थेट संपर्क साधण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन
मुंबई - विदेशी कलाकारांना सोबत घेऊन काम करताना अथवा रस्त्यावर चित्रीकरण करताना मनसेच्या नावाखाली कोणीही पैशांची मागणी केल्यास थेट आपल्या स्वीय सहायकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. चित्रपट आणि दूरदर्शन व्यवसायातील निर्मात्यांनी मराठीचा अपमान होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काही दिवसांपासून मनसेच्या संघटनांकडून विविध कारणांमुळे चित्रीकरण बंद पाडले जात असल्याच्या तक्रारी राज यांच्याकडे आल्या होत्या. त्यावेळी काही घटनांमध्ये मनसेचा संबंध नसतानाही काही जणांनी मनसेच्या नावाचा वापर केल्याचे निदर्शनास आले होते. अखेर याची गंभीर दखल घेऊन राज यांनी थेट जाहीर आवाहन करून अशाप्रकारे कोणी पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्यास पक्षाकडे संपर्क साधण्यास सांगितले आहे. अशा प्रकारात मनसेचा कार्यकर्ता सापडल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. चित्रपट क्षेत्रातील वेशभूषाकार, प्रकाश योजनाकार, मदतनीस आदींनी एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे सुमारे 20 हजार सभासद आहेत. या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधातील काम सुरूच राहणार आहे, पण या संघटनेच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्यास हर्षल देशपांडे 9821023032, सचिन मोरे 9870000099 अथवा मनोज हाटे 9833555769 यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें