सचिनला एफएसआय नाकारणे ही दुर्दैवी बाब
-
Wednesday, February 23, 2011 AT 12:30 AM (IST)
वांद्रे पश्चिम येथील हिल रोडवर सचिन बंगला बांधत असून त्या बंगल्यात त्याला स्वतंत्र जीम बांधायची आहे, त्यासाठी त्याला अतिरिक्त एफएसआयची गरज आहे. त्यासाठी सचिनने किमान 250 ते 300 चौ. फूट अतिरिक्त एफएसआय मिळावा यासाठी नगरविकास विभागाकडे अर्ज केला होता. पण सचिनला अतिरिक्त एफएसआय देण्यास नगरविकास विभागाने नकार दिल्याचे वृत्त वाचून आपणास अतिशय खंत वाटली, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरांमधील अनधिकृत झोपड्यांवर कोणीही कायद्याचा बडगा उगारीत नाही. सुमद्रकिनारीही बिनधास्तपणे बेकायदा बांधकामे केली जातात. असंख्य लोक "आदर्श'पणे एफएसआय ढापतात. पण सचिनसारख्या जगविख्यात खेळाडूला सरकार एफएसआय कशी नाकारू शकते, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. जर त्यांनी परवानगी न मागताच बांधकाम केले असते तर मग नगरविकास विभागाने काय नंतर तपासणी केली असती का, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या बाहेरून येथे येऊन अनधिकृतपणे झोपड्या बांधायच्या. कालांतराने या झोपड्या अधिकृत करून बाहेरच्या लोकांना अधिकृतपणे घर सरकार देऊ शकते. सचिन गुजरात किंवा तामिळनाडूसारख्या राज्यात जन्माला आला असता तर तेथील सरकारने सचिनला काय काय दिले असते. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच असलेल्या नगरविकास खात्याकडून एकही फाईल हलत नसताना नेमकी सचिनच्याच फाईलला या विभागाने कसा काय नकार दिला? मुख्यमंत्र्यांनी उलट ही फाईल स्वतःहून मागवून घेऊन त्यावर कार्यवाही करणे आवश्यक होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सर्वपक्षीय आवाहनया संदर्भात आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र देणार आहोत. पण सचिनसाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यावे व मुख्यमंत्र्यांकडे मागणी करावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांशी आपण बोलणार आहोत, असेही राज यांनी नमूद केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें