शनिवार, 16 जनवरी 2010

स्वतंत्र विदर्भास "मनसे'चा विरोध - राज ठाकरे

स्वतंत्र विदर्भास "मनसे'चा विरोध - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 17, 2010 AT 03:30 AM (IST)


पुणे - "स्वतंत्र विदर्भाची मागणी ही तेथील आम जनतेची मागणीच नाही, तर ज्यांना राजकारणात फारसे भवितव्य राहिले नाही, त्यांच्या अस्तित्वाची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वतंत्र विदर्भास पूर्णपणे विरोध असून येत्या काळात तो आम्ही दाखवून देऊ,'' असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

"रोटरी क्‍लब ऑफ पुणे लक्ष्मी रस्ता'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी ठाकरे यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, ""अजूनही बेळगाव-कारवार-निपाणी महाराष्ट्रात आलेले नाही, तोवरच तुम्ही महाराष्ट्राचा तुकडा पाडून मागता आहात? युती सरकारचा कालावधी सोडला, तर स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात कॉंग्रेसचेच राज्य आहे. दोन विदर्भाचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे विदर्भावर अन्याय कॉंग्रेसच्याच नेत्यांनी केला आहे. मग तुमच्यावर राजकीय अन्याय झाला, तर त्याचा राग महाराष्ट्रावर का काढताय? या नेत्यांचेच राजकारण विकासाच्या आडवे येते. मग मेंदूला रक्तप्रवाह होत नसेल, तर "डॉक्‍टर' बदलला पाहिजे. मुंडके छाटणे हा त्यावर इलाज होऊ शकतो का?''

अ"राज'कीय राज उलगडले
शिक्षण, वाचन, चित्रपट, संगीत अशा आवडीनिवडींपासून ते कौटुंबिक प्रश्‍नांवर ठाकरे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले, ""आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा अनेकांचे लेखन, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, सुधीर फडके यांचे संगीत मला मनापासून आवडते. रोज एक चित्रपट पाहिल्याशिवाय मी झोपत नाही. "गांधी,' "गॉडफादर' असे अनेक चित्रपट मी अनेकदा पाहिले असून काही चित्रपट तर शंभराहून अधिक वेळा पाहिले आहेत. संगीतकार असो की नेता, त्याने जगातील उत्तम ऐकले-वाचले पाहिजे. अन्यथा त्याच्या करिअरमध्ये तोचतोपणा येतो. श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व मी ऐकले आहे. मला स्वतःला मात्र मुद्दे काढून भाषण करणे जमत नाही.''
ते म्हणाले, ""एका पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे, हे माझ्यासाठी प्रचंड मोठे आव्हान होते. इतर कोणीही अशा परिस्थितीतून जाऊ नये, असे वाटावे, इतका त्रास अशा वेळी होतो. तसेच आता अनेक जण माझ्याकडे इतक्‍या अपेक्षेने पाहत आहेत, की त्या अपेक्षांचीच भीती वाटते. मी अजून काहीच केलेले नाही, तरीही अनेक जण माझ्या सभांना गर्दी करतात, सह्या घेतात. त्या सर्व अपेक्षांचे ओझे प्रचंड आहे.'' यावेळी दीपा भागवत, डॉ. परेश गांधी, डॉ. मिहीर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

हिंदीचा राग नाही; पण...
ठाकरे म्हणाले, ""कदाचित महाराष्ट्रातील चांगले हिंदी येत असलेल्या मूठभर राजकारण्यांमध्ये माझा समावेश होईल, इतके माझे हिंदी उत्तम आहे. एखाद्या शब्दात कोणत्या अक्षराखाली नुक्ता द्यायचा, हे मला ठाऊक आहे. वडिलांचा उर्दूचा उत्तम अभ्यास होता. त्यामुळे हिंदी कधी संपते आणि उर्दू कोठे सुरू होते, ते मला माहिती आहे. "मेरे पास मॉं है'ची तडफ मराठीतील वाक्‍यात येणार नाही आणि "मंत्रालयासमोर जोड्याने मारेन,'ची मजा हिंदीतील वाक्‍याला येणार नाही. प्रत्येक भाषेला आपले एक स्थान आहे. त्यामुळे हिंदीचा राग करण्याचा प्रश्‍नच नाही. पण महाराष्ट्रात मराठीच पाहिजे. हिंदी भाषेच्या आडून राजकारण मी चालू देणार नाही.'

बुधवार, 13 जनवरी 2010

Raj thakre on batti gul powerfull

'तुम्ही मराठीतच सुरवात करा' - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 14, 2010 AT 01:17 AM (IST)
पुणे - ''मराठी भाषा हीच जगाच्या पाठीवर आपली ओळख आहे आणि माझा लढा हा भाषेसाठीच आहे. रिक्षाचालक, भाजी विक्रेता किंवा अन्य कोणीही असो; तुम्ही त्याच्याशी बोलताना मराठीतच सुरवात करा... तोसुद्धा नंतर मराठीत बोलू लागेल...!''

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त प्रत्येक मराठी घरात अशा आशयाचे पत्र पाठविण्याचा संकल्प सोडला आहे. 'अक्षरधारा'च्या ३३९ व्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्‌घाटन आणि आचार्य अत्रे यांच्या अग्रलेखांच्या 'हार आणि प्रहार' या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अप्पा परचुरे आणि रमेश राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ''माझा लढा मराठी भाषेसाठीच आहे. कारण "मराठी भाषा बोलतो, तो मराठी' हीच जगाच्या पाठीवरची आपली ओळख आहे आणि भाषाच आपल्याला जिवंत ठेवते. इतकी समृद्ध असलेली मराठी भाषा संपत चालली असेल, तर ती दुर्दैवी बाब आहे. ती पुढे नेणे, हे माझे कर्तव्य आहे. ते मी मनापासून करीत आहे. देश तुटावा असे माझ्या मनातही येणार नाही. पण महाराष्ट्र वाढवावा, हा माझा हट्ट आहे.''

ठाकरे म्हणाले, ''२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस आहे. त्यानिमित्त प्रत्येक मराठी घरात पत्र पाठविणार आहे. भाजी खरेदी करताना, रिक्षात बसताना असे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मराठीतूनच बोलण्यास सुरवात करा, मग तेसुद्धा मराठीतूनच बोलू लागतील. महाराष्ट्रात अशा सर्व ठिकाणी मराठीचा वापर होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील. दाक्षिणात्य राज्ये असोत, की चीन-फ्रान्ससारखे देश; सगळेच आपल्या भाषेवर घट्ट असतात. खरे तर साहित्यिकांचे आणि माझे ध्येय एकच आहे. फक्त त्यांची आणि आमची भाषा वेगळी आहे. पण अनेकदा माझ्यावर चौफेर हल्ले होतात, तेव्हा "हे आपले मूल आहे,' असे समजून आमच्या चुका त्यांनी पोटात घ्याव्यात. "भारतमाता'सारखे चित्रपटगृह संकटात सापडते, तेव्हा सर्व कलाकार तेथे उभे राहतात. मग मुख्यमंत्र्यांनाही त्या प्रश्‍नाची सोडवणूक करावी लागते. त्याप्रमाणेच मराठीची गळचेपी होते, तेव्हा साहित्यिकांनी उघडपणे शक्‍य नसेल, तर दूरध्वनीवरून तरी आधार द्यावा.''

आचार्य अत्रे यांनी प्रत्येक क्षेत्रात जो पराक्रम गाजविला, तेवढा अन्य कोणत्याही साहित्यिकास जमलेला नाही. महाराष्ट्र आणि मराठी भाषेवर विलक्षण प्रेम करणारे ते जनतेचे वक्ते आणि जनतेचे साहित्यिक होते, असे मिरासदार यांनी सांगितले. लक्ष्मण राठिवडेकर यांनी आभार मानले. समीरण वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मंगलवार, 12 जनवरी 2010



Free Counter
Free Counter

रोजगारप्राप्तीसाठी "मनसे'ची पाठशाळा

रोजगारप्राप्तीसाठी "मनसे'ची पाठशाळा
सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, January 12, 2010 AT 12:15 AM (IST)

मृणालिनी नानिवडेकर
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिसरात निर्माण होणारे रोजगार परप्रांतीयांच्या हाती न जाता मराठी माणसाच्या ताब्यातच ठेवण्याची शिकवणी सुरू केली आहे. मात्र, ही शिकवण "मनसे स्टाइल' दणके-राड्यांची नसून नोकरी-रोजगार मिळविण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये अंगी बाणवण्याबद्दलची आहे.

राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्‍यांत "मनसे'ने रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाची स्थापना केली आहे. अलीकडेच नाशिकजवळ या विभागातील पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिवसेनेत असताना राज ठाकरे शिवउद्योग सेना, बेरोजगारांचा विधानसभेवरील मोर्चा अशा तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना हात घालतच प्रकाशात आले होते.

मराठी तरुणांच्या हाताला काम हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी आता "मनसे'चा रोजगार-स्वयंरोजगार विभाग काम करेल, असे पक्षाचे प्रवक्‍ते शिरीष पारकर यांनी स्पष्ट केले. निवडणुकीची दगदग संपल्यानंतर आता या कामाला नियोजनबद्ध प्रारंभ झाला असून, ताज्या शिबिरात भविष्यातील योजनांविषयी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक उद्योगात उपलब्ध रोजगारातील 80 टक्‍के नोकऱ्या स्थानिकांना दिल्या पाहिजेत, असा शासनाचा कायदा असून, शासनाचे ते परिपत्रक लागू करणे उद्योजकांना बंधनकारक करण्याचे मार्ग कोणते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. राज्याच्या विविध भागांत उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांची यादी "मनसे'कडे असून, ती त्या-त्या विभागातील प्रमुखांना देण्यात आली आहे. भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी सक्‍तीचा बडगा उभारतानाच मराठी माणसाने नव्या स्वरूपातले रोजगार व नोकऱ्या मिळविण्याच्या कौशल्यांचा अभ्यासक्रमही "मनसे'ने तयार केला आहे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख सुनील बसाखेत्रे हे स्वत: कामगार कायद्यातले तज्ज्ञ असून, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सल्लागार म्हणून त्यांचा लौकिक आहे. मराठी मुले सेवाक्षेत्रातील नव्या संधी मिळवायला बिचकतात हे लक्षात घेत "मनसे'च्या माध्यमातून लवकरच ठिकठिकाणी व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण, संगणकीय कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन याविषयीची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरात होतकरू तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल.

मुंबईत रिटेल सेवांना आवश्‍यक असणारे तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन पक्षाने यापूर्वीच सुरू केले असून, चार तासांच्या या शिकवणी वर्गाला हजर राहणाऱ्या तरुणांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. आता हा कार्यक्रम राज्याच्या सर्व भागांत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रोजगार-स्वयंरोजगार विभागाचा संघटक नेमण्यात आला आहे. ठाणे आणि पुणे येथे 15-20 जणांचा चमू सक्रिय आहे. पुणे येथील 80 टक्‍के नियुक्‍त्या पूर्ण झाल्या आहेत. नाशिक या "मनसे'च्या बालेकिल्ल्यातही विभागाचे काम सुरू झाले आहे. अमरावती, अकोला, नगर, जळगाव येथेही काम सुरू झाले असून, युवकांची मते मिळवायची असतील तर त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या नोकरीधंद्याबाबतच काहीतरी ठोस करणे राज ठाकरे यांना आवश्‍यक वाटत असल्याचे सांगण्यात येते.

सोमवार, 11 जनवरी 2010

राज ठाकरे ठरले 'युथ आयकॉन'

Tuesday, January 12, 2010 AT 01:05 AM (IST)


'ई सकाळ' आणि '५४३२१ एसएमएस सेवा' यांनी घेतलेल्या 'सांगा तुमच्या मनातील युथ आयकॉन' उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सर्वाधिक ५६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्याखालोखाल २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी विश्‍वास नांगरे-पाटील यांचे नाव 'युथ आयकॉन' म्हणून ऑनलाईन वाचकांनी आणि तरूणाईने 'एसएमएस'द्वारे सुचविले आहे. आज (१२ जानेवारी) युवा दिन. त्यानिमित्त आपल्या मनातील युथ आयकॉन कळविण्याचे आवाहन गेल्या आठवड्यात 'ई सकाळ'ने वाचकांना केले होते.

'ई सकाळ'वरील आवाहनाला जगभरातून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोणतेही विशिष्ट नाव समोर न ठेवता ऑनलाईन वाचकांना त्यांच्या दृष्टिने कोण 'युथ आयकॉन' वाटतो, हे सांगण्यास सुचविले होते. त्यातून या आवाहनावर जगभरातून सुमारे दीड हजार प्रतिक्रिया वाचकांनी 'ई सकाळ'वर पोस्ट केल्या. या प्रतिक्रियांमधून वाचकांनी सर्वाधिक संख्येने निवडलेल्या नावांवर '५४३२१ एसएमएस' सेवेमार्फत मतचाचणी घेण्यात आली. या दोन्ही प्रक्रियांमधून तरूणाईने त्यांच्या मनातील 'युथ आयकॉन'वर शिक्कामोर्तब केले. ठाकरे, नांगरे पाटील यांच्यासह क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर, अभिनेता अमीर खान, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी, समाजसेवक प्रकाश आमटे, 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी अशी एकूण दहा नावे 'युथ आयकॉन' म्हणून वाचकांनी सुचविली होती.