राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस
वृत्तसंस्था
Saturday, October 30, 2010 AT 12:48 PM (IST)
मुंबई- कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईतून डोंबिवलीत तळ हलविलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य निवडणूक आयोगाने डोंबिवली सोडण्यासाठी नोटीस बजावली आहे.
या निवडणुकीसाठी मतदान रविवारी (३१ ऑक्टोबर) सुरू होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील आपला तळ हलविणे आवश्यक आहे.
शुक्रवारी रात्री डोंबिवलीच्या पूर्व भागातील ठाकरे यांच्या निवासस्थानी आयोगाने ही नोटीस बजावली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें