राज ठाकरेंना फुल देणाऱ्या पोलिसावर कारवाई
- वृत्तसंस्था
Wednesday, September 26, 2012 AT 12:00 PM (IST)
मुंबई
- काही दिवसांपूर्वी भर सभेमध्ये व्यासपीठावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांना पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद तावडे यांनी गुलाबपुष्प दिले होते.
याप्रकरणी शिस्तभंगाच्या कारवाईला तावडे यांना सामोरे जावे लागणार आहे. तशी
कारवाई सुरु झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रॅली काढली होती. गिरगाव चौपाटीवर त्यांची सभासुद्धा झाली. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद तावडे यांनी व्यासपीठावर जाऊन राज ठाकरे यांना गुलाबपुष्प दिले होते. पोलिसांची बाजू मांडल्याबाबत त्यांचे अभिनंदनही केले. त्यामुळे तावडे एका क्षणात महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. मात्र, त्यांना आता याची किंमत मोजावी लागणार आहे. उपायुक्त बीएम यादव (वायरलेस) या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. यासंदर्भातील अहवाल लवकराच लवकर उपायुक्तांपुढे सादर करण्याचे आदेश मिळाले आहेत.
पोलिस कॉन्स्टेबल तावडे हे भायखळा वायरलेस डिव्हीजन अंतर्गत त्यादिवशी ड्यूटीवर होते. वरिष्ठांची परवानगी न घेता किंवा वरिष्ठांना कल्पना न देता ड्यूटीची जागा सोडणे, अंगावर वर्दी असताना एखाद्या राजकीय कार्यक्रमात सहभागी होत नेत्याला गुलाबपुष्प देणे आणि अंगावर वर्दी असताना प्रसारमाध्यमांसमोर पोलिस खात्यासंदर्भातील चुकिचे मत मांडणे हे तीन आरोप त्यांच्यावर, ठेवण्यात आले आहेत
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें