गुरुवार, 9 अप्रैल 2015

शोभा डेंना सेनेचा वडापाव, दहीमिसळ

मल्टिप्लेक्समधील मराठी चित्रपटांच्या प्राइम टाइमला विरोध करणाऱ्या स्तंभ लेखिका शोभा डेंना शिवसेनेने आपला अस्सल मराठमोळा 'प्राइम टाइम' दाखवायला सुरूवात केली आहे. डेंच्या घरावर मोर्चा काढत शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे. तसंच शिवसेनेने शेभा डेंना संध्याकाळपर्यंत झणझणीत दहमिसळ आणि गरमारम वडापाव खाऊ घालण्याचा इशाराही सेनेने दिला आहे. दरम्यान शिवसेनेने पाठवलेला वडापाव आपल्याला आवडला, असं ट्विट शोभा डे यांनी केलंय.  
बॉलिवूडमधील चित्रपटांच्या तुलनेत दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहता यावे, या हेतूने राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो सक्तीचा केला आहे. सरकारच्या या निर्णयावर शोभा डे यांनी विरोध करत ट्विटरवरून टीका केली. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत शोभा डेंना मराठी इंगा दाखवण्याचा पवित्रा घेतला आहे.

शिवसेनेने मुंबईत शोभा डेंच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन सुरू केले आहे. मोर्चामुळे शोभा डेंच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी दिलेल्या सुरक्षेचं शोभा डे यांनी ट्विट करत स्वागत केलं. आणि मला कुठलिही भीती वाटत नाही. मुंबई पोलिसांचे धन्यावाद, असं शोभा डे ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. शिवसेनेच्या मोर्चानंतर ४ आणखी एक मोर्चा येणार आहे. आणि ते संध्याकाळच्या नाशट्यासाठी काय आणणार याची उत्सुकता आहे, असं ट्विटही डे यांनी दुपारी केलं.

मराठी सिनेमा आणि मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष तुम्हाला आहे तर इथे राहताच कशाला? शोभा डेंचं वक्तव्य महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा अपमान करणारं आहे. बघाच तुम्ही. आम्ही शोभा डेंना आज संध्याकापर्यंत वडापावची चाव चाखवूच, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.