सोमवार, 23 दिसंबर 2013

अमिताभ- राज यांचा पुन्हा 'याराना'

मुंबई - उत्तर प्रदेशमधील गंगेवरही आमचे प्रेम असल्याचा दाखला देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आपला कोणताही वाद राहिला नसल्याचे जाहीर करून "झाले गेले "गंगे'ला मिळाले' असा जाहीर निर्वाळा देऊन बच्चन कुटुंबीयांबरोबर सुरू असलेल्या वादाला आज पूर्णविराम दिला.

विकासाच्या मुद्‌द्‌यावर विशेष यश मिळत नसल्याने मराठीच्या विषयावरून राज ठाकरे यांनी आक्रमक आंदोलन सुरू केल्याच्या काळात अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशची जाहिरात केली होती. तसेच, या राज्यात शाळाही सुरू केली होती. त्यावेळी राज यांनी त्यांच्यावर टीका करून अशी कामे करावयाची असल्यास यूपीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. अखेर अमिताभ यांनी माफी मागून हा विषय संपविला होता. या पार्श्‍वभूमीवर राज या सर्व वादावर कोणती भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता होती; पण त्यांनी षण्मुखानंद सभागृहात मनसेच्या चित्रपट सेनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून वादावर पडदा टाकला.

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांच्यावर देशभरातील लोक प्रांतापलीकडे जाऊन प्रेम करतात. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर हिंदीवरील प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अमिताभ असल्याची स्तुती राज यांनी या वेळी केली.

अमिताभ यांनी मराठीतून भाषणाला सुरवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले, ""स्टारडम हे क्षणिक असते. सत्तर- ऐंशीच्या दशकातील एक गोष्ट. त्यावेळी मी गाडी घेऊन निघालो होतो. तेव्हा चाळिशी- पन्नाशीतील एका सुपरस्टारला बसस्टॉपवर उभे असलेले पाहिले. त्यांनी फाटके कपडे परिधान केलेले होते. त्यांना पाहिल्यानंतर मी माझी गाडी थांबविली आणि त्यांना तुम्हाला कोठे सोडू असे विचारले; परंतु त्यांनी त्याकरिता नकार दिला. ते म्हणाले, मला प्रेक्षकांनी जेवढे प्रेम केले तेवढ्याचा मी धनी झालो. आता या परिस्थितीला मलाच तोंड द्यायचे आहे. त्यांनी माझ्याकडून मदत नाकारली. त्याच वेळी स्टारडम किती क्षणिक आहे याची प्रचिती मला आली.''

सचिन पिळगावकर यांनीदेखील महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले.

बुधवार, 20 नवंबर 2013

विचारांची भाषा समजत नसल्याने मी ठोकतो


गुरुवार, 21 नोव्हेंबर 2013 - 03:00 AM IST

नागपूर - प्रत्येक राज्याची स्वतःची अस्मिता असते. ती प्रत्येकाने जपलीच पाहिजे. याकरिता माझा आग्रह असून विचारांची भाषा समजत नसल्याने मी ठोकतो, असे रोखठोक मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात येऊन परप्रांतीयांनी स्वतःचे मतदारसंघ निर्माण केल्यास मी आडवा येईनच, असा इशारही त्यांनी यावेळी दिला.

मारवाडी फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार ग्रामगीताचार्य तुकारामदादा बेलूरकर यांना आज, बुधवारी राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज ठाकरे म्हणाले, "आजोबांनी एका लेखाला "दगलबाज शिवाजी' असे शीर्षक दिले. दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी त्यांचे व्याख्यान होते. आयोजकांनी त्यांना विरोध केला. प्रबोधनकार म्हणाले, "मला बोलू द्या, मग ठरवा.' ते व्यासपीठावर गेले आणि "मी दगाबाज नाही दगलबाज म्हणालो. दगलबाजचा अर्थ हुशार किंवा शूर असा होतो.' त्यावेळी शब्दसंपदा होती. वसंत कानेटकरांसारखे लेखन होत नाही आज. "हिंदू धर्मातील चुका परखडपणे मांडल्यामुळे पुण्यात प्रबोधनकारांची खोटी प्रेतयात्रा काढण्यात आली होती. तो प्रतीकात्मक निषेध होता; मात्र तोच विचार मांडणाऱ्या नरेंद्र दाभोलकरांना पुण्यात खरोखर मारण्यात आले आणि खरीच प्रेतयात्रा निघाली. यावरून कोणता समाज खरा पुरोगामी होता हे लक्षात येतं,' असेही ते म्हणाले.

रामकृष्णदादा बेलूरकर यांचा सत्कार करताना राज ठाकरेंनी त्यांना वाकून नमस्कार केला. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "माझ्या हस्ते सत्कार करू नका, कुणीतरी मोठा माणूस बोलवा असे आयोजकांना सांगितले होते; पण ऐकतील ते नागपूरकर कसले? पण बेलूरकर यांचा सत्कार करायला मिळणे, हा माझा सन्मान समजतो. "या जगात पाया पडावे असे पायच उरलेले नाहीत,' असे पु. ल. देशपांडे कुसुमाग्रजांच्या पाया पडताना म्हणाले होते. मला आज तसेच वाटले.' खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर खा. अजय संचेती, आमदार उल्हास पवार, गिरीश गांधी, रमेश बंग, सत्यनारायण नुवाल, मितेश भांगडिया, श्रीकृष्ण चांडक, अनिल राठी, विजय मुरारका यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.

सर्व भाषणे मराठीत...
गिरीश गांधी आणि उल्हास पवार अशा कार्यक्रमांमध्ये मराठीतच भाषण करतात, याचा सर्वांना अनुभव आहे; पण राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविल्यानंतर नितीन गडकरी अलीकडे जाहीर सभेत हिंदीत बोलतात. अजय संचेती यांच्या भाषणांना मोठ्या प्रमाणात हिंदीचा स्पर्श असतो. राज ठाकरे यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीमुळे मात्र एकाही वक्‍त्याच्या भाषणात हिंदी वाक्‍ये आली नाहीत. सर्व भाषणे मराठीतच झाली. याला "राज ठाकरे इफेक्‍ट'च म्हणावा लागेल.

"राजलीला'
* प्रत्येक वक्ता व्यासपीठावरील पाहुण्यांची नावे का घेतो? (शांतता)
* ही "नाव' घ्यायची जागा आहे का? (हशा)
* विचारांची भाषा समजत नाही, म्हणून मी ठोकतो (टाळ्या)
* मी मारले तर "का मारलं?'; सचिनने मारले तर "काय मारलं !' (हशा)
* "मारवाडी फाउंडेशन'चे "मराठी फाउंडेशन' करा (टाळ्या)
* परप्रांतीय मतदारसंघ तयार करतील, तर मी आडवा येणारच
* मराठीबद्दल मी बोललो तर संकीर्ण, दुसरे बोलले तर व्यापक?
* मराठवाड्यापेक्षा भुजमधील भूकंपग्रस्तांना महाराष्ट्रातून जास्त मदत (खंत)
* परखड बोला आणि माझ्यावरील केसेस तुम्ही घ्या

रविवार, 10 नवंबर 2013

'मनसेच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावधान

थेट संपर्क साधण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन
मुंबई - विदेशी कलाकारांना सोबत घेऊन काम करताना अथवा रस्त्यावर चित्रीकरण करताना मनसेच्या नावाखाली कोणीही पैशांची मागणी केल्यास थेट आपल्या स्वीय सहायकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. चित्रपट आणि दूरदर्शन व्यवसायातील निर्मात्यांनी मराठीचा अपमान होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काही दिवसांपासून मनसेच्या संघटनांकडून विविध कारणांमुळे चित्रीकरण बंद पाडले जात असल्याच्या तक्रारी राज यांच्याकडे आल्या होत्या. त्यावेळी काही घटनांमध्ये मनसेचा संबंध नसतानाही काही जणांनी मनसेच्या नावाचा वापर केल्याचे निदर्शनास आले होते. अखेर याची गंभीर दखल घेऊन राज यांनी थेट जाहीर आवाहन करून अशाप्रकारे कोणी पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्यास पक्षाकडे संपर्क साधण्यास सांगितले आहे. अशा प्रकारात मनसेचा कार्यकर्ता सापडल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. चित्रपट क्षेत्रातील वेशभूषाकार, प्रकाश योजनाकार, मदतनीस आदींनी एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे सुमारे 20 हजार सभासद आहेत. या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधातील काम सुरूच राहणार आहे, पण या संघटनेच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्यास हर्षल देशपांडे 9821023032, सचिन मोरे 9870000099 अथवा मनोज हाटे 9833555769 यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सोमवार, 28 अक्तूबर 2013

Shri Narendra Modi addresses BJP Hunkar Rally at Patna, Bihar

मनसेकडून लोहा नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा सुपडा साफ


नांदेड : लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत मनसेला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर राष्ट्रवादीचा मात्र सुपडा साफ झालाय.
लोहा नगरपरिषदेत राष्ट्रवादीच्या चिखलीकरांचं कायम वर्चस्व असतं, पण राष्ट्रवादीचं हे संस्थान मतदारांनी आता खालसा केलंय.

लोहा नगरपरिषदेच्या एकूण 17 जागांपैकी 9 जागा मनसेला मिळाल्या आहेत. यामुळे मनसे लोहा नगरपरिषदेत सत्ता स्थापन करू शकणार आहे.
मात्र राज्याच्या राजकारणात 'दादा'पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला आपलं खातंही उघडता आलेलं नाही.

राष्ट्रवादीचा सत्तेचा वाटेकरी असलेल्या काँग्रेसला मात्र 8 जागा मिळाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अमित देशमुख यांनी काँग्रेस प्रचारासाठी पुढाकार घेतला होता.

रविवार, 13 अक्तूबर 2013

एकमेकांची डोकी फोडण्यासाठी मनसेची स्थापना नाही

सोमवार, 14 ऑक्टोबर 2013 - 03:00 AM IST 

मुंबई : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना फटकावण्यासाठी मी पक्षाची स्थापना केली आहे. मराठी माणसांनी एकमेकांची डोकी फोडण्यासाठी नाही, असे खडे बोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.13) सुनावले. परळ येथील नरे पार्क क्रीडासंकुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. स्थानिकांना हवे असेल तर नरे पार्कवर क्रीडा संकुल होईलच, अशी ठाम भूमिका त्यांनी या वेळी मांडली.

या क्रीडा संकुलाच्या मुद्‌द्‌यावरून मनसे आणि शिवसेना आमने-सामने आले होते. मनसेच्या या प्रकल्पाविरोधात शिवसेनेने स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीमही सुरू केली होती. या पार्श्‍वभूमीवर आज सायंकाळी शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असताना सकाळी राज यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार होते. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष राज यांच्या भूमिकेकडे लागले होते. मात्र, त्यांनी हा वाद किरकोळ ठरवला.
स्थानिकांना नरे पार्क येथे क्रीडा संकुल नको असेल तर ते होणार नाही. मात्र, हवे असेल तर होईलच, असे ते म्हणाले.
या क्रीडा संकुलातील स्वीमिंग पूल परिसरातील धनदांडग्यांसाठी बांधले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्याचाही समाचार राज यांनी घेतला. या स्वीमिंग पूलमध्ये मराठी मुले-मुलीच डुंबतील. परप्रांतीय तेथे आल्यास त्यांना बाहेर काढू, असा टोला त्यांनी लगावला.
शिवडी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजनही या वेळी राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. राज यांनी या वेळी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. ते म्हणाले, ""या विभागात आज फटाक्‍यांची माळ लागली होती. त्यातील एखादा फटाका फुटतो का, याकडे यांचे लक्ष लागले होते. पिंडाचे ताट ठेवल्यावर कावळे येतात, तसे येऊन बसले आहेत.'' कॉलम-सेंटिमीटरच्या पत्रकारितेच्या नावाने काय-काय धंदे चालतात, हे चांगलेच कळते. मी मला आणि महाराष्ट्राला हवे तेच बोलतो, असे ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशून म्हणाले.

गर्दी कमी
राज ठाकरे यांची सभा म्हणजे तुफान गर्दी असे समीकरण आहे. त्यातच मराठी बहुल विभागात सभा असल्यावर गर्दी होणार, हे अपेक्षित होते. मात्र, या कार्यक्रमाला फारशी गर्दी नव्हती.

शिवसेनेचे शस्त्र म्यान
या कार्यक्रमात शिवसेना आंदोलन करणार, अशी शक्‍यता होती. त्यामुळे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र, संध्याकाळी शिवसेनेचा दसरा मेळावा असल्याने या कार्यक्रमाविरोधात शिवसेनेने शस्त्र म्यान केल्याची चर्चा होती.

शनिवार, 12 अक्तूबर 2013

राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात

रविवार, 13 ऑक्टोबर 2013 - 03:30 AM IST 

मुंबई - राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. कॉंग्रेसच्या पराभवासाठी राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात, असे सूचक उद्‌गार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शुक्रवारी काढले. दादरच्या खांडके बिल्डिंग नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

या मुलाखतीत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासंबंधात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वगुणांबद्दल शंका उपस्थित केल्याने वादळ उठले आहे. त्या मुलाखतीतच त्यांना राज आणि उद्धव येत्या निवडणुकीत एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधानही केले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत आणि विभागप्रमुख सदा सरवणकर व्यासपीठावर उपस्थित होते.

दक्षिण-मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून कोंडी झाल्याने आणि दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर जोशी या मुलाखतीमध्ये स्फोटक व्यक्तव्ये करतील असा अंदाज होता; तो जोशी यांनी खरा ठरवला.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते; हेच स्मारक जर प्रबोधनकार ठाकरे यांचे बांधायचे असते आणि सरकारने टाळाटाळ केली असती; तर स्मारकासाठी बाळासाहेबांनी प्रसंगी सरकारही पाडले असते,' असे परखड मत व्यक्त करीत "कदाचित सध्याचे कॉंग्रेसचे सरकार योग्य प्रतिसाद देईल, असे उद्धव ठाकरेंना वाटले असेल,' अशी भूमिका त्यांनी घेतली. बाळासाहेब जी भाषा वापरत, ती सध्याचे नेतृत्व वापरत नाही. ती आक्रमकता विसरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अर्थात, ही टीका नसून बाळासाहेब आणि उद्धव या दोन नेतृत्वांतील तुलना असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

बाळासाहेबांच्या धोरणांमध्ये सातत्य होते. उद्धवही त्याच शिवसेनेचा वारसा पुढे नेत आहेत; मात्र शिवसैनिकांमध्ये पूर्वीची आक्रमकता राहिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी उद्धव यांनी आंदोलन केल्यास त्यामध्ये सहभागी होणारा पहिला शिवसैनिक मी असेन, असेही त्यांनी लगोलग जाहीर केले.

निवडणुकीच्या राजकारणातून अद्याप माघार घेतली नसल्याचे सांगत दादरमधून संधी नाही मिळाली; तर ठाण्यातून निवडणूक लढवण्यास मी तयार आहे, असे जोशी यांनी जाहीर केले. दादरमध्ये बाहेरील उमेदवार दिल्यानेच पराभव पत्करावा लागला. जेथे शिवाजी असतो, तिथे सूर्याजी पिसाळही असतो, असे सांगत दादरच्या पराभवाला स्वतः जबाबदार असल्याचे जोशी यांनी नाकारले.

गेल्या विधानसभेत पक्षाबरोबर गद्दारी करणाऱ्यांना प्रमोशन दिले जात असल्याबद्दल त्यांनी टीकेचा सूरही लावला. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे कॉंग्रेसच्या पराभवासाठी राज-उद्धव एकत्र येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, खासदार राऊत यांनी मात्र पक्षनेतृत्वावरच सर्व जबाबदारी टाकण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. शिवसैनिक आदेशाची वाट पाहत नाहीत. प्रमुखांच्या आदेशांची त्यांना गरज नाही. देशाला वंदनीय असलेल्या नेत्याचे चिमूटभर स्मारक होत नसल्याने आपण त्यांची लेकरे म्हणवून घेण्यास नालायक ठरतो, असेही ते या वेळी म्हणाले.

"मनमोकळी चर्चा झाली' शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वावर म्हणजेच उद्धव ठाकरेंवर टीका केलेली नाही, असे स्पष्टीकरण मनोहर जोशी यांनी आज दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. मी कोणत्या संदर्भात आणि नेमके काय वक्तव्य केले, याची माहिती मी उद्धव ठाकरेंना दिली. या वेळी आमची मनमोकळी चर्चा झाली, अशी माहितीही जोशी यांनी दिली.

शिवसैनिक सरांना माफ करणार नाहीत - कदम जोशी यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याने संतापलेले शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांनी, सरांमुळेच स्मारकाचा विचका झाला अशी टीका केली. त्यांना जर बाळासाहेबांबद्दल आणि त्यांच्या स्मारकाबद्दल एवढा आदर असेल, तर त्यांनी "कोहिनूर'च्या जागेवर स्मारक बांधण्यासाठी जागा का दिली नाही? असा प्रश्‍न कदम यांनी विचारला. उद्धव यांच्याबद्दल नाहक टिकाटिप्पणी झाल्यास सरांना शिवसैनिक माफ करणार नाहीत, असा थेट इशाराच त्यांनी दिला.

"सरांनी स्मारकाचा वाद सुरुवातीपासून वाढवला. आधी आंदोलनाची भाषा करणारे सर नंतर या विषयावर मूग गिळून गप्प बसले. त्यामुळे त्यांना खरोखरच स्मारक बांधण्याचा उत्साह होता की स्मारक होऊ नये यासाठी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला?' असा प्रश्‍नही कदम यांनी उपस्थित केला.

बाळासाहेबांशी कुणाचीच तुलना शक्‍य नाही - तावडे बाळासाहेबांच्या नेतृत्वाशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, अशी भूमिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज घेतली. मनोहर जोशी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे उद्धव ठाकरेंवरील टीका असल्याचे त्यांनी नाकारले. बाळासाहेबांचे नेतृत्व इतके उत्तुंग होते, की त्यांच्याशी अन्य कोणाचीच तुलना होऊ शकत नाही असे ते म्हणाले.

शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे बाळासाहेबांनी शिवसैनिकांवर जिवापाड प्रेम केले, अशा शब्दांत त्यांनी बाळासाहेबांचे कौतुक केले. परळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे "आठवणीतले बाळासाहेब' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. 1988-89 या काळात मी विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करीत असताना प्रमोद महाजन यांच्यासोबत "मातोश्री'वर गेलो होतो. त्या वेळी बाळासाहेबांच्या बहुआयामी नेतृत्वाचा अनुभव आला, अशी आठवण तावडे यांनी सांगितली.

गुरुवार, 10 अक्तूबर 2013

मनसेचे गणित कच्चे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राला विकासाच्या ब्ल्यू प्रिंटचे स्वप्न दाखवत असले तरी त्यांच्या नाशिकमधील कारभाऱ्यांना साधी महापालिकाही चालवणे जड जात आहे. बरेच दिवस घालवून, डोकेफोडी करून या कारभाऱ्यांनी सदस्यांच्या हाती अर्थसंकल्प दिला खरा, पण त्यात तब्बल ८१८ कोटी ९० लाख रूपयांचा घोळ असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

अर्थसंकल्पातील या प्रकारामुळे नाशिककरांची फसवणूक झाली असून त्यातून महापालिकेत सुरू असलेल्या दयनीय कारभाराची आणि चुकलेल्या गणिताचे आणखी एक प्रचिती आल्याची प्रतिक्रिया विरोधकांकडून व्यक्त होत आहे.

महापालिका आयुक्तांनी मे महिन्यात स्थायी समितीला १ हजार ५५६ कोटी ८० लाख रूपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने त्यात काही योजनांचा समावेश करून त्यात भरीव वाढ करून अंदाजपत्रकाचा आकडा २ हजार ७५५ कोटीपर्यंत पोहचवला होता. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची आवश्यकता असताना दीड महिना उशिराने अंदाजपत्रक महासभेमध्ये सादर झाले होते. महासभेने अंदाजपत्रकात काही योजनांचा समावेश करीत २ हजार ७५५ कोटी ९० लाख रूपयांच्या जम्बो अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. मात्र महासभा होऊनही सप्टेंबर महिन्याअखेरीस महासभेचा ठराव सदस्यांना मिळत नव्हता. महासभेच्या ठरावानुसार स्थायी समितीचा अर्थसंकल्प १ हजार ५४१ कोटी रूपयांचा होता तर महासभेने सुचवलेल्या वाढीसह तो १ हजार ९३७ कोटी रूपयापर्यंत पोहचला असे दिसून येते. महासभेने तयार केलेल्या ठरावानुसारच अर्थसंकल्प तयार करण्याचे बंधन झुगारून प्रशासनाने २ हजार ७५५ कोटी ९० लाख रूपयांचा अर्थसंकल्प तयार करून त्याच्या प्रती सदस्यांच्या हाती सोपविल्या आहेत.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुधाकर बडगुजर यांनी महापौरांच्या अज्ञानांची क‌िव येत असल्याचे म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी ठराव करताना आणि नंतर प्रत्यक्षात अर्थसंकल्प तयार करताना महापालिकेच्या इतिहासातील ऐतिहासीक चूक केल्याचे बडगुजर यांनी सांगितले. ठराव आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्प यात तब्बल ८१८ कोटी रूपयांची वाढ झाली असून ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. एकंदरीतच अर्थसंकल्पाचा प्रवास कासवगतीने सुरू आहे. त्यात एवढ्या मोठ्या चुका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून कुठल्या पध्दतीने कामकाज सुरू आहे याची प्रचिती येत असल्याचा दावा त्यांनी शेवठी केला.

चूक सुधारण्याचा प्रयत्न

ठराव आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्पातील ८१८ कोटी ९० लाख रूपयांची चूक बडगुजर यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी चूक झाल्याची कबूली देत अर्थसंकल्पात सुधारणा करू असे स्पष्टीकरण दिले. मात्र, अर्थसंकल्पात ८१८ कोटी ९० लाख रूपयांची वाढ होऊनही त्याकडे सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही असा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे ठरावात आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही.

दुरुस्तीसाठी विशेष महासभा

अर्थसंकल्पात झालेल्या चुकांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी प्रशासनाला अर्थसंकल्पीय विशेष महासभेचे आयोजन करावे लागणार आहे. अर्थसंकल्पात त्याशिवाय दुरूस्ती करता येणार नाही. मागील वर्षी देखील अर्थसंकल्पाबाबत याच पध्दतीने घोळ घालण्यात आला होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आयुक्तांनी सादर केलेल्या सुधारीत अर्थसंकल्पानुसार कारभार हाकावा लागला होता. यावर्षी यापेक्षा वेगळी परिस्थिती राहणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी करणार नाही अशी चूक अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यातून महापौरांचे अज्ञान तर दिसतेच तसेच सत्ताधारी कोणत्या प्रकारे महापालिकेचा कारभार हाकताहेत याची प्रचिती येते. याप्रकरणात सर्वसामन्य करदात्यांची फसवणूक झाल्याचे समोर येत असल्याने संबंधीतावर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. - सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते

अर्थसंकल्याची प्रत नुकतीच सदस्यांच्या हाती आली असून त्याबाबत अभ्यास करूनच बोलणे उचित ठरेल. महासभेचा ठराव आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्प यात खरोखर काही बदल आहेत. याबाबत माहिती घेऊन खुलासा करण्यात येईल. - अशोक सातभाई, मनसे गटनेता

ठरावानुसार अर्थसंकल्प प्रत्यक्षात अर्थसंकल्प

आयुक्त - १ हजार ५५६ कोटी ८० लाख

स्थायी समिती १ हजार ५४१ कोटी २ हजार ३५९ कोटी ९५ लाख

महासभा १ हजार ९३७ कोटी २ हजार ७५५ कोटी ९० लाख

गुरुवार, 19 सितंबर 2013

'स्पॉन्सर्ड' हत्येचा राज ठाकरेंना अनुभव



शुक्रवार, 20 सप्टेंबर 2013 - 03:30 AM IST


 
नवाब मलिक यांचा टोला
मुंबई- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या सरकार स्पॉन्सर्ड असल्याचा सनसनाटी आरोप करणाऱ्या राज ठाकरे यांना राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिले असून रमेश किणींची हत्या राज ठाकरे स्पॉन्सर्ड होती का, असा सवाल आमदार नवाब मलिक यांनी केला.

मलिक यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादी विरुद्ध मनसे संघर्ष पेटण्याची शक्‍यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मोदी यांचे नाव पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आल्यानंतर पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मोदी यांच्या गळ्यात हिऱ्या-मोत्यांचा हार घातला होता. मोदींनी तो हार स्वीकारला व नंतर खासगी सचिवाकडे दिला. या हाराची किंमत किती कोटी होती, हा हार सध्या कुठे आहे, असा सवालही मलिक यांनी केला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उत्तम काम करत आहेत. त्यांचे निर्णय चांगले आहेत. त्यांना राष्ट्रवादीचा विरोध नाही; मात्र सरकारची निर्णय प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे. प्रलंबित फायलींचा विषय अजून संपलेला नाही. लोकांना न्याय द्यायचा असेल तर विकासाची कामे पूर्ण करण्याची गरज असल्याने फायली प्रलंबित ठेवून चालणार नाही, अशी कोपरखळी मलिक यांनी मारली.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या सरकार प्रायोजित?- राज ठाकरे

शुक्रवार, 20 सप्टेंबर 2013 - 02:30 AM IST

तपासात प्रगती नसल्याने संताप व्यक्त
मुंबई- पोलिसांनी योग्य प्रकारे शोध घेतल्यानंतर सगळ्याप्रकारचे मारेकरी सापडत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी एक महिन्यानंतरही का सापडत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करून ही हत्या सरकार प्रायोजित तर नाही ना, अशी विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

जादूटोणाविरोधी पुस्तिकेचे प्रकाशन आज कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर राज यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी मुक्ता दाभोलकर, पत्रकार युवराज मोहिते आदी उपस्थित होते. सगळ्या गुन्ह्यांतील मारेकरी सापडतात; मग डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील तपास का मार्गी लागत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

एक महिन्यानंतरही या विषयातील तपास कामात काहीही घडत नसल्यानेच संशयाची सुई सरकारकडेच वळत असल्याचा गंभीर आरोप राज यांनी या वेळी केला. सरकारला या विषयावर कोणी जाब विचारत नसल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांच्या कामावर माझा विश्‍वास आहे; पण मुळात मारेकरी पकडले जावेत, अशी इच्छा सरकारची आहे का, याबद्दलच संशय आहे. हत्या झाल्यानंतर सरकारच्या वतीने वातावरण थंड करण्यासाठी आणि बातम्या थंड करण्यासाठी विविध वक्तव्य करण्यात आली होती; पण यानंतर सारे वातावरण थंडावले असल्यानेच ही हत्या सरकारने प्रायोजित केली असावी, असा संशय आपल्याला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक गुन्हा "सीबीआय'कडे सोपवून उपयोगाचे नाही. मुळात "सीबीआय'चा वापरही सरकारकडून होत असतो. कोणत्याही प्रकरणाचा तपास लागत नसल्यास त्याचा तपास सीबीआयकडे देण्याची फॅशन सुरू झाल्याची टीका राज यांनी या वेळी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घेतलेली भेट आपण टॅक्‍सीसाठी देण्यात येणाऱ्या नऊ हजार परवान्याच्या संदर्भात होती. मात्र, त्यानंतरही आमचे गुप्तगू झाल्याची चर्चा रंगविण्यात आली. आमची जागा वाटपाची चर्चा झाल्याचा, असा संताप त्यांनी या वेळी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांबरोबर काय चर्चा झाली, याची माहिती नाशिकमध्ये जाहीरपणे देणार असल्याचे राज यांनी सांगितले.

वाघ ताडोबात; जाहिराती मुंबईत
जादूटोणाविरोधी पुस्तकातील चित्रेही गंभीर असावीत, अशी अपेक्षा या वेळी राज यांनी व्यक्त केली. तसेच तयार करण्यात आलेले पुस्तक ज्या दुर्गम ठिकाणी अशा घटना घडतात, त्या ठिकाणी पुस्तकांचे वितरण झाले पाहिजे. ताडोबाला वाघ मारले जातात आणि वाघ मारू नयेत, अशी जाहिरातबाजी मात्र मुंबईत केली जाते. असे याबाबत होता कामा नये. ज्या ठिकाणी असे प्रकार जास्त प्रमाणात होतात, त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाटप करण्याचे आवाहन राज यांनी केले.

शनिवार, 14 सितंबर 2013

राज ठाकरे-मुख्यमंत्री पाऊण तास चर्चा

रविवार, 15 सप्टेंबर 2013 - 02:30 AM IST 

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आज बंद दरवाजाआड सुमारे पाऊण तास चर्चा झाली. राज यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्री चव्हाण यांची त्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांच्या सोबत "मनसे'चे आमदार प्रवीण दरेकर होते. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर दरेकर काही मिनिटांतच खोलीतून बाहेर पडले. त्यानंतर राज आणि मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात तब्बल 45 ते 50 मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजला नसला, तरी नाशिकमध्ये होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि "मनसे'ची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेची कामगिरी या विषयांवर चर्चा झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची काल (शुक्रवारी) झालेली घोषणा, त्यांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा, भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांचा मुंबई दौरा या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यातील चर्चेविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

भूमिपुत्रांनाच टॅक्‍सी परवाने द्या राज्यात नव्याने दिले जाणारे टॅक्‍सी परवाने येथील भूमिपुत्रांनाच द्यावेत, अशा मागणीचे निवेदन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज दिले. या वेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दरेकर होते. "सह्याद्री' विश्रामगृहावर मुख्यमंत्र्यांची आज सायंकाळी ठाकरे यांनी भेट घेतली. राज्यात नव्याने 9 हजार रिक्षा आणि टॅक्‍सी परवाने दिले जाणार आहेत. हे परवाने देताना सरकारने मराठी तरुणांना येथील भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले पाहिजे. परवाने जास्तीत जास्त मराठी तरुणांना दिले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले.

बुधवार, 11 सितंबर 2013

सर्वच पक्षांना 'मनसे'ची डोकेदुखी

 बुधवार, 11 सप्टेंबर 2013 - 04:00 AM IST

कणकवली - आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रभावी विरोधी पक्ष म्हणून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा संकल्प केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवेश जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. या निवडणुका आघाडी विरुद्ध महायुती अशा लढल्या जातील हे जवळपास निश्‍चित असले तरी या मतदारसंघामध्ये मनसेचा संभाव्य प्रवेश मतविभाजनाचे कारण ठरणार आहे. अर्थात पक्षाध्यक्ष राज ठाकरे ऐनवेळी काय निर्णय घेतील यावरच सर्व चित्र अवलंबून राहील.

राज्यात मनसेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. महायुतीने साद घालून राज ठाकरेंना जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवेल हे जवळपास निश्‍चित आहे. याची तयारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरा काढून सुरू केली आहे. कोकणातील खेडमधील त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र सिंधुदुर्गात राज ठाकरेंनी मोठी जाहीर सभा घेण्याचे टाळले.
मनसे स्थापनेपासून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राजन दाभोळकर यांनी पार पाडली. त्या काळापासूनच पक्षाचे वेगळे अस्तित्व त्यांनी टिकवले. अलीकडेच माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसेत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. श्री. उपरकर हे राज ठाकरे यांचे जवळचे मित्र मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यात मनसेची ताकद निश्‍चितच वाढली. पक्षाच्या वाढीसाठी श्री. उपरकर यांनी वेगवेगळे उपक्रम आणि आंदोलने हाती घेतली. त्याचा थेट परिणाम शिवसेना-भाजप युतीवर होऊ लागला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. श्री. उपरकर यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाची जबाबदारी विभागून देण्यात आली. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद श्री. दाभोळकर यांच्याबरोबर शैलेश भोगले यांच्याकडे विभागून देण्यात आले. त्यानंतर तालुकानिहाय आणि गाववार पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या. एकूणच गेल्या काही महिन्यांत मनसेने जिल्ह्यात संघटना वाढविण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर पक्षाने आपली भूमिका वेगळेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला. परिणामी पक्षाचा वेंगुर्ले नगर परिषदेत एक नगरसेवक निवडून आला. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये मनसेने उमेदवार उतरवून पक्षाचे चिन्ह घरोघरी पोचविण्याचा प्रयत्न केला. मनसेकडे जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी नसली तरी राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव येथील मतदारांवर पडतो. याचबरोबर मुंबईतील मनसेचे निम्म्याहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. या सर्व ताकदीचा वापर करून मनसे येत्या निवडणुकीत थेटपणे स्वतंत्र लढण्याची तयारी करेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. याचे कारण या खेपेस जरी मनसे सत्तेच्या आसपास पोचू शकली नसली तरी सत्तेची चावी मनसेच्या हातात राहील, अशी सध्या राजकीय स्थिती आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी आणि पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पायाभरणी करण्यासाठी मनसे निश्‍चितच प्रयत्नशील राहील.

लोकसभेसाठी मनसेने उमेदवार उतरविल्यास याचा परिणाम महायुतीच्या उमेदवारावर होईल. परंतु याचबरोबर आघाडीला याचे चटके बसतील. चिपळूणपासून बांद्यापर्यंत विस्तारलेल्या या मतदारसंघात मनसेच्या मराठीसारख्या मुद्द्यावर विचारधारा असणारे मतदार निश्‍चितच आहेत. याचा कितपत फायदा होईल हेही निश्‍चित होणार आहे. एकूण सात विधानसभा मतदारसंघ जोडलेल्या या लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पाठबळाचे चित्रही स्पष्ट होईल. त्यानंतरच मनसेला जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद आजमावावी लागेल. हे करत असताना श्री. उपरकर वगळता मनसेकडे स्थानिक पातळीवर प्रभावी उमेदवार नाही. त्यामुळे मुंबईहून उमेदवार आयात करण्याची पाळी मनसेवर येणार आहे. परंतु अद्याप तरी पक्षाने निवडणूक लढण्याची तशी तयारी केलेली नाही. पण ऐन वेळी राज्यात निर्माण होणारे प्रश्‍न आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून मनसे स्वतंत्रपणे विचार करून निवडणुकीला सामोरे जाऊ शकते. तशी चाचपणी वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. एखादा आर्थिक सक्षम कार्यकर्ता शोधला जात आहे. मधल्या कालावधीत अशा पद्धतीने काही कार्यकर्ते उतरविण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला म्हणावे तसे यश आले नाही. परंतु अलीकडच्या काही महिन्यांत मनसेने गावागावात पोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पारंपरिक पक्षाच्या विचारधारेला कंटाळलेला तरुण वर्ग मनसेच्या जाळ्यात अडकला जात आहे. याचा फायदा पक्षाला कितपत होईल हे निवडणुकीला सामोरे गेल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

'सिंधुदुर्गात मनसे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्ते पक्षाकडे येत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही पुऱ्या करत आहोत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास सर्व निवडणुका स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. विरोधी पक्ष म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रश्‍न आम्ही रस्त्यावर उतरून सोडवत आहोत. त्यामुळे पक्षाकडे तरुण, महिला कायकर्त्यांची संख्या वाढत आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मनसे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत.''
- परशुराम उपरकर, मनसे नेते

मंगलवार, 3 सितंबर 2013

आता नाटक पुरे, ब्ल्यू प्रिंट दाखवाच


नाशिक - महापालिका निवडणुकीत विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचे दाखवीत नाशिककरांकडून मतांचा जोगवा मागणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सत्ता येऊन दीड वर्ष उलटल्याने आतातरी ब्ल्यू प्रिंट खुली करावी, अशी अपेक्षा नाशिककर श्री. ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या निमित्ताने करीत आहेत.

ठाकरे यांच्या दौऱ्यात प्रथमच विकासकामांच्या उद्‌घाटनाचा धडाका राहणार असला तरी नाशिकसाठी ठोस असे काहीतरी काम दिसावे, अशी अपेक्षा आहे.
महापालिका निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विकासाच्या नावावर नाशिककरांकडे मते मागितली होती. नाशिककरांनी मनसेच्या पदरात भरभरून मते टाकलीही, परंतु गेल्या दीड वर्षात महापालिकेचा कारभार पाहता अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज ठाकरे महिन्या-दोन महिन्यांनी नाशिक दौऱ्यावर येतात, महापालिका आयुक्तांची भेट घेऊन लवाजम्यासह परततात. नाशिककर मात्र आज, उद्या राज ठाकरे आपल्या पदरात काहीतरी पाडतील, या भोळ्याभाबड्या अपेक्षेने पाहतात, हा आजवरचा अनुभव आहे. परंतु आता ठोस कामे दाखवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांच्या विकासकामांचे उद्‌घाटन होणार आहे. परंतु नाशिकसाठी काहीतरी ठोस असे काम दिसले पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

नाशिकचे प्रथम महापौर (स्व.) शांतारामबापू वावरे यांनी तरण तलाव व पालिका मुख्यालयाची इमारत उभारली, (स्व.) पंडितराव खैरे महापौर असताना गंगापूर धरणातून थेट पाइपलाइन योजना मंजूर झाली. माजी महापौर प्रकाश मते यांच्या कार्यकाळात घंटागाडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. डॉ. शोभा बच्छाव यांच्या कार्यकाळात दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी करण्यात आली. दशरथ पाटील यांच्या कार्यकाळात गोदाघाट प्रकल्पाला प्रारंभ झाला. त्यांच्याच कार्यकाळात सिंहस्थाचे व्यवस्थित नियोजन होऊन विकासकामे झाली. बाळासाहेब सानप यांच्या कार्यकाळात स्मारकांचा विकास झाला. विनायक पांडे महापौर असताना साडेतीन हजार कोटी रुपयांची नेहरू पुनरुत्थान योजना अमलात आली. सत्तेवर असलेल्या प्रत्येक महापौरांकडून शहरासाठी ठोस असे काम केले आहे. परंतु मनसेकडून आतापर्यंत अपेक्षाभंगच झाल्याचा नाशिककरांचा अनुभव आहे. राज ठाकरे यांनी निवडणुकीत विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचे आश्‍वासन दिले होते. दीड वर्ष झाले तरी ती प्रिंट अजून उघडलेलीच नाही. आताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ठाकरे काहीतरी घोषणा करतील, या आशेवर नाशिककर आहेत.

या समस्यांचे काय?
-शहरात कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे. घंटागाडीचा ठेका देऊनही नियमित गाड्या येत नाहीत. शहराची नियमित साफसफाई होत नाही. महापौर ठोस निर्णय घेत नाहीत. सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधकच अधिक प्रबळ दिसतात. भूसंपादनाच्या प्रक्रियेत बिल्डरांना दिले जाणारे झुकते माप, रस्त्यांची झालेली चाळण, गोदावरी प्रदूषण, मनसेच्या नगरसेवकांमधील बेबनावामुळे विकासावर झालेला परिणाम, सदस्यांची होत नसलेली कामे, वाढती अतिक्रमणे, महापालिकेत वाढत्या ठेकेदारीतून होणारे वाद.

बुधवार, 28 अगस्त 2013

विधान परिषद निवडणुकीत मनसे तटस्थ

मुंबई - विधान परिषदेच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तटस्थ राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज "कृष्णकुंज' या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

विधान परिषद निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात बोलताना सर्वच पक्षाच्या आमदारांनी सद्‌सदविवेक बुद्धीला स्मरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र आज धनंजय मुंडे यांनी अचानक "कृष्णकुंज'वर धाव घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. नंतर लगेच ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना झटका बसला असून त्यांची ही भूमिका राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांची आजची भेट राजकीय नव्हती तर केवळ सदिच्छा भेट होती, असे त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या हंडीसाठी मनसेचे आतापासूनच थर

गुरुवार, 29 ऑगस्ट 2013 - 03:00 AM

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडीचा मुहूर्त साधत येत्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे थर रचायला सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर, दक्षिण-मध्य मुंबईतून आदित्य शिरोडकर आणि ईशान्य मुंबईतून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी देण्यावर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्‍कामोर्तब केले आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीच्या निमित्ताने या उमेदवारांना घराघरात नेण्याचा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

लोकसभेच्या उमेदवारांवरून अन्य पक्षांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. मनसेने नांदगावकर, शिरोडकर आणि नलावडे यांच्या नावावर पसंतीची मोहोर उठवत युतीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याची चर्चा करणाऱ्या भाजपचे तोंड बंद केले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून सणांची पर्वणी साधली जाणार आहे. या मतदारसंघामध्ये मनसेने यापूर्वीच पाय रोवले आहेत. राज यांनीही तेथेच लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर घाई करण्यापेक्षा आतापासूनच उमेदवारांचा मतदारांशी संवाद वाढावा यासाठी रणनीती आखली आहे.

लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राज यांनी बोलावलेल्या बैठकीला नितीन सरदेसाई, राजन शिरोडकर, रीटा गुप्ता; तसेच या मतदारसंघांतील विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली असून आदित्य शिरोडकर यांनी दहीहंडीच्या निमित्ताने टी-शर्ट वगैरे वाटप करीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या तीन मतदारसंघापैकी दोन कॉंग्रेसकडे; तर एक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे.

तिसऱ्या थरातून मुसंडीची तयारी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईमध्ये मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दिना पाटील निवडून आले. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला 32.60 टक्‍के, भाजपला 32.15 टक्‍के आणि मनसेला 29.79 टक्‍के मते मिळाली. दक्षिण-मध्य मुंबईतही मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती (येथे कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले). दक्षिण मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावरील मनसे यांच्यामध्ये मतांची थेट विभागणी झाल्याने कॉंग्रेसचे मिलिंद देवरा यांना लाभ झाला. आता मात्र दक्षिण मुंबईतील शिवसेनेचा गड हलविण्यासाठी मनसेने तेथे अधिक ताकद लावण्याचे ठरवले आहे. एकंदर या तिन्ही मतदारसंघांत सध्या तिसऱ्या थरावर असलेल्या मनसेची विजयाचे दही चाखण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

धनंजय मुंडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आज (बुधवार) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

बीड जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मुंडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. धनंजय मुंडे हे वडिल पंडित अण्णा मुंडे यांच्यासह काही महिन्यांपूर्वी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी नुकताच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला आहे.

शुक्रवार, 23 अगस्त 2013

आबांना बांगड्यांचा आहेर द्या - राज ठाकरे

शनिवार, 24 ऑगस्ट 2013 - 01:00 AM IST 


मुंबई - मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व महिलांनी गृहमंत्र्यांना बांगड्याचा आहेर पोस्टाने पाठवून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. किमान मनाची चाड बाळगून आर. आर. पाटील यांनी आता राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि बलात्काराच्या घटनेवरून गृहमंत्र्यांवर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, ""2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटाच्या घटनेनंतर पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. ही संधी का दिली गेली, हे आपल्याला कळले नाही. त्यानंतर आझाद मैदानात पोलिसांना आणि पत्रकारांना मारहाण करण्यात आली. त्या वेळीही आपण पाटील आणि तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण पाटील आपल्या खुर्चीला चिकटून राहिले आहेत.'' राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्रातील माहिती पुरविण्याचे काम करत असल्यानेच पाटील यांची वर्णी गृहमंत्रिपदावर लागल्याची टीका राज यांनी केली. ते म्हणाले, ""पवार यांच्यासाठी "कुरिअर सर्व्हिस'चे काम गृहमंत्री करत आहेत. यापूर्वी राज्यात रात्री-अपरात्री महिला सुरक्षित फिरत होत्या. पण या घटनेनंतर सर्व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. महिलांनी घटनेचा निषेध म्हणून मलबार हिल येथील त्यांच्या बंगल्यावर अथवा सांगलीतील घरी पोस्टाने बांगड्या पाठवाव्यात.'' दरम्यान, एप्रिलपासून पोलिसांच्या बदल्यांची फाईल अडकून पडली आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या पोलिसांना आपण आहे त्या ठिकाणी राहणार की जाणार याबद्दल शंका आहे.
पोलिसांच्या या संभ्रमावस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्‍न राज यांनी उपस्थित केला. "टग्यां'नी गृहमंत्रिपद घ्यावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे, असे थेट आव्हान राज यांनी पवार यांना दिले. अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आपण "टगे' असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे या टग्यांनी आता गृहमंत्रिपद घेऊन आपली कार्यक्षमता दाखवून द्यावी, असे आव्हान राज यांनी दिले.

सोमवार, 12 अगस्त 2013

मनसेचे... खळ्ळं खट्याक!


- - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2013 - 01:30 AM IST

सातारा - दुष्काळी तालुक्‍यात चारा छावण्या सुरू ठेवाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीची बेसबॉल स्टीकने तोडफोड केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते स्वत:हून शहर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक केली.

माण, खटाव, फलटण तालुक्‍यांत चारा छावण्या सुरू ठेवाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 5 ऑगस्टपासून दहिवडी येथे उपोषण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत एसटी बसचीही तोडफोड केली होती. त्यामुळे माणमध्ये तणावपूर्ण शांतता होती. छावण्या सुरू ठेवण्याबाबत कोणताच निर्णय न झाल्याने मनसेने साताऱ्यातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांची मोटार (एमएच 11 एजे 1) उभी होती. सकाळी 11.40 च्या सुमारास स्वत:च्या वाहनातून जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार व सांगली येथील एक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्या हातात बेसबॉल स्टीक व मनसेचे झेंडे होते. 11.50 च्या सुमारास रणजित भोसले यांनी स्टीकने वाहनांच्या काचा फोडल्या, तसेच अंबर दिवा फोडला. त्याच वेळी युवराज पवार व एका कार्यकर्त्याने झेंडा फडकावत "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, छावण्या सुरू राहिल्याच पाहिजेत' अशी घोषणाबाजी केली.

त्यानंतर आंदोलक रणजित भोसले, युवराज पवार, सचिन माने, संभाजी पाटील, रूपेश जाधव, अभिजित भोसले, आकाश खुडे, तानाजी सावंत व सचिन मोंडे आदी स्वत:हून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जमावबंदी आदेशाचा भंग आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

जिल्हाधिकाऱ्यांची गाडी वाचली
पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी पाटण (कोयनानगर) येथे आज सकाळी बैठक बोलावली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. गेले होते. त्यांच्या वाहनाच्या जागेवर आज श्री. पऱ्हाड यांची गाडी उभी होती. प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असतात. आज ते दौऱ्यावर असल्याने त्यांची गाडी तोडफोडीतून वाचली.

"महसूल'ची लेखणी थांबली!
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची मोडतोड करत अंबर दिवा फोडला. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील 74 महसूल अधिकारी व 1270 कर्मचाऱ्यांनी सोमवार व मंगळवारी कामबंद आंदोलन पुकारले. महसूल विभागाची लेखणी थांबल्याने सर्वसामान्यांची कामे खोळंबली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, श्रीमंत पाटोळे, शमा पवार, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविण्यासाठी नियोजन भवनात बैठक घेतली.

विविध संघटनांकडून निषेध

घटनेचा निषेध व्यक्‍त करण्यासाठी सातारा जिल्हा महसूल संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा वाहनचालक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा अधिकारी महासंघ व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. राजकीय गुंडगिरी करून शासकीय यंत्रणेला दहशतवादी कृत्यांनी वेठीस धरण्याऐवजी शेतकरी, कामगारांना न्याय द्यावा, असे निवेदन कामगार शेतकरी संघर्ष समितीने काढले आहे.

सर्वसामान्यांची कामे रेंगाळली
सोमवारी सर्वच अधिकारी, कर्मचारी हे जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील, मंडलाधिकारी व तलाठी कार्यालयात उपस्थित राहतात. आज सर्वसामान्य लोक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी, कामे पूर्ण करण्यासाठी, निवेदन देण्यासाठी आली होती; परंतु काम बंद आंदोलन केल्याने आज दिवसभर कामे रेंगाळली.

Narendra Modi ( NaMo ) Speech Live in Hyderabad

Shri. Narendra Modi's speech at 1:08:14

शनिवार, 3 अगस्त 2013

ठणठण वाजते डोक्‍यात !

सर्वप्रथम आम्ही आमचे जीवश्‍चकंठश्‍च मित्र आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा निदिध्यास घेतलेले "मनसे'प्रमुख जे की कुंवर चुलतराज यांचे शतशः आभार मानून पुढे जाऊ. मराठी माणसाच्या हितासाठी पलिते नि भालेबर्च्या घेऊन जुझात पाऊल टाकणारे पाईक इतिहासाला ज्ञात आहेत, पण तळहाती पत्थर घेऊनिया रणात उतरणारे कुंवर चुलतराज हे अर्वाचीन इतिहासातील येकमेव उदाहरण. युद्धाचे भय घालोन तहात जिंकणारे मराठा गडीदेखील तेच होत. त्यांच्या प्रशस्तीनिमित्त "चुलतराज न होत, तो पंचाइत होत सबकी' असे सुप्रसिद्ध कवन आम्ही लवकरच लिहावयास घेणार आहो. (चमचेगिरी बास झाली, असे कोण म्हणाले ते? खामोश!!) पण ते येक असो. दुसरे असे, की मराठी चित्रपटांचे आम्ही प्रचंड म्हणजे प्रचंड असे चाहते आहोत. आश्‍चर्याची बाब म्हणजे, मराठी असूनही आम्ही मराठी चित्रपट आवर्जून पाहतो! "दुनियादारी' आम्ही चौवेळा पाहियला असून, त्यापूर्वी त्यातील "टिकटिक वाजते डोक्‍याऽऽत' ही गीतपंक्ती हज्जारो वेळा टेलिव्हिजनवर ऐकिली आहे. इतक्‍यांदा येकच ओळ ऐकून आमच्या कानी विविध प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले असून, नजरेत विशेष चमक आली. अखेरीस आम्हास येकदा तो चित्रपट बुचभर दाखवून आणल्याखेरीज हे प्रकरण बरे होण्यातले नाही, असे निदान ठाण्याच्या येका विख्यात डॉक्‍टरांनी केले. त्यांनी येकच डोस ठरवून दिला होता, आम्ही तीन बुचे ज्यास्त घेतली! आणि बरे होण्याच्या मार्गावर आहो!! अशा या "दुनियादारी'चे खेळ उतरवून तेथे "चेन्नई एक्‍स्प्रेस' नावाचा निव्वळ गल्लाभरू चित्रपट (तोही परप्रांतीयांच्या भाषेत!) लावण्याचा मोगली कट चुलतराजांच्या मावळ्यांनी सफई उधळून लावला, आणि इतिहासात पहिल्यांदा मराठे तहात जिंकले! "कृष्ण कुंज' या ऐतिहासिक ठिकाणी झालेल्या या तहनाम्याचे वेळी आम्ही, तसेच "दुनियादारी'चे दिग्दर्शक संजय जाधव, स्वप्नील जोशी आदी फिर्यादी मंडळी दरबारात उपस्थित होती. सामनेवाल्या पार्टीत "चेन्नई एक्‍स्प्रेस'चे दिग्दर्शक रोहित शेट्टी, निर्मात्यांचे प्रतिनिधी हेही होते. राजांनी दोन्ही पार्ट्यांचे ऐकून घेतले. चुलतराज ः हं... तुमचा मारधाडपट आहे की विनोदी? शेट्टी ः ऍक्‍चुअली साहेब, माझ्या पिक्‍चरमध्ये मारधाडीतून विनोद होतो आणि विनोद झाला की लगेच मारामारीही होते. चार मिनिटांत सत्तर गाड्या तोडल्या मी शूटिंगमध्ये, साहेब. तोच फॉर्म्युला आहे, माझा! चुलतराज ः (संशयाने) मराठी आहे की काय? शेट्टी ः नाही "चेन्नई एक्‍स्प्रेस' नाव आहे... चुलतराज ः मग चेन्नईत दाखवा, इथं कशाला? बरं "दुनियादारी'वाली पार्टी कोण आहे? हं, तुमचा चित्रपट कशावर आहे? स्वप्नील ः एकदम भारी आहे, साहेब ! ए-वन पिक्‍चर आहे. पब्लिकला पागल केलंय. (इथं आम्ही चपापलो!) "टिकटिक वाजते डोक्‍याऽऽऽत' ऐकलं का? बेस्ट आहे! चुलतराज ः मराठी आहे ना, मग बास झालं! असं करा, यांनी (शेट्टींकडे बोट दाखवून) बराच खर्च केलेला दिसतोय. चार खेळांपैकी दोनदोन वाटून घ्या. दोन असतील, तिथं एकेक, कळलं? निघा आता.... जिथं एकच खेळ आहे, तिथं अर्धा-अर्धा दाखवावा, अशी सूचना यायच्या आत सगळे धडपडत उठले. (धड चहासुद्धा पिता आला नाही! असो.) तथापि चुलतराजांनी रोहित शेट्टींना थांबायला सांगितलं. आम्हीही रेंगाळलो. चुलतराज ः शेट्टी, आमच्या मेळाव्यात भाषण द्यायला या!... ही आमची पोरं जेमतेम एक गाडी भंगारातून आणून तोडतात आणि चॅनेलवाले सत्तर वेळा दाखवतात! चार मिनिटांत सत्तर गाड्या तोडण्याचं तुमचं टेकनिक काय आहे? - आमच्या डोक्‍यातली "टकटक' बंद झाली असून, "ठणठण' चालू झाली आहे. आणखी दोन बुचं "दुनियादारी'ची मारणं आलं! असो.

गुरुवार, 1 अगस्त 2013

दुनियादारी- चेन्नई एक्सप्रेसमधील वाद मिटला

मुंबई- एक पडदा (सिंगल स्क्रीन) चित्रपटगृहांमध्ये संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'चेन्नई एक्सप्रेस' या दोन्ही चित्रपटांचे खेळ विभागून दाखविण्याचा तोडगा काढण्यात आला आहे.

दोन्ही चित्रपटांच्या कलाकारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर या मुद्द्यावर सामोपचाराने मार्ग काढला. यावेळी 'चेन्नई एक्सप्रेस'चा दिग्दर्शक रोहित शेट्टी, 'दुनियादारी'चा नायक स्वप्नील जोशी व इतर सहकारी उपस्थित होते.

सुहार शिरवाळकर यांच्या कादंबरीवर बेतलेला 'दुनियादारी' हा मराठी चित्रपट सर्वत्र बॉक्स ऑफिसवर चांगला चालला असतानाच 9 ऑगस्ट रोजी (शुक्रवार) रोहित शेट्टीचा 'चेन्नई एक्सप्रेस' प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मुंबईतील 19 एक पडदा चित्रपटगृहांमध्ये 'दुनियादारी'चे खेळ बंद करून 'चेन्नई एक्सप्रेस' दाखविण्यात येणार होते. 'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये शाहरुख खान व दीपिका पदुकोन यांची प्रमुख भूमिका आहे.

दरम्यान 'दुनियादारी'चे खेळ बंद करण्यात येऊ नयेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आज यावर तोडगा काढण्यात आला.

बुधवार, 31 जुलाई 2013

म्हणे मुंबई वेगळी करा !

मुंबई - तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या घोषणा झाल्यावर प्रख्यात लेखिका शोभा डे यांनी "मग मुंबई का वेगळी नको?' अशी प्रतिक्रिया वादग्रस्त ट्‌विटरद्वारे व्यक्‍त करताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, असे वादग्रस्त ट्‌विट शोभा डे यांनी केले. शोभा डे यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्राच्या सर्वत्र सर्व भागांतून जोरदार टीका सुरू झाली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी तब्बल 105 हुतात्मे झाले. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रातील लोकांना करावी लागली. हा इतिहास बाजूला सारून शोभा डे यांनी हुतात्म्यांचा अपमान केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त झाली आहे.
 शोभा डे यांनी, "महाराष्ट्र ऍण्ड मुंबई??? व्हाय नॉट? मुंबई हॅज ऑल्वेज फॅन्सिड इटसेल्फ ऍज ऍन इंडिपेंडंट एन्टिटी. एनी वे, धिस गेम हॅज काऊंटलेस पॉसिबलिटिज' (महाराष्ट्र आणि मुंबई? मुंबईने नेहमीच आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. अर्थात, हा मोजता न येणाऱ्या शक्‍यतांचा खेळ आहे.) असे ट्विट केले होते. त्यावर राज ठाकरे यांनी मुंबई वेगळी करणे हे "घटस्फोट" घेण्याइतके सोपे नाही, अशी टीका केली, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शोभा डे यांच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा खटला भरणे आवश्‍यक असल्याची आक्रमक प्रतिक्रिया दिली. ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, अशा लोकांकडूनच अशी प्रतिक्रिया येऊ शकते, असे ते म्हणाले. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीमागे मोठा इतिहास आहे. त्यासाठी 105 हुतात्मे झाले. अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी शोभा डे यांनी हा इतिहास वाचायला हवा होता, असे नवाब मलिक म्हणाले.
 'निवडणुका जवळ आल्या की असे (तेलंगणची स्थापना) सवंग लोकप्रियतेचे निर्णय आणि घोषणा होतात. त्याची खिल्ली उडविण्यासाठी आपण ही प्रतिक्रिया दिली आहे. मला महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी नको आहे. '' - शोभा डे, लेखिका

... तर 'चेन्नई एक्स्प्रेस'ला मनसे स्टाईलने विरोध!

'चेन्नई एक्स्प्रेस'साठी मुंबईतील एक पडदा चित्रपटगृहातून 'दुनियादारी' हा मराठी चित्रपट काढायला लावला, तर राज्यात चेन्नई एक्स्प्रेस प्रदर्शित होऊ देणार नाही. मनसे स्टाईलनी राज्यात या चित्रपटाला विरोध केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी बुधवारी दिला. अभिनेता शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला चेन्नई एक्स्प्रेस हा चित्रपट येत्या आठ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. मात्र, एक पडदा चित्रपटगृहचालकांना हा चित्रपट हवा असेल, तर त्यांनी त्याचे प्रतिदिन चार शो दाखविले पाहिजेत, अन्यथा हा सिनेमा त्यांना देणार नाही, अशी भूमिका या चित्रपटाच्या वितरकांनी घेतलीये. हा चित्रपट घ्यायचा असेल, तर एक पडदा चित्रपटगृहचालकांना दुनियादारीचे शो थांबवावे लागतील. चेन्नई एक्स्प्रेसच्या वितरकांच्या मनमानीपणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आंदोलन करेल, असे खोपकर यांनी स्पष्ट केले.

शनिवार, 20 जुलाई 2013

मुंबई - लखनभैया बनावट चकमक प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना सुनाविलेल्या जन्मठेप प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पोलिसांना पूर्णपणे पाठिंबा देणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले.

छोटा राजनचा हस्तक असलेल्या रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैयाच्या बनावट चकमकीच्या खटल्यात दोषी ठरलेल्या 13 पोलिसांसह 21 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिस अधिकारी प्रदीप शर्माच्या पथकाने 11 नोव्हेंबर 2006 रोजी लखनभैयाला वर्सोव्यात नाना-नानी पार्कमध्ये बनावट चकमकीत ठार केले होते. मात्र, शर्माच्या विरोधात पुरेसा पुरावा नसल्यामुळे त्यांची न्यायालयातून सुटका झाली. चकमकीचे नेतृत्व तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशीने केले होते. शिक्षा झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. 

याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ''पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्य सरकारने पोलिसांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे. लखनभैया हा साधुसंत नव्हता. या प्रकरणी आम्ही पोलिसांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांना आम्ही सर्वप्रकारची मदत करू. या प्रकरणातून सर्व पोलिस सुखरूप बाहेर पडून पुन्हा कामावर रुजू होतील अशी माझी इच्छा आहे.''
राजचा पोलिसांना पाठिंबा
शनिवार, 20 जुलै 2013 - 12:27 PM IST

सोमवार, 24 जून 2013

... नाहीतर माझ्याशी केलेली चर्चा उघड करेन - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये येणार का, या विषयावरील चर्चा आता थांबवा; नाहीतर माझ्याशी काही नेत्यांनी केलेली चर्चा उघड करावी लागेल, या शब्दांत राज ठाकरे यांनी सोमवारी  नाशिक येथे  युतीतील घटक पक्षांना फटकारले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टीच्या महायुतीमध्ये येणार का, हा प्रश्न सातत्याने चर्चिला जात आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यावरील एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज ठाकरे यांनी युतीतील घटक पक्षांवर हल्लाबोल केला. माझ्या पक्षामध्ये सगळे निर्णय मीच घेतो. त्यामध्ये बाहेरच्या कोणीही चर्चा करायची गरज नाही. माध्यमांनाही आता या विषयावर चर्चा करू नये, असे राज ठाकरे म्हणाले. याच्यापुढे कोणीही या विषयावर चर्चा केली, तर माझ्याशी काही नेत्यांनी ज्या काही गोष्टींची चर्चा केली आहे, ती उघड करावी लागेल. असेही त्यांनी सांगितले.तसेच  नाशिक महानगर   पालिकेतील  अधिकाऱ्यांशी  आणि नगरसेवकांशी नाशिकच्या विकासासंबंधी  चर्चा   केली    

गुरुवार, 13 जून 2013

'स्वतःच्या स्वार्थासाठी तरुणांचे आयुष्य उदधवस्त करणे हेच ठाकरे कुटुंबीयांचे काम' -नवाब मलिक

तरुणांना कायदा मोडायला लावण्यास उद्युक्त केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांच्यावर गुरुवारी टीका केली. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तरुणांचे आयुष्य उदधवस्त करणे, हेच काम ठाकरे कुटुंबीयांनी आतापर्यंत केल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केला.
रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षा केंद्रावर हल्लाबोल करून परीक्षार्थीना मारहाण केल्याप्रकरणी पाच वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर गुरुवारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्ला चढवला. हा हिंसाचार झाला तेव्हा आपण तेथे हजर नव्हतो आणि आपला या हिंसाचारामागे हात नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
तरुणांना भडकावून त्यांना तोडफोड करण्यास प्रवृत्त करायचे आणि नंतर आपला त्यात काही संबंध नाही, असे सांगून खटल्यातून बाहेर पडायचे, हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे पहिल्यापासून धोरण असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यायला लावायचा आणि नंतर त्यांना एकटे सोडून आपण बाहेर पडायचे, हेच या पक्षांच्या नेत्यांचे काम असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले

बुधवार, 12 जून 2013

वाढदिवस साजरा न करण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन

गुरुवार, 13 जून 2013 - 12:30 AM  
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होऊन अद्याप एक वर्ष न झाल्याने यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांपर्यंत हा आदेश पोहोचविला असून वाढदिवसानिमित्त कोणत्याही जाहिरातबाजीस मनाई करण्यात आली आहे.

राज यांचा शुक्रवारी (ता.14) वाढदिवस आहे. या दिवशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी केली जाते; तसेच विविध कार्यक्रमही होतात; परंतु बाळासाहेबांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून सावरलेलो नसल्याने वाढदिवस साजरा करणार नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देण्याचे आवाहन त्यांनी युवासैनिकांना केले आहे

रविवार, 9 जून 2013

नरेंद्र मोदी यांचे गोवा येथील भाषण


नरेंद्र मोदी भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी

रविवार, 9 जून 2013 - 02:12 PM IST

पणजी - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पणजीत सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदींच्या नावाची औपचारिक घोषणा केली. मोदींच्या नावाच्या घोषणेमुळे भाजप २०१४ मध्ये लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे दोन दिवसांच्या बैठकीचा आज समारोप झाला. या बैठकीला लालकृष्ण अडवानींसह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते गैरहजर होते. या नेत्यांच्या अनुपस्थितीतच मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने, राजकीय तर्कवितर्कांना सुरवात झाली आहे.

आम्हाला नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या जाणार आहेत, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. नरेंद्र मोदींना देशात मोठी जबाबदारी देण्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये प्रयत्न सुरू होते. अखेर आज त्यांना राष्ट्रीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील प्रचार समितीमध्ये २४ सदस्य असण्याची शक्यता आहे. या सदस्यांत अमित शहा आणि स्मृती इराणींचा समावेश असल्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी मोदींना प्रचारासाठी ऑक्टोंबरमध्ये बिहारमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे

शुक्रवार, 7 जून 2013

युतीतील नाट्याचा फिरता रंगमंच!

युतीतील नाट्याचा फिरता रंगमंच!
- पद्मभूषण देशपांडे
शनिवार, 8 जून 2013 - 12:45 AM IST



युतीच्या राजकीय नाट्याचे कथानक अनपेक्षित वळणे घेत आहे. अद्याप लोकसभा निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत, तोवर युतीने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजप व रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येकी एक असे दोन उपमुख्यमंत्री, असे वाटप करून टाकलेले दिसते!

"निवडणूक येईल तेव्हा तुम्ही मागाल तेवढ्या जागा देऊ. वाटलं तर दोन-चार जास्त देऊ; पण तोवर गप्प बसायचं काय घ्याल,' असे युतीतल्या कोणा तरी नेत्याने म्हणण्याची वाट रामदास आठवले पाहतायत की काय कोणास ठाऊक! जेव्हा उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पहिल्यांदा पुढे केला, तेव्हा राज ठाकरे यांनी तो ठोकरला. एकीकडे मुंबईत असा प्रस्ताव नाकारत असताना अमरावतीला सभेसाठी गेले असता राज यांना अचानक उपरती झाली आणि तिथूनच त्यांनी नाशिक, ठाणे, कल्याण आणि भिवंडीत शिवसेनेला महापालिकेत मदत करण्याची तयारी दाखवली. तटस्थ राहून अप्रत्यक्ष मदत करण्यापेक्षा थेट मतदान करूनच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तेत भागीदारी केली पाहिजे, असा नवा विचार त्यांनी स्वतःहून मांडल्याचे सांगितले जाते. ठाण्याच्या स्थायी समितीच्या अध्याक्षांची निवड अद्याप न्यायालयात अडकली आहे. त्यामुळे तिथली भागीदारी राहिली. मात्र, अन्य तीनही ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन सत्तेची पदे मटकावली. हे सगळे घडले तेव्हा आठवले युतीतच होते अन्‌ राज यांच्या युतीतल्या सहभागाला विरोध करत होते! आठवले आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत होते, युतीच्या गर्जना करत होते. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला आठवले राज यांच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीतल्या प्रवेशाला विरोध करत होते. शिवसेना आणि मनसे त्याच वेळी सत्तेत भागीदारी करत होते. आठवले यांना हे कळत नव्हते की समजत नव्हते?

आठवले यांना रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या 35 जागांचा वाटा युतीत हवा आहे. गेले तीन-चार महिने ते याच आकड्याचा जप करताहेत. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांबरोबर झालेल्या भेटींमध्ये आठवलेंनी आपला हा आकडा काही सोडला नाही. अगदी सुरवातीला उद्धव यांच्याकडेही त्यांनी तीच मागणी केली होती. मनसे युतीमध्ये आली तर त्यांनाही त्यांचा वाटा द्यावा लागणार. त्यातून आपल्या वाट्यावर अतिक्रमण होणार. शिवसेना आणि भाजप आधीच आपल्या वाट्याविषयी काही बोलत नाहीत; त्यात मनसेने उडी घेतली तर आपला दावा आणखी कमजोर होईल, या विचाराने आठवले मनसेला युतीत येण्याला विरोध करत होते. पण दरम्यानच्या काळात काय जादूची कांडी फिरली कळेना. आठवलेंनी राज ठाकरे यांना युतीत येण्याचे आमंत्रण द्यायला अचानक सुरवात केली. शिवसेना आणि आठवले यांच्यात काही ठरले असावे आणि त्यातूनच आठवलेंचे आमंत्रण आले असावे, असे वाटत असतानाच शिवसेनेच्या "सामना'तून आठवलेंची झाडाझडती घेण्यात आली. "चौथा कशाला?' असे विचारता विचारताच या अग्रलेखाने भाजपचे दिल्लीतील नेते "तिसरा तरी कशाला?' असा प्रश्‍न विचारत असल्याचे उघड केले. भाजपचे महाराष्ट्रातले नेते मनसेच्या मतांच्या बेरजेसाठी गळ टाकून बसले आहेत; पण दिल्लीतल्या नेत्यांना मात्र मनसेच्या महाराष्ट्रातील बेरजेने महाराष्ट्राबाहेर वजाबाकी घडेल, अशी भीती वाटते आहे. रिपब्लिकन पक्षाला बरोबर घेऊन असा काय फायदा होणार आहे, आपल्या मतदाराला अशी युती पचनी पडेल काय, असे प्रश्‍न भाजपच्या नेत्यांना अजूनही आहेत. "तिसरा तरी कशाला' हा प्रश्‍न त्यातूनच येत असावा. आठवलेंनी स्वतःचा जागांचा धोशा कमी करावा यासाठी शिवसेनेने पद्धतशीरपणे भाजपचा प्रश्‍न पुढे टाकून आठवलेंना "बॅकफूट'वर ढकलण्याचा प्रयत्न केला.
-->

आता आठवले पुन्हा एकदा "मनसे नकोच' असे म्हणू लागले आहेत. भाजपच्या नेत्यांनीही राज यांना भेटू नये, त्यातून भांडणे वाढतात, असा आठवले यांचा सल्ला आहे. आठवले यांच्या या नव्या साक्षात्काराने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा काही तरंग उठले आहेत. आठवले "पोटात एक आणि ओठात एक' असे करू शकत नाहीत, हे राजकारणात सगळ्यांनाच माहीत आहे. आठवले यांच्या प्रामाणिक सरळपणाबद्दलही कुणाला शंका नाही. त्यामुळे आठवले जे बोलतात त्यातून युतीमध्ये नक्की काय चालले आहे याचा थोडा फार अंदाज येतो. मध्यंतरी अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त नगर जिल्ह्यात चौंडी येथे बोलताना आठवले यांनी मुंडे यांच्या उपस्थितीत "मी उपमुख्यमंत्री होणार' अशी घोषणाच करून टाकली. याचा अर्थ आठवले यांना युतीमध्ये उपमुख्यमंत्रिपद देऊ केले असणार. शिवसेना किंवा भाजपला रिपब्लिकन मते हवी आहेत. आठवले यांच्या युतीत असण्याने त्यातला काही तरी वाटा निश्‍चित मिळेल, असा युतीच्या नेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे "नसण्यापेक्षा असलेले काय वाईट?' या न्यायाने युतीचे नेते आठवले यांना झुलवताहेत.

रिपब्लिकन उमेदवारांनी युतीचे उमेदवार म्हणून युतीतून निवडणूक लढवली तरी युतीची मते त्यांना मिळणार नाहीत याबाबत उद्धव, मुंडे आणि आठवले या तिघांमध्येही एकमत आहे. मग आठवले यांना काही जागा देऊन त्या गमावण्यापेक्षा लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्यक्ष रणमैदानात शिवसेना आणि भाजपचे उमेदवार लढले, त्यांना रिपब्लिकन मते मिळाली तर युतीच्या एकूण जागा वाढतील. त्या वाढीव जागांच्या बळावर आठवलेही उपमुख्यमंत्री होऊ शकतील, असे हे गृहीतक असणार. युतीने घालून दिलेल्या पायंड्यानुसार लोकशाही आघाडीने उपमुख्यमंत्री कायम करून टाकला. आता पुन्हा सत्ता मिळालीच तर दोन उपमुख्यमंत्री करून टाकू, असे युतीच्या नेत्यांनी ठरवले असावे. आठवले त्याशिवाय उपमुख्यमंत्रिपदाची भाषा जाहीरपणे बोलणार नाहीत. म्हणजे अद्याप लोकसभा निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत, तोवर युतीने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजप व रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येकी एक असे दोन उपमुख्यमंत्री, असे वाटप करून टाकलेले दिसते!!

आठवले यांच्या जाहीर वक्तव्यांनी अनेकदा करमणूक होते. आताही ते ज्या वेगाने भूमिका बदलताहेत त्यामुळे युतीच्या राजकीय नाट्याचे कथानक जी अनपेक्षित वळणे घेत आहे, त्यामुळे हमखास करमणूक होते आहे. उद्धव ठाकरे 18 जूनपर्यंत परदेशात आहेत. ते येईपर्यंत आठवले युती नाट्याला आणखी एखादे वळण तर देणार नाहीत ना? शिवसेनेतले नेते मात्र त्यांची "18 जूनपर्यंत तरी काही बोलू नका', अशी मनधरणी करत असतील

राजसाहेबांसोबतचा एक अपुरा वार्तालाप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची परवा भेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आलं. रतन टाटांपासून ते फडणविसांपर्यंत जो उठतो तो राजसाहेबांची भेट घेतो आहे, हे पाहोन आम्हीही "कृष्णकुंज' गाठलं. सोबत बिस्किटांचे पुडे घेतले. "कृष्णकुंजवर फक्त चहाच मिळेल, बिस्किटे ज्याची त्याने आणावीत,' असा फतवा राजसाहेबांनी काढलेला नव्हता. गैरसमज नको !

आम्ही बिस्किटे घेतली ती त्यांच्या श्‍वानासाठी. आम्ही कधी कोणाकडे रिकाम्या हाताने जात नाही. राणेदादांकडे गेलो तर कोळंबीचा डबा घेऊन जातो. आर. आर. आबांकडं गेलो तर खिसा भरून इलायची आणि वेलदोडे घेऊन जातो. फक्त एकदाच घोळ झाला होता. ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाला जाताना आम्ही त्यांना फुंकण्यासाठी मेणबत्त्या घेऊन गेलो होतो. पण "सारखी वीज जाते, म्हणून मला डिवचण्यासाठी मुद्दाम मेणबत्या घेऊन आलात,' असं म्हणून दादा आमच्यावर खवळले होते. असो !

राजसाहेबांच्या श्‍वानाला बिस्किटे खायला घालून आम्ही थेट दिवाणखान्याकडे गेलो, तर राजसाहेब फोनवरून कोणाची तरी झाडाझडती घेत होते. ""हे मला चालणार नाही. मराठी माणसाच्या विकासासाठी तुम्हाला निवडून दिलंय का स्वतःच्या विकासासाठी? आधीच सांगून ठेवतो, मला कामात बदल हवाय....''
""साहेब, नमस्कार!'' आम्ही म्हणालो.""हे पहा, मला महायुतीत यायचं नाही. तुम्ही कोणाचेही दूत म्हणून आला असाल तर लगेच फुटायचं. काय!'' राजसाहेबांनी असं म्हटल्यावर आमची टरकलीच. पण नंतर राजसाहेबांनी आम्हास ओळखलं.
""देवेंद्र फडणवीस तुम्हाला भेटले....''
""मग? तुमच्या का पोटात दुखतंय ? भेटू द्या की!'' राजसाहेबांची गाडी अजून त्यांच्याच रूळावर होती. मग आम्हीच ट्रॅक बदलायचं ठरवलं.
""ते आठवलेसाहेब, रोज कोलांटउड्या मारून स्वतःचं हसं करून इतरांची करमणूक करतायत. महायुतीची सत्ता आल्यानंतर करमणूक खातं नव्यानं तयार करून त्यांच्याकडं द्यावं म्हणजे झालं ! ''
आमच्या या विनोदावर आम्ही बेहद्द खुश झालो आणि त्यामुळे जोरात हसत टाळीसाठी त्यांच्यापुढं हात धरला.
-->
""हे पहा, मी कोणालाही टाळी देणार नाही. मागे घ्या तो हात. जो उठतो तो टाळीसाठी हात पुढं करतो.'' असं म्हणून त्यांनी हाताची घडी घातली. ""गुजरातमध्ये काल झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी शंभर टक्के जागा मिळवल्यात...'' आम्ही पुन्हा ट्रॅक बदलला. "नरेंद्र मोदी' हे नाव ऐकताच त्यांचा चेहरा फुलला.
""विकास कसा करायचा असतो, ते तुम्ही गुजरातमध्ये जाऊन बघा. मोदींनी गुजरातचा अक्षरशः स्वर्ग केलाय. महाराष्ट्राची एकहाती सत्ता आल्यानंतर मीपण तेच करणार आहे. ''
""हल्ली, तुम्ही नगरसेवक व आमदारांची झाडाझडती घेताय..''
""मग नको घ्यायला? निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. झाडाझडती घेतली नाही तर आमचा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे, हे कसं कळणार आणि लोकं तरी आम्हाला मतं कशी देणार? गेल्या वेळी तेरा होते आता तेवढा आकडा तरी गाठला पाहिजे. नाहीतर पक्षाचे तीनतेरा वाजायचे. कळलं ? फुटा आता! ''
""बरेच जण तुम्हाला "आत' घ्यायचं म्हणून मागे लागलेत.''
""मला "आत' घेणारा अजून जन्माला यायचाय,'' राज कडाडले.
""तुमचा गैरसमज होतोय. आत म्हणजे महायुतीत. तीन तिघाडा काम बिघाडाची भीती वाटत असावी, त्यामुळे चौथ्यासाठी....''
आमचे वाक्‍य पूर्ण व्हायच्या आतच राज यांनी सुरक्षारक्षकाला नजरेने इशारा केल्याचा भास आम्हाला झाला, त्यामुळे निरोपाच्या शब्दाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सोडून देत तिथून काढता पाय घेतला.
- तडकामास्टर
राजसाहेबांसोबतचा एक अपुरा वार्तालाप (तडकामास्टर)
- -
शुक्रवार, 7 जून 2013 - 03:45 AM IST

बुधवार, 5 जून 2013

राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये

राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये
गुरुवार, 6 जून 2013 - 03:30 AM IST



मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये येण्याचे निमंत्रण देणारे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज घूमजाव करत मनसेने महायुतीमध्ये येऊ नये, अशी भूमिका मांडली. मनसे महायुतीमध्ये आल्यास महायुतीला फटका बसेल असे ते म्हणाले. उद्धव व राज ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही व त्यांनी एकत्र यावे असेही वाटत नाही. उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे व आपली बैठक होईल व त्यामध्ये मनसेच्या महायुतीमधील प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मनसे नेतृत्वाची वारंवार भेट घेऊ नये अन्यथा महायुतीमध्ये मतभेद निर्माण होईल, असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिला. मनसेला निमंत्रण देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेवर "सामना'ने खरमरीत शब्दांत टीका केली होती. आता शिवसेना नेते रामदास कदम यांच्या राज व उद्धव यांनी एकत्र यावे, या आवाहनाचा व भाजप नेत्यांच्या राज भेटीचा "सामना'ने समाचार घ्यावा, असे त्यांनी शिवसेनेला सुनावले. मनसेला सोबत घेण्याविषयी भाजप आग्रही आहे, मात्र राज ठाकरेंच्या परप्रांतीय विरोधी भूमिकेमुळे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचा या निर्णयाला पाठिंबा मिळण्याची शक्‍यता कमी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय त्यांचा असून हा अधिकार इतरांना नाही. रेसकोर्सच्या जागेचा भाडेकरार राज्य सरकारने वाढवून देऊ नये व त्या जागेवर थीम पार्क उभारावे, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय महिनाभरात व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवाब मलिक  यांनी नाक खुपसू नये आमच्या पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आमच्यात नाक खुपसू नये. त्यांनी आपले प्रवक्तेपद सांभाळावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला. पूर्व मुक्त मार्गाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाने आधी केली आहे. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ मागणी करण्याऐवजी नाव देण्याचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

आठवलेंचा इशारा इंदू मिलच्या जागेवर स्मारकाच्या कामाला 15 ऑगस्टपर्यंत सुरुवात झाली नाही तर पक्षातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आठवलेंनी दिला. इंदू मिलसंदर्भात राज्य सरकारने त्वरित समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली

मंगलवार, 4 जून 2013

देवेंद्र फडणवीस गेले राज ठाकरेंच्या भेटीला


आज सकाळी (दि.5 जून 2013)
फडणवीस यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' येथे जाऊन त्यांची भेट घेतली. या बैठकीतून कोणताही राजकीय निष्कर्ष काढू नका, असे फडणवीस यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यावर मी सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार, असे सांगितले होते. त्यानुसार आज राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे, फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र लोकशाही आघाडी' स्थापनेसंदर्भात ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

रविवार, 2 जून 2013

बुधवार, 29 मई 2013

राज ठाकरे घेणार आज पुण्यात बैठक

पुणे - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रथमच पुणे महापालिकेचे सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी उद्या (गुरुवारी) संवाद साधणार आहेत. पक्षाच्या महापालिकेतील कामकाजाचा आढावा घेतानाच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनेही ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल 29 जागा जिंकून मनसेने दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांनी नुकताच एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे. त्यानिमित्ताने पक्षाचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सोबत डेक्कन येथील पीवायसी जिमखाना येथे सकाळी अकरा वाजता त्यांनी बैठक बोलावली आहे. राज यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांकडून त्यांच्या वर्षभराच्या कामाचा अहवाल मागविला आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. शहराचा प्रारूप विकास आराखडा, त्यावर पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचना आदींचाही आढावा घेतला जाणार असल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी पुण्याची जागा महत्त्वाची मानली जात असून, त्याबाबतही राज यांचे मार्गदर्शन होणार आहे
- -

मंगलवार, 7 मई 2013

शाहरूख खान दहशतवादी नाही - राज ठाकरे

शाहरूख खान दहशतवादी नाही - राज ठाकरे
- - वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2013 - 04:13 PM IST


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलकता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खानच्या वानखेडे मैदानावरील प्रवेशाबाबत पाठराखण करत, शाहरूख खान हा दहशतवादी किंवा गुन्हेगार नाही की ज्यामुळे त्याला मैदानावर जाण्यापासून रोखले जात असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले, ''शाहरूखला आज रात्री होणाऱ्या सामन्यासाठी वानखेडे मैदानावर मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) प्रवेश दिला पाहिजे. त्याने मागील वर्षी घडलेल्या घटनेबाबत सार्वजनिकरित्या माफी मागितलेली आहे. त्यामुळे त्याला माफ करण्यात यावे आणि मैदानात प्रवेश देण्यात यावा.''

शाहरूख खानवर एमसीएकडून वानखेडे मैदानावर प्रवेशासाठी पाच वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. आज रात्री मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये वानखेडेवर सामना होणार आहे. या सामन्याला उपस्थित राहण्यासाठी शाहरूख परवानगी देण्यात यावी, अशी प्रदेश काँग्रेसनेही मागणी केली आहे. मात्र, एमसीएचा त्याला विरोध आहे.

रविवार, 5 मई 2013

राज-गिरीश भेट; 'मनसे' कोडे कोण उलगडणार?

राज-गिरीश भेट; 'मनसे' कोडे कोण उलगडणार?
- कैलास शिंदे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2013 - 02:00 AM IST


जळगाव - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नव्या पिढीचा राजकारणी आणि उमदे नेते, अशीच व्याख्या केली जाते. राजकीय जीवनात ते प्रत्येक पाऊल अत्यंत विचाराने टाकतात. अगदी उगाच करावी म्हणून ते कोणावरही टीका करीत नाहीत. कोणालाही भेटीअगोदर किंवा कोणाचीही भेट घेण्याअगोदर ते त्यांची संपूर्ण माहिती घेतात. माणूस कामाचा आहे असे वाटले तर त्याला वेळ देतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांतर्फे सांगितले जाते. आजच्या जळगाव दौऱ्यात त्यांनी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी बराच वेळ चर्चा केली. त्यामुळे ही भेट राजकारणाच्या नवीन समीकरणाची नांदी ठरेल काय? अशी चर्चा आज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दु:खाच्या समयी "दारावर' भेटण्यास आल्यास त्यात राजकारण करू नये, त्याबाबत विचारही करू नये, असे म्हटले जाते. त्यामुळे राज ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्या केवळ भेटीचा अन्वयार्थ लावला जाऊ शकत नाही. तरीही औरंगाबाद ते मुक्ताईनगर मार्गात जामनेर लागले, तेथे आमदार गिरीश महाजन यांचे निवासस्थान आहे म्हणून राज ठाकरे हे आमदार महाजन यांना भेटावयास गेले, असे सहज होऊ शकते का? असा विचार केला तर राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांच्या बाबतीत असा विचार होऊच शकत नाही. दोन्ही ठाकरे बंधू सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर फिरत आहेत. राज ठाकरे यांनी जळगाव येथे जाहीर सभा घेऊन महाराष्ट्र दौरा संपविला; परंतु या संपूर्ण दौऱ्यात ते कोणालाही उगाच भेटलेले नाहीत. काही ठिकाणी तर इतर पक्षांच्या भेटावयास आलेल्या नेत्यांचीही भेट नाकारल्याचे वृत्त आहे. मग ते आज जामनेर येथे आमदार महाजन यांच्या निवासस्थानी स्वत: गेले. बराच वेळ थांबले. यामागे कारण "राजकीय' निश्‍चित आहे.
आमदार महाजन हे सध्या भाजपमध्ये नाराजच आहेत. आज त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीसपद आहे. दोन वर्षांपूर्वी जळगाव येथे भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. त्या वेळी आमदार महाजन हे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. गिरीश महाजन की सुधीर मुनगंटीवार अशी स्पर्धा होती. त्या वेळी प्रदेशाध्यक्षपदी मुनगंटीवार यांचे नाव जाहीर झाले. आमदार महाजन यांनी जळगावात कार्यक्रम आहे, आपण यजमान आहोत याचे भान ठेवून मुनगंटीवार यांच्या निवडीचे स्वागत केले. त्यानंतर दोन वर्षांनी अशी कोणती किमया घडली की महाजन यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून एकदम मागे पडले? या वेळी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचे नावही घेण्यात आले नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांत पक्षाच्या प्रदेशस्तरावर आमदार महाजन यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. नाशिक महापालिकेत भाजप, शिवसेना आणि मनसे एकत्रीकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या समन्वयातूनच राज्यात नाशिक महापालिकेत प्रथम भाजप, शिवसेना आणि मनसेची युती झाली. याशिवाय, जळगाव जिल्हा परिषदेत भाजप- शिवसेना युतीतही वाद झाला होता. मात्र, त्यांनी समझौता घडवून आणला आणि पुन्हा युतीची सत्ता आली. शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते आमदार सुरेशदादा जैन यांचे जिल्हा भाजपशी फारशी पटत नाही; परंतु आमदार महाजन यांच्याशी मात्र त्यांची घट्ट मैत्री आहे. अटकेनंतर आमदार जैन यांची त्यांनी अनेक वेळा भेटही घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात युतीचे "नाते' काहीअंशी जुळवून ठेवले आहे. आमदार महाजन यांनी पक्षासाठी प्रत्येक वेळी कार्य केले. प्रदेशस्तरावरून त्यांच्या कामाची दखल घेतली गेली नाही. भाजपमध्ये राष्ट्रीयस्तरावर नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात वाद असल्याचे गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. राज्यात मुंडे गट जोरात आहे. त्यातही आमदार महाजन हे "गडकरी गटा'चे मानले जातात. 

त्यामुळे आमदार महाजन यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून मागे पाडण्यात आले. या वेळी तर प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचे नावही घेण्यात आले नाही. प्रदेशाध्यक्षपद हे एकमेव कारणच नसले, तरी जिल्ह्यातील अंतर्गत वाद यामुळे त्यांची पक्षात नाराजीच आहे. यातच नुकत्याच झालेल्या जामनेर महापालिका निवडणुकीतही भाजपचा पराभव झाला आणि आमदार महाजन यांची पालिकेवरची पकड निसटली. मात्र, यामागेही आमदार महाजन यांची "नाराजी'ची खेळी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी अद्याप तरी उघडपणे कुठेही जाहीर केली नाही. पक्षातील लहान कार्यकर्त्यांपासून तर राज्यातील पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्याबाबतची माहिती आहे. शिवसेनेचे नेते आमदार रामदास कदम यांनी नुकतेच शिवसेनेत होणारी "घुसमट' जाहीरपणे व्यक्त केली. त्यांच्याप्रमाणेच आमदार महाजन हेही पक्षातील नाराजीचा केव्हा तरी "स्फोट' करण्याची शक्‍यता आहे. मात्र, ते वेळ शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचेही सांगितले जात आहे.
आमदार महाजन यांची भाजपमध्ये होत असलेल्या अंतर्गत घुसमटीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांची प्रदीर्घ झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राज्यात सत्तेवर यायचे असेल, राज्यातील प्रत्येक भागावर आपले प्रभुत्व असले पाहिजे, याची चांगली जाण राज ठाकरे यांना आहे. त्यामुळे पक्षबांधणीसाठी राज्यात ते अशाच उमद्या शिलेदाराच्या शोधात आहेत. खानदेशात गिरीश महाजन यांच्यासारखा शिलेदार मिळाल्यास पक्षाला निश्‍चित बळकटी येईल, याचा त्यांना विश्‍वास आहे.
जळगाव येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी केवळ एका "चिठ्ठी'वर कोणतेही न केलेले "राजकीय भाष्य' आणि आजच्या दौऱ्यात आमदार महाजन यांची घेतलेली प्रदीर्घ भेट याचे काही "नाते' निश्‍चित नसावे, असे मानले तरीही राज ठाकरे हे कुणालाही उगाच भेटत नाहीत, हेसुद्धा विसरून चालणार नाही. मात्र, ठाकरे- महाजन भेटीचे "राज' केव्हातरी "मनसे' उघड होईलच ना! त्यामुळे आपण एवढेच म्हणू शकतो, "भाई, आगे- आगे देखो होता है क्‍या?'



OTHER VIDEO



Watch Marathi Movies बालक पालक

राज ठाकरे आले अन्‌ छावणी पाहून गेले!

फुलंब्री- फर्शी फाटा येथे मनसेतर्फे उभारण्यात आलेल्या जनावरांच्या छावणीस राज ठाकरे यांनी रविवारी (ता. 5) भेट दिली. राज ठाकरे येणार असल्याने सर्व स्तरांतील लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.

राज ठाकरे नेहमीच्या स्टाईलने वाहनातून उतरले. चारा छावणीपासून 15 ते 20 फूट अंतरावर उभे राहून त्यांनी जनावरांची पाहणी केली. ते येथे जवळपास 15 मिनिटे थांबले. राज यांच्यासाठी छावणी हा नवा विषय होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे बरेच प्रतिनिधी होते; मात्र कोणतेही आवाहन न करता अथवा छावणीबाबत काहीही न सांगता राज निघून गेले.

पुरणपोळी थाळीतच!
राज ठाकरे भेट देण्यासाठी येणार म्हणून छावणीच्या प्रथम रांगेत गाय-वासरू व दुभत्या गाई बांधल्या होत्या. या जनावरांना राज यांच्या हाताने पुरणपोळी भरवायची होती म्हणून दोन-तीन कार्यकर्ते थाळीमध्ये पुरणपोळी घेऊन उभे होते.
त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर राज म्हणाले, "हे काय आहे?' तेव्हा कार्यकर्त्यांनी पुरणपोळी आपल्या हाताने गोमातांना भरवायची आहे, असे सांगितले. तेव्हा राज म्हणाले, "तूच खा आणि बाजूला हो.' लगेच पुरणपोळीवाले बाजूला सरकले. राज निघून गेले. पुरणपोळी थाळीतच राहिली. नंतर इतर कार्यकर्त्यांनी पुरणपोळ्या जनावरांना भरविल्या.


OTHER VIDEO

बुधवार, 1 मई 2013

Ibn Lokmat Raj Thackre exclusive interview FULL

PART 1

PART 2

PART 3

सोमवार, 15 अप्रैल 2013

राज ठाकरेंना घरचा आहेर -


राज ठाकरेंना घरचा आहेर -
 मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 12:30 AM IST
 मुंबई - महाराष्ट्रात दुष्काळ आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने रद्द करा, अशी जाहीर भूमिका घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना घरचाच आहेर मिळाला आहे. त्यांची मुलगी उर्वशीने मुंबई इंडियन्सला पाठिंबा देत एका सामन्याला हजेरी लावली होती. हीच पोस्ट सध्या फेसबुकवर लोकप्रिय झाली असून, तो युजर्ससाठी चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या आठवड्यातील शनिवारच्या या पोस्टला फेसबुकरांनी चांगली पसंती दाखवत 233 वेळा शेअर केली आहे. त्यावर कमेंट्‌सही आल्या आहेत. जीन्स आणि टी शर्ट हीच का ती मराठी संस्कृती, असा सवालही फेसबुक पोस्टमधून केला आहे. मुंबई इंडियन्सचा टी शर्ट घातलेल्या उर्वशीसोबत आणखी काही जण फेसबुक पोस्टमध्ये आहेत. या पोस्टवरून मराठा आरक्षण विरोधापासून ते घरातील संस्कृतीपर्यंत राज ठाकरेंना सुनावले आहे. "आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट' अशा कमेंट्‌सपासून ते आधी घर सुधारा मग महाराष्ट्र, अशाही कमेंट्‌स केल्या आहेत. काही युजर्सनी या पोस्टवर राजकारण सुरू झाल्याने ते थांबविण्याचे आवाहन केले आहे
Please Subscribe my Youtube Channel Here

रविवार, 7 अप्रैल 2013

महाराष्ट्रात परप्रांतीयांचा सुळसुळाट - राज

महाराष्ट्रात परप्रांतीयांचा सुळसुळाट - राज
 

- सकाळ वृत्तसेवा
Monday, April 08, 2013 AT 02:45 AM (IST)

जळगाव - मराठी माणसासाठी एकत्र येण्याची गरज असताना मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली लोकांची माथी भडकविण्याचे उद्योग राज्यातील आघाडी सरकारकडूनच करण्यात येत आहेत. मराठी माणसांची जाती-जातींत वाटणी करून मत विभागणीचे सरकारचेच षडयंत्र आहे, अशी सडकून टीका मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केली. जळगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सांगता आज जळगाव येथील सभेने झाली. सागर पार्कच्या भव्य मैदानावर झालेल्या सभेस नागरिकांची प्रचंड उपस्थिती होती. व्यासपीठावर आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर उपस्थित होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळी समाजाचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे अशी महाराष्ट्रातील महापुरुषांचीही जातीनिहाय वाटणी या नेत्यांनी आपल्या राजकारणासाठी करून टाकलेली आहे, तिथे जनसामान्यांना काय गोष्ट लावली? जातीवरून माथी भडकविण्याचे काम नुसतेच सत्ताधारी करताहेत, असे नाही. सत्ताधारी आणि विरोधक मिळून हाच एक उद्योग करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने आता सावध झाले पाहिजे. महाराष्ट्रातील प्रश्‍नांसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत नाहीत, परंतु जातीचे राजकारण करण्यासाठी मात्र दोघे एकत्र येतात. महाराष्ट्रातील जनतेने विशेषत: युवकांनी जाती-पातीचे हे राजकारण मोडून काढण्याची वेळ आली आहे. सावध होण्याची वेळ आलेली आहे. इथले राजे गाफील आहेत म्हणूनच परप्रांतीयांना इथे फावते आहे. अशाच एका गाफील क्षणांत अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा बुलंद किल्ला काबीज केला होता. पुढे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात ऐक्‍याचा जागर केला आणि परिस्थिती बदलली. इथे उद्योग उभारायचा तर मराठी तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, अशी अट अन्य सगळ्या प्रांतांतून घातली जाते, पण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडून तसे काहीही होत नाही. महाराष्ट्र सगळ्यांना मोकळा करून दिलेला आहे आणि इथल्या तरुणांचा मात्र श्‍वास गुदमरतो आहे. मराठी तरुणांना नोकऱ्यांसाठी मी भांडतो तर माझ्यावर केसेस केल्या जातात. आजमितीला माझ्यावर 89 केसेस आहेत, मला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. मेलेल्या कोंबड्याला कसली आली आगीची भीती, असा सवालही त्यांनी केला.

मुद्दाम विभागला महाराष्ट्र
राज पुढे म्हणाले, ""संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्यात आले. अनेकांनी हौतात्म्य पत्करले, परंतु आज विभागनिहाय महाराष्ट्र विभक्त करण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा अस्मिता जाणीवपूर्वक रुजवण्यात येत आहेत. महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्रातले प्रश्‍न सारखेच आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचा प्रश्‍न आहे. महाराष्ट्राची अशी विभागणी योग्य नाही. मला एकसंध महाराष्ट्रच दिसतो. माझा मतदार संघ म्हणजे महाराष्ट्र आहे.''

मराठी मुलांना नोकऱ्या हव्याच
महाराष्ट्रात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. खासगी उद्योगांतूनही त्यांना प्रथम प्राधान्य मिळालेच पाहिजे. त्यांच्यासाठी मी काल लढत होतो. आज लढतो आहे आणि उद्याही लढत राहीन. तमिळनाडू, गुजरात, आसाम राज्यात तेथील स्थानिक मुलांना सर्वत्रच नोकऱ्यांत प्राधान्य दिले जाते, मग महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रात मराठीतच कारभार झाला पाहिजे. प्रत्येक दुकानाबाहेर मराठीत पाटी लागलीच पाहिजे. मराठी भाषेला महाराष्ट्रातच दुय्यम दर्जा मी खपवून घेणार नाही.

गर्दीचा भ्रमनिरास!
राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, जळगावच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार सुरेशदादा जैन यांच्याबाबत ते काहीतरी बोलतील, अशी जनतेची अपेक्षा होती. राज यांनी केवळ एका वाक्‍यात बोळवण करून लोकांची निराशा केली. कुठल्याही स्थानिक प्रश्‍नावर वा विषयावर ते बोलले नाहीत, यामुळे निराशा झाली, असे अनेकांनी सभेतून परतताना सांगितले.

अजित पवारांना पैशांचा माज!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. राज म्हणाले, ""महाराष्ट्रातील जनता पाण्यासाठी होरपळतेय आणि अजित पवार म्हणतात, धरणात पाणी नाही म्हणून मी "मुतू' काय? त्यांना पैशाचा माज आलाय. त्यामुळेच त्यांनी अशी गलिच्छ भाषा वापरली आहे, मात्र येत्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार मत मागतील तर त्यांना हीच जनता "मूत' देईल आणि त्यांना आपल्या "मुतात' वाहूनही टाकील.

जैन, खडसेंनी उधळले 95 कोटी
राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे व आमदार सुरेशदादा जैन यांचा थोडक्‍यात समाचार ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले, नागपूर येथे नितीन गडकरी यांच्या मुलाच्या लग्नात सुरेशदादा भेटले, त्यांनी मला भेटण्याचा निरोप दिला, ते भेटले त्यावेळी ते म्हणाले (सुरेशदादांची नक्कल करून) विधानपरिषद निवडणुकीत मी 45 कोटी खर्च केले, नाथाभाऊनी 40 कोटी खर्च केले. खरंच एका साध्या आमदारासाठी दोघांनी 95 कोटी खर्च केले असतील तर ते दुर्दैवच आहे. आज महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय पण निवडणुकीत एवढा पैसा खर्च होतो. हे चित्रही तुम्हाला बदलावे लागणार आहे.