिग्राम सोनवणे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावून लवकरच 'कृष्णकुंज'वर बोलवून पक्ष संघटनेचे धडे देणार असे सांगितले.
बुधवार, 2 मई 2018
सदस्यता लें
संदेश (Atom)