मुंबई - मराठीच्या मुद्द्यावर आग्रही आणि आक्रमक भूमिका मांडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावर जनतेने आपल्या आशाआकांक्षा ई-मेलच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. भाषाविषयक अस्मिता, रोजगार, शिक्षण, आरक्षण या प्रत्येक मुद्द्याबाबत राज्यातल्याच नाही; तर देश-विदेशांतील अनेक मराठी माणसांनी आपल्या भावना येथे व्यक्त केल्या आहेत. अधिकाधिक तरुणांना आकर्षित करणारा पक्ष अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आता सर्वश्रुत आहेच. त्याचा दाखला खुद्द मनसेच्या वेबसाईटवरील या सूचनांमध्येही मिळतो. हा पक्षाच्या वेबसाईटस्पासून पक्षातील कार्यकर्त्यांच्या कपड्यांपर्यंत, पक्षाच्या झेंड्यापासून ते पक्षपरिचयाच्या पुस्तिकेपर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याच्याही अनेक रंजक सूचना देशविदेशांतील विद्यार्थ्यांनी पाठवल्या आहेत. मराठी माणसांसाठी झगडणाऱ्या या पक्षाकडे मराठी संस्कृती-परंपरेची वेगळी ओळख सांगणारी "टोपी'देखील कार्यकर्त्यांच्या पेहरावामध्ये हवीच, अशीही आग्रही सूचना येथे केली गेली आहे. नागरी जीवनातील ताणतणाव, नागरी सुविधांवर येणारा अतिरिक्त ताण, पाणी, ऊर्जा, महागाई, प्रशासन व्यवस्थेमधील भ्रष्टाचार याबाबत न्याय मागण्यासाठीही राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणांनी आपल्या आग्रही मागण्या नोंदवल्या आहेत. आज शिक्षण, नोकरी-धंद्यानिमित्त शहरांतील अनेक तरुण देश-विदेशामध्ये स्थित आहेत. तेथे गेल्यानंतर त्यांना आपल्या भाषेविषयी, येथील मातीविषयी वाटणारी ओढही त्यांनी राज ठाकरे यांना पत्राद्वारे लिहून पाठवली आहे. मनसेची भूमिका आणि त्याविषयी आपले मत नोंदवणाऱ्या मनसेप्रेमींप्रमाणेच मनसेच्या मराठीच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी दर्शवणाऱ्यांच्याही नापसंतीही येथे व्यक्त होत अस
ते. मुंबई केवळ मराठी माणसांची नसून, ती आमचीदेखील आहे, असा "आपलेपणा' दाखवणाऱ्या ई-मेल्सची संख्याही इथे मोठी आहे; मात्र या "हेट मेल्स'ना येथे टाळले जात नसून त्यांनाही येथे उत्तरे दिली जातात, असे मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी "सकाळ'ला सांगितले. राज्यातील विविध गावांमध्ये असणारे गडकिल्ले, त्यांची परंपरा, त्या गावातील वेगळ्या चालीरीतींची माहिती देणारेही येथे आहेत. निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे मनसेचा दहा कलमी कार्यक्रम काय असावा, असे मोठाले जाहीरनामेही लिहून पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

website is very good
जवाब देंहटाएं