- वृत्तसंस्था
Wednesday, January 30, 2013 AT 10:24 AM (IST)
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या
निधनानंतर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रथमच महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी
दर्शविली आहे.
'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध झाली असून, या मुलाखतीतून राज ठाकरेंशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. मुलाखतीत टाळी एका हाताने वाजत नाही असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले, की शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही फक्त माझ्याकडेच कसे मागू शकता. मी उत्तर द्यायला तयार आहे, पण उत्तरच हवे असेल तर त्यासाठी तुम्ही दोघांना एकत्र आणून समोरासमोर बसविले पाहिजे. मग, तुम्ही हा प्रश्न दोघांना विचारला तर बरे होईल. या प्रश्नाचे उत्तर दोन बाजूंवरती अवलंबून आहे. एका बाजूवर नाही. शिवसेनेसोबत कोणी मनापासून येणार असेल तर त्यांचे मी स्वागतच करेन.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें