कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने माफिया राज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 30, 2011 AT 01:10 AM (IST)
जळगाव - उत्तर महाराष्ट्रात तेलमाफीया, वाळू माफिया, रॉकेल माफीयांवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरदहस्त आहे. यामुळे माफियांची हिम्मत संबंधित अधिकाऱ्यांवर हल्ले करण्या इतपत झाली आहे. याचे उदाहरण पानेवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांची झालेली हत्या आहे. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस ऍड. जयप्रकाश बाविस्कर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
राज्यात स्वच्छ प्रतिमेचे शासन देणारे एकमेव "मनसे' चे देवू शकणार आहे. माफियांचे राज संपविण्यासाठी मनसे' आगामी काळात घरोघर भेटी देवून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. यासाठी तालुका निहाय मनसे'चे मेळावे घेण्यात येणार आहे.
मनसे'चे जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे, प्रा. आर.एम. राठोड यावेळी उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें