राज ठाकरे यांची तोफ नववर्षापासून पुन्हा धडाडणार
-
Thursday, October 25, 2012 AT 03:45 AM (IST)
मुंबई - मी सध्या काय करतोय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण मी कुठेही गेलेलो नाही. सणासुदीचे दिवस असल्याने मी गप्प आहे. मात्र नववर्षापासून माझी तोफ पुन्हा धडाडू लागेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले.
सहकारी बॅंक नवनिर्माण कर्मचारी सेनेच्या करी रोड येथील कार्यालयाचे आज राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मंगेश सांगळे, प्रकाश भोईर, नाशिकचे महापौर यतिन वाघ, मनसेचे सरचिटणीस प्रवीण दरेकर, पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई विभागीय अध्यक्ष नितीन बनकर व संयुक्त सरचिटणीस अनिल गजरे, सहकारी बॅंक नवनिर्माण कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष विनायक म्हशीलकर व खजिनदार अमिन शेख आदी उपस्थित होते.
सहकार क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी, सहकार क्षेत्रातील कामगार, बेरोजगार, महिला, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क व अधिकारांची माहिती देण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी मनसेने सहकारी बॅंक नवनिर्माण कर्मचारी सेनेची स्थापना झाली आहे, असे शिवाजीराव नलावडे सांगितले.
राज्यात सव्वादोन लाख नोंदणीकृत सहकार संस्था आहेत. या संस्थांचे 8 कोटी 80 लाख सभासद आहेत. आमचे स्वयंसेवक या सभासदांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन करतील. त्यादृष्टीने या स्वयंसेवकांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती नलावडे यांनी या कार्यक्रमांनतर "सकाळ'ला दिली
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें