मंगळवार, 21 जानेवारी 2014 - 03:15 AM IST
नाशिक - गेल्या दोन वर्षांपासून
महापालिकेत सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांची आज
पक्षाध्यक्ष राज ठाकरे स्वतः परीक्षा घेणार असून, त्यात केलेल्या कामांचा
आढावा घेतला जाणार आहे. परीक्षेसाठी मनसेचे नगरसेवक सकाळी एकत्रितरीत्या
एका खासगी बसने रवाना होणार आहेत.
मुंबईतील आजच्या बैठकीत "राज' यांच्या मूडवर सारे काही अवलंबून असल्याचे नगरसेवकांमधून सांगितले जात आहे. नगरसेवकांनी तक्रारींचा सूर आळवला तर कदाचित "राज' यांनी दोन दिवसांत सत्ता सोडण्यासाठी तयार राहण्याचे केलेले सूतोवाच प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता मनसेच्या गटातून व्यक्त केली जात असल्याने नगरसेवकांची धडधड वाढली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यात तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान पक्षांतर्गत वाढत्या कुरबुरी व दोन वर्षांच्या सत्ताकाळात विकासकामे न झाल्याने श्री. ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करीत मला सत्तेची गरज नाही. दोन दिवसांत सत्ता सोडण्यास तयार राहा, असा इशारा दिला होता.
ठाकरे मुंबईत पोचल्यानंतर "कृष्णकुंज'वरून नगरसेवकांना मुंबईत बोलविण्यात आले. उद्या (ता. 21) सकाळी सहाच्या सुमारास मनसेचे सर्व नगरसेवक एका खासगी बसने रवाना होणार आहेत. दरम्यान, ठाकरे यांच्या बैठकीत नगरसेवकांना किती वेळ देतील व मिळालेल्या वेळेत कामांचा सारीपाट कसा सादर करता येईल, या विवंचनेत नगरसेवक असल्याचे दिसून येत आहे.
तक्रारींचा सूर अधिक..!
पक्षाध्यक्ष राज ठाकरे वेळ देणार असल्याने मनसेच्या सर्वच नगरसेवकांनी दोन वर्षांत केलेल्या कामांची उजळणी
केली. ठाकरे यांच्यासमोर विकासकामे सादर करताना दोन वर्षांत कुठे अपयश आले याचीही माहिती तक्रारीच्या स्वरूपात दिली जाणार असल्याचे मनसेच्या गोटातून सांगण्यात येत आहे. महासभेत भूमिका मांडताना आलेले अपयश, केलेल्या कामांची व्यवस्थित माहिती जनतेसमोर न गेल्याने त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर झालेला परिणाम, महापालिकेत सत्ता असताना न झालेली कामे व त्यास कारणीभूत असलेले पक्षाचे पदाधिकारी यांच्या तक्रारी ठाकरे यांच्याकडे होणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे लक्ष
मनसेच्या नगरसेवकांची आज पक्षाध्यक्षांसमोर होणारी परेड व त्यानंतर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे यांनी सत्ता सोडण्याचे निर्देश दिल्यास दुसरीकडे महापालिकेतील सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे शिवसेनेच्या गटातून बोलले जात आहे. त्यासाठी सत्तेची गणिते जुळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेच्या आजच्या बैठकीनंतर निर्णय घेण्याची वेळ आल्यास आगामी निवडणुका, महापालिकेतील पक्षीय बलाबल याचाही विचार करून मनसेकडून निर्णय होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे./

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें