राज ठाकरेही जेव्हा जामिनासाठी वाट पाहतात...
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 22, 2010 AT 12:00 AM (IST)
कळंब येथील दंगलप्रकऱणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरील खटल्याच्या सुनावणीसाठी ते येथे आले होते. या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मिळू शकतो. मात्र, त्यासाठी सक्षम व्यक्तीचा जामीन मिळणे आवश्यक होते. कळंब येथील पदाधिकाऱयांना हे लक्षात न आल्याने त्यांनी तशी व्यवस्थाच केली नाही. परिणामी, न्यायालयाचे व्यवहार सुरू झाल्यानंतरही राज ठाकरे यांचा खटला सुनावणीसाठी घेतला गेला नव्हता. या प्रकाराने संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱयांना अक्षरशः हाकलून लावले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली आणि अखेर त्यांना जामीन मिळाला.
उमरगा येथे एसटी बसवर दगडफेक प्रकरणी सोमवारी तेथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांनी राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें