पुणे - "अबकी बार मोदी सरकार'चा नारा... मोंदीचे मुखवटे आणि टी-शर्टमध्ये
वावरणारे हजारो तरुण. शिवसेनेचा, रिपब्लिकन पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा
ध्वज उंचावून "मोदीनामा'चा जयघोष आणि कडेकोट बंदोबस्तात दर पन्नास फुटांवर
पोलिसांची कडक तपासणी, अशा अलोट उत्साही वातावरणाने सर परशुरामभाऊ
महाविद्यालयाचे पटांगण शनिवारी फुलून गेले.
फटाक्यांची आतषबाजी, कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह आणि जल्लोष आणि मोदी यांच्या घणाघाती भाषणाने ठाकरे यांच्या सभेची आठवण अनेकांना झाली. भाषणाच्या दरम्यान श्रोत्यांशी संवाद साधण्याचे मोदी यांचे कसब उपस्थितांना जिंकून घेत होते. दुपारी चार वाजल्यापासूनच महायुतीचे शहर व जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी एकत्र येत होते. गर्दीचा ओघ जसजसा वाढत होता तसतसे पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली. सभेसाठी आलेल्या सर्वांनाच वाहनतळासाठी जागा शोधण्यासाठी कसरत करावी लागली. मैदानातील भव्य मंचावर अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. सभेची सुरवात बाळासाहेबांच्या भाषणांची चित्रफीत दाखवून केल्याने कार्यकर्त्यांमधील जोष द्विगुणित झालेला दिसत होता. महिलांची संख्याही लक्षणीय होती. मुखवटे घातलेल्या "मोदी फॅन्स'चा उत्साह दिसत होता. फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या "मोदी मोदी' अशा घोषणांनी मोदींचे स्वागत झाले. मोदींनी भाषणात प्रश्नांच्या माध्यमातून श्रोत्यांनाही सहभागी करून घेतल्याने एकप्रकारचे चैतन्य आले. ढोल आणि नगाऱ्यांनी परिसर दुमदुमला होता. "जय भवानी जय शिवाजी', "जय भीम', "मोदीभाई आगे बढो' अशा घोषणांनी सभा डोक्यावर घेतली. मोदी यांच्या सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी दुपारपासून सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. दुपारपासून या भागातील वाहतूक वळविण्यात आली होती. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी करून मैदानात सोडण्यात येत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें