'भगव्याखाली मराठी माणसाने एकत्र यावे'
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 02:51 PM (IST)
मुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्यासाठी आज (रविवार) मुकमोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मराठी माणसाच्या विकासासाठी भगव्या झेंडाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र चळवळतर्फे आज सकाळी शिवाजी पार्कपासून या मुकमोर्चाला सुरवात झाली. चळवळीचे प्रमुख सतीश वळंजू यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सुरवातीला मोर्चा राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' याठिकाणी गेला. राज ठाकरे बाहेर गेले असल्याने त्यांची राज ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. यानंतर मोर्चा 'मातोश्री'कडे रवाना झाला. तिथे त्यांची भेट उद्धव ठाकरे यांच्याशी झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मोर्चा काढून प्रयत्न वाया घालविता मराठी माणसाच्या कल्याणासाठी भगव्याखाली एकत्र येण्याचे सांगितले. तसेच त्यांनी शिवसेनेला कोणाची गरज नसल्याचे सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें