राहुल गांधींचा मुंबई दौरा म्हणजे 'पॅकेज डील' - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 17, 2010 AT 01:00 AM (IST)
रत्नागिरी - "कॉंग्रेसच्या राहुल गांधींचा मुंबई दौरा हा ठरवून केलेले "पॅकेज डील' आहे. या दौऱ्यात त्यांनी केलेली राजकीय वक्तव्ये म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. त्यांचा दौराही शाहरूख खानसारखाच ठरवून केलेला वाटला,'' अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याची खिल्ली उडविली.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या राज ठाकरे यांची शासकीय विश्रामगृहात पत्रकारांनी भेट घेतली. सुरवातीलाच मी पत्रकार परिषद घेत नाही. तुम्ही प्रश्न विचाराल तर त्याची मी नक्कीच उत्तरे देईन, असे सांगून प्रस्तावना टाळली. राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी वक्तव्य केले नव्हते; मात्र काही काळ गेल्यानंतर आज रत्नागिरीत त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी राहुल गांधींचा दौरा हा ठरवून केल्याचे सांगत त्यांची खिल्ली उडविली.
माडबन आणि एकूणच ऊर्जा प्रकल्पांबाबत त्यांची भूमिका ही सावधपणाची होती. ते म्हणाले, ""ऊर्जा प्रकल्प हे काळाची गरज आहे. त्यामुळे लोकांचा विरोध का आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. माडबन प्रकल्पामुळे होणाऱ्या धोक्याविषयी तेथील लोकांना माहिती दिली पाहिजे. अमेरिकने हे प्रकल्प का बंद केले याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. दुसऱ्याने टाकून दिलेल्या गोष्टी उचलायला काही महाराष्ट्र लुळा-पांगळा नाहीय. ज्या प्रकल्पांना विरोध करायचा त्यांना मनसे स्टाईलने विरोध नक्कीच करणार.''
संघटनेतील फेरबदलासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सध्या कोणतेही बदल करणार नसल्याचे सांगितले. पदाधिकारी हे तरुण, उमेदीचे आहेत. त्यांच्याकडे अनुभव नाही. ती कमी पूर्ण झाली तर ते उत्तम काम करू शकतील. संयम ठेवून काम करीत आहेत. त्यामुळे भविष्य चांगले आहे, असे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले. सुरक्षिततेमध्ये पोलिस कमी पडत आहेत का याविषयी विचारले असता ते म्हणाले, ""याला पोलिस जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही. सरकारचे धोरणच नसल्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा पुढे येत आहे. त्यासाठी मुळात योग्य धोरण ठरविण्याची गरज आहे.''
"ती' रेकॉर्ड जुनी
ऑस्ट्रेलियाच्या संघाला खेळू देणार असा इशारा दिल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार भेट हा विषय दुसरीकडे फिरविण्याचा प्रकार आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंची काल (ता. 15) काही वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेली ती रेकॉर्डही पवार यांच्या भेटीपूर्वीची असल्याचा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे. याविषयी आजच सकाळी मला मुंबईच्या काही पत्रकारांनी ही माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामध्ये किती सत्य आहे हे मला माहिती नाही, असे सांगतानाच यावरून खेळाडूंना खेळायला देणार नाही ही धमकी एक प्रकारे गंमतीशीर असल्याचा टोलाही लगावला
RAJ, tumachya aandolananmule maharashtrachya paristhitit farak padato aahech.kadhi +ve, kadhi -ve.jar tumhala kharach maharashtrata badal hawa asel tar bharatabaher gelela black money parat aananyasathi kahi prayatna kara, mag kuthalyahi aandolanat akhkha maharashtrata tumachya pathishi aselacha shivay kunihi tumachya kade bot dakhavinyachi himmat karnar nahi.agadi manapasun........
जवाब देंहटाएंek goshta mala saglyancha lakshat anaychi ahe aj ithe ti mhanje aaj "vinda karandikar" gele ani hya english ,hindi channels var ek sadhi baatmi soda subtitle madhe hi varnan nahi ho tyacha...kay chukicha mhantahet mag amche raj saheb....gruhit dhartat aplyala he sagli loka....raj sahebancha mhana kadachit ata patel lokana
जवाब देंहटाएं