मराठी शाळांच्या मुद्यावर राज आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
Monday, October 04, 2010 AT 12:10 PM (IST)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची "वर्षा' या त्यांच्या निवासस्थानी सकाळी साडेनऊला वाजता भेट घेतली. राज ठाकरे यांनी नवीन मराठी शाळांच्या परवानगीवरून आक्रमक भूमिका घेतली असून, नवीन मराठी शाळांना परवानगी का देण्यात येत नाही? असा सवाल यावेळी केला.
नवीन मराठी शाळांचे प्रस्ताव स्वीकारून विनाअनुदानित, दर्जेदार मराठी शाळांना सरकारने त्वरित परवानगी द्यावी, मराठी शाळांविरोधात हेतुपुरस्सर धोरण न राबवता परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बैठकीत त्यांनी टॅक्सी परवाना नुतनीकरणाचाही मुद्दा उपस्थित केला.
विधान परिषद निवडणुकीनंतर मनसेच्या चार आमदारांचे निलंबन मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्राबाबत चर्चा केली होती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें